मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Healthy Breakfast: सकाळी नाश्त्यामध्ये या गोष्टी खाणं आहे फायदेशीर; अनेक आजार राहतील दूर

Healthy Breakfast: सकाळी नाश्त्यामध्ये या गोष्टी खाणं आहे फायदेशीर; अनेक आजार राहतील दूर

प्रथिनांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करणे गरजेचे आहे. त्यामध्ये मोड आलेली धान्ये, उकडलेले अंडे, हरभरा, सोयाबीन, दूध यांचा समावेश हवा. यामुळे भूक कमी लागते आणि शरीरात दिवसभर एनर्जी टिकून (Benefits of healthy breakfast) राहते.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 15 डिसेंबर : निरोगी राहण्यासाठी चांगला न्याहारी (नाश्ता) करणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ज्याप्रमाणे हलके, पौष्टिक आणि आरोग्यदायी रात्रीचे जेवण घेतल्यानं आपले पाचक आरोग्य चांगले राहते, त्याचप्रमाणे सकाळच्या न्याहारीत पौष्टिक आणि आरोग्यवर्दक पदार्थ असणे गरजेचे आहे. डाएट एक्सपर्ट डॉ. रंजना सिंग यांनी झी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार प्रथिनांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करणे गरजेचे आहे. त्यामध्ये मोड आलेली धान्ये, उकडलेले अंडे, हरभरा, सोयाबीन, दूध यांचा समावेश हवा. यामुळे भूक कमी लागते आणि शरीरात दिवसभर एनर्जी टिकून (Benefits of healthy breakfast) राहते.

न्याहारीसाठी प्रथिनेयुक्त पदार्थ

1. अंडी खाणे

डाएट एक्सपर्ट डॉ. रंजना सिंग सांगतात की, रोज नाश्त्यात अंडी खाल्ल्याने शरीरात अनेक आजार दूर ठेवण्याची शक्ती टिकून राहते, कारण अंड्यांमध्ये भरपूर प्रथिने आणि पोषक घटक असतात. अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डी असते, जे हाडांसाठी फायदेशीर असते. दररोज एक अंडे खाल्ल्याने तुम्ही तुमचा दिवसभराचा व्हिटॅमिन डीचा डोस पूर्ण करू शकता.

2. भिजवलेले बदाम

तुम्ही नाश्त्यात बदामाचा समावेश करू शकता. बदाम अनेक पौष्टिक गुणधर्मांनी समृद्ध आहेत. भिजवलेले बदाम सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. बदामामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे, मॅंगनीज, प्रथिने, फायबर आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात, जे निरोगी शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तुमच्या रोजच्या नाश्त्याच्या आहारात मूठभर बदामांचा समावेश करावा.

हे वाचा - Healthy Drink : मेथी-ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

3. शेंगदाणे खाणे

नाश्त्यामध्ये शेंगदाणे खाणे फायदेशीर आहे. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी शेंगदाणे पाण्यात भिजवून ठेवावेत आणि सकाळी खावेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पोटॅशियम, तांबे, कॅल्शियम, लोह आणि सेलेनियम यांसारख्या गुणधर्मांनीयुक्त शेंगदाणा भिजवल्याने त्याची पौष्टिक मूल्ये आणखी वाढतात. सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने गॅस आणि अॅसिडिटीची समस्या दूर होते.

हे वाचा - सेक्सविषयी महिलांपेक्षा पुरुषांनाच वाटतं NO means NO; कौटुंबिक सर्वेक्षणातून माहिती उघड

4. नाश्त्यात एक वाटी दही खाणे

आहार तज्ज्ञ डॉ. रंजना सिंग सांगतात की, प्रत्येकाने नाश्त्यात एक वाटी दह्याचा अवश्य समावेश करावा. दही हे आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. नाश्त्यात दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. दह्यात प्रोबायोटिक्स असतात, जे तुमचे पोट स्वच्छ ठेवतात आणि तुमची पचनशक्तीही चांगली राहते.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips