'टेस्ट ट्युब बेबी'साठी तुमचं मानसिक आरोग्यही आहे महत्त्वाचं; अशी घ्या स्वत:ची काळजी

'टेस्ट ट्युब बेबी'साठी तुमचं मानसिक आरोग्यही आहे महत्त्वाचं; अशी घ्या स्वत:ची काळजी

आयव्हीएफ (IVF) प्रक्रियेदरम्यान अनेक जोडप्यांना मानसिक आणि शारीरिक त्रासातून जावं लागतं.

  • Share this:

मुंबई, 30 मे : सध्याच्या काळात स्त्री आणि पुरुषांमध्ये कामामुळे वाढलेला ताण, बदललेली जीवनशैली, बदललेला आहार या सर्व गोष्टींमुळे जवळ जवळ 30-40 टक्के लोकांमध्ये नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होण्यास अडचण निर्माण होते. अशा जोडप्यांकरिता आयव्हीएफ (IVF) उपचार पद्धती ही जणू वरदान ठरत आहे. टेस्ट ट्युब बेबी किंवा इन व्रिटो गर्भधारणा (आयव्हीएफ) ही वंध्यत्व निवारणावरील सर्वात उत्तम आणि आधुनिक उपचार पद्धती आहे. मात्र यावेळी अनेक जोडप्यांना मानसिक आणि शारीरिक त्रासातून जावं लागतं. यावेळी कशी काळजी घ्यावी याबाबत मुंबईतील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीतील फर्टिलिटी कन्सल्टंट डॉ. रितू हिंदुजा यांनी मार्गदर्शन केलं आहे.

आयव्हीएफ उपचार पद्धतीत शुक्राणूंच्या मदतीने बीजफलन केलं जातं आणि त्यानंतर हे फलित बीज गर्भाशयात सोडलं जातं, जेणेकरून एक सुदृढ गर्भ आकारास येऊ शकेल.

हे वाचा - कोरोनाच्या परिस्थितीत नवजात बाळाची अशी घ्या काळजी

आयव्हीएफ उपचार पद्धतीत अगदी सुरुवातीला संबंधित व्यक्तीला गोनॅडोट्रोफिन्सची (पुनरूत्पादक संप्रेरके) इंजेक्‍शन्स (अंडाशयास उत्तेजित करण्यासाठी) दिली जातात. त्यानंतर जनरल अ‍ॅनेस्थेशिया (संपूर्ण भूल) देऊन उसाईट पिकअप नावाची एक छोटी प्रक्रिया केली जाते, ज्यामध्ये अंडाशय पूर्वस्थितीत येण्यासाठी अल्ट्रासाउंड मशीनचा वापर केला जातो. इनक्‍युबेटरमध्ये बीज सुरक्षितपणे स्थापित केल्यानंतर शुक्रजंतू आणि बीज यांना एकत्र आणण्यासाठी इन्ट्रा सायटोप्लास्टिक स्पर्म इंजेक्‍शन (आयसीएसआय) दिले जाते. या पद्धतीमध्ये प्रत्येक शुक्रजंतूबरोबर प्रत्येक बीज स्वतंत्रपणे इंजेक्‍ट केले जाते. एकदा ही बीज फलनाची प्रक्रिया पार पडली की त्यातून तयार झालेले गर्भ वेगवेगळ्या काळासाठी इनक्‍युबेटरमध्ये ठेवले जातात. हा कालावधी संपल्यानंतर त्यापैकी उत्कृष्ट गर्भ निवडून गर्भाशयामध्ये पुनःस्थापित केले जातात. या प्रक्रियेस एम्ब्रयो ट्रान्सफर (ईटी) असं म्हटलं जातं.

हे वाचा - कृपया लहान मुलांना मास्क घालू नका; आरोग्य तज्ज्ञांनी पालकांना का दिला असा सल्ला?

बाळाच्या योग्य वाढीसाठी गर्भावस्थेत मानसिक आरोग्य सुदृढ असणं आवश्यक आहे. कारण या काळात मातेला झालेला आघात हा गर्भातील बाळाच्या जीवाला घातक असतो. त्यामुळे आयव्हीएफ उपचार सुरू असताना मानसिक आरोग्य जपण्यासाठी खालील गोष्टींचे पालन करावे.

स्वतःची काळजी घ्या – ताणतणाव टाळण्यासाठी ध्यानधारणा, योगाभ्यास करा. आवडत्या छंदांमध्ये स्वतःला गुंतवून घ्या. ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल अशा गोष्टी करा. गरज भासल्यास समुपदेशनाचा आधार घ्या.

प्रियजनांसोबत वेळ घालवा – आपल्या नकारात्मक भावनांना दूर लोटा आणि सकारात्मक भावनांचा स्वीकार करा. या काळात आपल्या प्रियजनांच्या सहवासात रहा. जेणेकरून असुरक्षिततेची भावना निर्माण होणार नाही.ज्यांनी यापूर्वी आयव्हीएफ उपचार पद्धतीचा अवलंब केला होता अशा जोडप्यांशी संवाद साधा.

हे वाचा - लहान मुलांना ज्युस देताना काळजी घ्या, 'या' वयापर्यंत ज्युस बिलकुल देऊ नका

योग्य वजन राखा : लठ्ठपणामुळे अंडकोशाच्या क्रियेत बाधा येऊन स्त्रियांवर परिणाम होतो. ज्या महिला कमी वजनाच्या आहेत त्यांना देखील अंडकोशांच्या समस्येची जोखीम वाढते ज्यामुळे वंध्यत्व होऊ शकते. प्रत्येकास योग्य बीएमआय राखून ठेवण्याचं लक्ष्य ठेवलं पाहिजे जेणेकरून वंध्यत्व टाळता येईल. पुरुषांमधील लठ्ठपणा शुक्राणूंची संख्या आणि शुक्राणूंची गतिशीलता प्रभावित करू शकतो. जास्त वजन हार्मोनमध्ये बदल घडविते ज्यामुळे वंध्यत्वाचे कारण होऊ शकते.

डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा : यामध्ये भरपूर विश्रांती घेणे, योग्य खाणे आणि दिलेली औषधे वेळेवर घेणे येते. डॉक्टरांच्या संपर्कात रहा.

First published: May 30, 2020, 8:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या