अबूधाबी, 10 डिसेंबर : यूकेमध्ये कोरोना लशीचा (Corona vaccine) आपात्कालीन वापर सुरू करण्यात आला आहे. भारतातही लस उत्पादनक तीन कंपन्यांनी कोरोना लशीच्या (covid 19 vaccine) आपात्कालीन वापरासाठी अर्ज केला आहे. कोरोना लशीकरणासाठी (corona vaccination) मोदी सरकारनं तयारी सुरू केली. तर दुसरीकडे आता इज्राइलमध्ये (Israel) 27 डिसेंबरपासून लशीकरण (covid 19 vaccination) सुरू केलं जाणार आहे.
इज्राइलमधील नागरिकांना 27 डिसेंबरपासून कोरोनाची लस दिली जाणार, सार्वजनिक स्तरावर कोव्हिड 19 लशीकरण सुरू केलं जाणार, अशी घोषणा इज्राइलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू (Israeli Prime Minister Benjamin Netanyahu) यांनी यूएईमधील एका पत्रकार परिषदेत केली आणि असं झालं तर कोरोना लशीकरण सुरू करणारा इज्राइल हा जगातील पहिला देश ठरेल.
Israeli Prime Minister Benjamin Netanyahu says his government will begin administering vaccines against the coronavirus to the general public on Dec. 27. Netanyahu said that Israel is prepared to vaccinate some 60,000 people a day. https://t.co/24lt38pZml
AP च्या वृत्तानुसार इज्राइलच्या पंतप्रधानांनी सांगितलं, 27 डिसेंबरला सार्वजनिकरित्या कोरोनाविरोधात लशीतकरण सुरू केलं जाईल. देशाची एकूण लोकसंख्या 90,00000 लाख आहे. त्यामुळे एका दिवसात 60,000 लोकांना लस देण्याचं उद्दिष्ट आहे.
ज्यांना कोरोना लस दिली जाईल त्यांना एक स्पेशल कार्ड दिलं जाईल किंवा मोबाइलवर फ्री अॅप्लिकेशन दिलं जाईल. ज्यामुळे ते शहरात कुठेही जाऊ शकतात. लशीकरणानंतर अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत करण्याचा प्रयत्न होईल, त्यामुळे सर्वांनी लशीकरण करावं यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल, असंही ते म्हणाले.
बुधवारीच इज्राइलला फाइजरच्या कोरोना लशीची पहिली बॅच मिळाली आहे. त्यावेळी इज्राइलसाठी हा एक मोठा उत्सव असल्याचं नेतन्याहू म्हणाले. पुढील काही दिवसात हजारो लशी येणार असल्याचंही त्यांनी सांगतिलं.
कोरोनाची महासाथ सुरू झाल्यापासून UAE मध्ये कोरोनाची 178,000 पेक्षा जास्त प्रकरणं आहेत. त्यापैकी 160,000 रुग्ण बरे झाले आहेत. तर 600 जणांचा मृत्यू झाला आहे. इज्राइलमध्ये कोरोनाची 350,000 प्रकरणं आहेत, तर 2,900 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.