महिलांनो तुळशीचं सेवन करा आणि 'या' मोठ्या समस्येतून सुटका मिळवा

महिलांनो तुळशीचं सेवन करा आणि 'या' मोठ्या समस्येतून सुटका मिळवा

तुळशीतले नैसर्गिक घटक स्ट्रेस लेव्हल कमी करतात आणि हार्मोन लेव्हल मॅनेज करतात. हे एक नैसर्गिक अँटिआॅक्सिडेंट आहे.

  • Share this:

मुंबई, 07 मार्च : महिलांना दर महिन्यात एका गोष्टीला तोंड द्यावंच लागतं. ते म्हणजे मासिक पाळी. या काळात स्त्रियांना त्रासाचा सामना करावा लागतो. पोटदुखी होणं, अशक्तपणा  येणं अशा बऱ्याच समस्या निर्माण होतात. त्यात जर पाळी अनियमित असेल तर मग बघायलाच नको. यावर एक रामबाण औषध आहे. त्यामुळे मासिक पाळी नियमित होते.

अनियमित पाळी नियमित करण्यासाठी तुळस एकदम उपयोगी आहे. तुळशीतले नैसर्गिक घटक स्ट्रेस लेव्हल कमी करतात आणि हार्मोन लेव्हल मॅनेज करतात. हे एक नैसर्गिक अँटिआॅक्सिडेंट आहे. यात अँटी इम्फ्लिमेटरी आणि अँटी माइक्रोबियल असतात.

तुळस कोर्टिसोल हार्मोनला कंट्रोल करून मासिक पाळी नियमित करते. त्यासाठी रोज तुळशीच्या 10 ग्रॅम बियांना पाण्यात उकळवून रोज सकाळी नियमित प्या. यामुळे तुमची अनियमित मासिक पाळीची समस्या ठीक होते. याशिवाय तुम्ही तुळशीचा चहा, तुळशीचं पाणी किंवा तुळशीच्या पानांचं सेवन करा.

तुळशीमुळे शरीरातल्या हार्मोन्सवर परिणाम होतो. त्यामुळे गरोदर आणि डायबेटिस महिलांनी चुकूनही तुळशीची पानं खाऊ नयेत. शिवाय तुळस खाऊनही ही समस्या संपली नाही, तर ताबडतोब डाॅक्टरांशी संपर्क साधा.

अंगणात तुळशी वृंदावन असणं म्हणजे भारतीय संस्कृतीचे लक्षण. याच तुळशीची शेती जर व्यावसायिक पद्धतीने केली तर त्यातून तुम्ही लक्षाधीश बनू शकता. तुळशीची मागणी औषध कंपन्यांमध्ये दुपटीने वाढली आहे.

भारतात उत्तर प्रदेश, जम्मु-काश्मीर, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालसारख्या काही राज्यांत तुळस आणि इतर काही औषधी रोपट्यांची लागवड व्यावसायिक पद्धतीने केली जाते.

तुळशीसाठी लागवडीयोग्य कालावधी जुलैचा पहिला आठवडा असतो. ही रोपं 45 X 45 सेंटीमीटरच्या अंतरावर लावावीत. RRLOC 12 आणि RRLOC 14 या प्रकारच्या रोपांना मात्र 50 X 50 सेंटीमीटरच्या लांबीवर लावली जातात. यानंतर हलके जलसिंचन करावं.


'ही' काळजी घेतली तर जन्मानंतर बाळ होईल 'हुश्शार'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 7, 2019 01:06 PM IST

ताज्या बातम्या