Home /News /lifestyle /

घरामध्ये या 6 गोष्टी दिसणं खूप शुभ मानलं जातं; भविष्यात मालामाल होण्याचे असतात ते संकेत

घरामध्ये या 6 गोष्टी दिसणं खूप शुभ मानलं जातं; भविष्यात मालामाल होण्याचे असतात ते संकेत

ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या जीवनात असे काही संकेत आहेत, जे घरामध्ये देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवतात. जर तुम्हालाही तुमच्या घरात याप्रकारची काही चिन्ह दिसली तर समजून घ्या की, आपल्या घरात धनाचा वर्षाव होणार आहे.

    मुंबई, 26 मे : अशा काही गोष्टी किंवा घटना आपल्या आजूबाजूला घडतात, ज्या आपल्या येणाऱ्या काळाबद्दल काही संकेत देतात. उदाहरणार्थ, आपल्या घरावर कावळा बसून ओरडला तर असं मानलं जातं की, घरात पाहुणे येणार आहेत. चालत असताना रस्त्यात अचानक मांजर आडवे गेले तर काही अशुभ चिन्हे आहेत, असे मानले जाते. त्याच प्रकारे दिवसभरात घडणाऱ्या अनेक घटना आपल्या भविष्याचे संकेत देतात. ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या जीवनात असे काही संकेत आहेत, जे घरामध्ये देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवतात. जर तुम्हालाही तुमच्या घरात याप्रकारची काही चिन्ह दिसली तर समजून घ्या की, आपल्या घरात धनाचा वर्षाव होणार आहे आणि तुम्ही लवकरच श्रीमंत होऊ शकता. याबाबत हर जिंदगीमध्ये माहिती दिली आहे. उजव्या तळहातामध्ये सतत खाज सुटणे - तसे, खाज सुटणे ही एक सर्वसामान्य प्रक्रिया आहे, जी कोणत्याही कारणाने होऊ शकते. पण, जर तुमच्या उजव्या तळहाताला सतत खाज येत असेल तर समजा लवकरच तुमच्या घरावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे. उजव्या हाताची खाज संपत्तीचे चिन्ह दर्शवते. ज्योतिष शास्त्रानुसार हे तुमच्यासाठी शुभ संकेत असू शकते. काळ्या मुंग्या घरात येणं - जर अचानक तुमच्या घरात काळ्या मुंग्या येऊ लागल्या आणि त्या काही खाताना दिसल्या तर ते तुमच्यासाठी शुभ लक्षण असू शकते. तुम्हाला असे काही दिसले तर तुमच्या घरात धनवर्षाव होण्याची शक्यता असते. घुबड पाहणे - घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते आणि त्याचे दर्शन होणे सामान्य मानले जात नाही. पण, जर तुम्हाला दिवसा कधी घुबड दिसले तर समजावे की, लवकरच तुमच्या घरात धन वर्षाव होणार आहे. घरी पक्ष्यांची घरटी - पक्ष्यांची घरटी अनेक ठिकाणी असतात, परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या एखाद्या कोपऱ्यात पक्ष्याचे घरटे पाहाल आणि त्यात अंडी असतील तर समजून घ्या की, लवकरच तुम्हाला कुठून तरी पैसे मिळू लागतील. तुमचा कोणताही रखडलेला पैसा तुम्हाला परत मिळणार असल्याचेही ते संकेत आहेत. हे वाचा - मंगळवारी कोणालाच उधार पैसे द्यायचे-घ्यायचे नसतात; अनेक अडचणी नंतर डोकेदुखी ठरतात कोकिळेचा आवाज - घरामध्ये सकाळी कावळा ओरडणे हे तुमच्या घरी पाहुणे येणार असल्याचे लक्षण आहे. त्याचप्रमाणे सकाळी उठल्याबरोबर कोकिळेचा गोड आवाज ऐकू आला तर समजा तुमच्या घरावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे. घरातून बाहेर पडताच कोणीतरी झाडू मारताना दिसणे- हे वाचा - कुठे मीठ मागायचं नाही तर, कुठे किटली धूत नाहीत; जगात खाण्यासंबंधी आहेत अजब प्रथा ज्योतिषशास्त्रात झाडूला खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की, झाडू कधीही चुकीच्या दिशेला ठेवू नये. शास्त्रात संध्याकाळी झाडू मारण्यास मनाई आहे. तसेच, आपण घराबाहेर जात असताना तुम्हाला कोणी झाडू मारताना दिसले तर समजा लवकरच देवी लक्ष्मीची कृपा वर्षाव होणार आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle, Money

    पुढील बातम्या