Home /News /lifestyle /

Diabetes असला तरी ही 5 फळं खायला हरकत नाही; Sugar Level सुद्धा नियंत्रणात राहिल

Diabetes असला तरी ही 5 फळं खायला हरकत नाही; Sugar Level सुद्धा नियंत्रणात राहिल

मधुमेही रुग्णांना आहाराबाबत अनेकदा शंका असते. सर्वात मोठा गोंधळ हा फळांच्याबाबतीत होतो. माहिती नसल्यामुळे बहुतेक लोक अनेक प्रकारची फळे खात राहतात, ज्यामुळेही साखरेची पातळी (Fruits which Control Sugar Level) वाढते.

    नवी दिल्ली, 14 मे : मधुमेहाच्या रुग्णांसाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे. रक्तातील साखर वाढू लागल्यास मधुमेह कधीही नियंत्रणात ठेवता येत नाही. एकदा का कोणाला या आजाराचे निदान झाले की, सर्वप्रथम अन्नावर बंधने येतात. साखरेची पातळी वाढेल, असे कोणतेही पदार्थ खाऊ नयेत. मधुमेही रुग्णांना आहाराबाबत अनेकदा शंका असते. सर्वात मोठा गोंधळ हा फळांच्याबाबतीत होतो. माहिती नसल्यामुळे बहुतेक लोक अनेक प्रकारची फळे खात राहतात, ज्यामुळेही साखरेची पातळी (Fruits which Control Sugar Level) वाढते. वास्तविक, फळांमध्ये नैसर्गिकरीत्या साखरेचे प्रमाण असते, जे कृत्रिम साखरेप्रमाणे रक्तातील साखर वाढवते. पण फळांमध्ये असलेली ही नैसर्गिक साखर फार हानिकारक नसते. मधुमेहींनी कोणतेही फळ मर्यादित प्रमाणात खावे. फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक भरपूर प्रमाणात असल्याने, त्यांना आहारातून पूर्णपणे काढून टाकणे योग्य नाही. साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणाऱ्या फळांचे सेवन करायचे असेल तर खालील फळांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. शुगर लेव्हल कंट्रोलसाठी पीच - TOI मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, पीच हे असेच एक फळ आहे, जे मधुमेही रुग्ण खाऊ शकतात. त्यात फायबर जास्त असते. जीवनसत्त्वे ए, सी, पोटॅशियमने समृद्ध असलेले हे फळ आहे. पीचमध्ये असलेले बायोएक्टिव्ह कंपाऊंड लठ्ठपणा आणि मधुमेहामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांशी देखील लढू शकते. दररोज पीच खाल्ल्याने जळजळ, रोगप्रतिकारक शक्ती आणि पचन सुधारण्यास मदत होते. जांभूळ - इन्सुलिन संवेदनशीलता नीट करण्यासाठी जांभळाचा आयुर्वेदात वर्षानुवर्षे वापर केला जात आहे. या फळामध्ये साखरेचे प्रमाण कमी असते. याचे दररोज सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी बर्‍याच अंशी नियंत्रित ठेवता येते. खरं तर, काही काळ्या फळांमध्ये असलेले संयुगे आणि अँटिऑक्सिडंट्स स्टार्चला उर्जेमध्ये रूपांतरित करण्यात आणि रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करतात. पेरू - कमी कॅलरी आणि फायबरने समृद्ध असलेला पेरू हळूहळू पचतो. तो पेशींद्वारे हळूहळू शोषला जाऊ लागतो. त्यामुळे इतर फळांप्रमाणे रक्तातील साखरेची पातळीही वाढत नाही. त्यात संत्र्यापेक्षा 4 पट जास्त व्हिटॅमिन सी असते. याव्यतिरिक्त, त्यात सोडियम कमी आणि पोटॅशियम जास्त आहे. हे पोषक घटक रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि जुनाट आजार होण्याचा धोका कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहेत. हे वाचा - लाल आणि गोड कलिंगड सहज ओळखू शकाल; खरेदी करताना होणार नाही फसगत पपई - पपई खाऊन तुम्ही रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकता. एका अहवालानुसार, पपईचा शरीरावर हायपोग्लायसेमिक प्रभाव पडतो. त्यात फ्लेव्होनॉइड्स देखील असतात, जे एक नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट आहेत. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट पेशींचे नुकसान टाळू शकतात. वजन वाढू देत नाहीत. कमी-कॅलरी फळामध्ये बी जीवनसत्त्वे, फोलेट, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील भरपूर असते. हे वाचा - केसांसाठी कधी पेरूची पानं वापरलीयत का? अनेक प्रॉब्लेम्सवर आहे सोपा घरगुती उपाय सफरचंद - सफरचंद फायबर आणि पोषक तत्वांनी समृद्ध असतात, परंतु फ्रक्टोजचे प्रमाण सर्वात कमी असते. सफरचंद हे देखील एक उत्तम फळ आहे, ज्याचा आहारात समावेश केला पाहिजे. त्यात विरघळणारे आणि अघुलनशील दोन्ही फायबर असतात, जे बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते. तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. फायबरमुळे पचन प्रक्रिया आणि साखरेचे शोषण कमी होते. याचा अर्थ साखर हळूहळू रक्तप्रवाहात प्रवेश करते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही, हे उपाय करण्यापूर्वी तुमच्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Diabetes, Health, Lifestyle, Tips for diabetes

    पुढील बातम्या