बिनधास्त मिठी मारा आणि KISS करा; अशी रूम जिथं कोरोना संसर्गाची भीती नाही

बिनधास्त मिठी मारा आणि KISS करा; अशी रूम जिथं कोरोना संसर्गाची भीती नाही

आपली प्रिय व्यक्ती आपल्या समोर आहे, खूप दिवसांनी ती आपल्याला भेटली. पण तिला मिठी मारता येत नाही कारण कोरोना संक्रमणाचा धोका. प्रत्येकाच्या मनात ही भीती आहे. पण या रूममध्ये असणाऱ्या कुणाच्याच चेहऱ्यावर अशी भीती दिसत नाही. दिसतो तो फक्त भेटीचा आनंद.

  • Share this:

रोम, 03 जानेवारी : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचाव करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सोशल डिस्टन्सिंग (social distancing). त्यामुळे जगानं आपल्या अनेक पद्धती सवयी बदलल्या. लोकांनी भेटल्यानंतर मिठी मारणं (hugs), हात मिळवणं सोडलं. किस (kiss) तर दूरचीच गोष्ट. कारण यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढतो. पण अनेक दिवसांनी आपला प्रिय व्यक्ती समोर आल्यानंतर जो आनंद होतो तो शब्दात व्यक्त करता येत नाही, हा आनंद मिठी, किस अशाच रूपात व्यक्त केला जातो आणि यासाठीच आता अशी रूम तयार करण्यात आली आहे, जिथं फक्त हा आनंद आहे, कोरोना संक्रमणाची भीती नाही.

हो. एक अशी रूम जिथं तुम्ही बिनधास्त मिठी मारू शकता, किस करू शकता आणि कोरोना संक्रमणाची भीतीही नसेल. इटलीत (italy) अशी रूम्स ऑफ हग्स (rooms of hugs) तयार करण्यात आली आहे. इथं लोक मनात कोणतीही भीती, चिंता न ठेवता एकमेकांना भेटू शकतात. त्यांना सोशल डिस्टन्सिंगची गरज तर नाहीच. पण आपल्या प्रिय व्यक्तींना बिनधास्त मिठी मारता येते, त्यांना मिठी मारता येते.

हे वाचा - Corona vaccine घेताना रोमँटिक झाला, लस देणाऱ्या नर्सलाच केलं प्रपोज; VIDEO VIRAL

मीडिया रिपोर्टनुसार, इटलीतील एका वृद्धाश्रमात ही रूम ऑफ हग्स तयार करण्यात आली आहे. इथं वृद्धांना भेटायला येणारे नातेवाईकांना शरीराला सुरक्षा देईल असा ड्रेस घातला जातो. शिवाय दोन व्यक्तींच्या मध्ये एक प्लॅस्टिक असतं.  ज्यामुळे दोन व्यक्तींमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याची गरज नाही. प्लॅस्टिकच्या एका बाजूला वृद्धाश्रमात राहणारे लोक असता आणि दुसऱ्या बाजूला त्यांना भेटायला येणारे नातेवाईक.

या रूममध्ये तुम्हाला कुणाच्याही चेहऱ्या कोरोना पसरण्याची भीती अजिबात दिसणार नाही. इथं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रेम आणि आनंद दिसेल.

हे वाचा - दहा लोकांचं अन्न फस्त करणाऱ्या जगातल्या सर्वात लठ्ठ व्यक्तीचं झालं निधन

कोरोना काळात एकटेपणा वाढला, ताणतणाव वाढला, एकटेपणामुळे आणि आपल्या लोकांपासून दूर राहिल्यामुळे लोकांचं मानसिक आरोग्यही धोक्यात येऊ लागलं. कित्येक कालावधीपासून आपल्या प्रियजनांपासून दूर राहिलेले लोक हळूहळू लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर एकमेकांना भेटत आहेत. यानंतरचा आनंद शब्दात व्यक्त करणं म्हणजे कठीण. त्यामुळेच इटलीतील वृद्धाश्रमानं हा असा मार्ग शोधला आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Published by: Priya Lad
First published: January 3, 2021, 7:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading