Home /News /lifestyle /

शरीरातून येणारा गंध ठरवतो तुमचे मैत्रीचे बंध कोणाशी जुळणार, इस्रायलच्या शास्त्रज्ञांचं संशोधन

शरीरातून येणारा गंध ठरवतो तुमचे मैत्रीचे बंध कोणाशी जुळणार, इस्रायलच्या शास्त्रज्ञांचं संशोधन

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

दोन व्यक्तींचं मन जुळलं, तर त्यांची मैत्री होऊ शकते, हे आपल्याला माहिती आहे; मात्र इस्रायलच्या शास्त्रज्ञांनी (Israel Scientist) केलेल्या शोधातून एक नवी बाब पुढे आली आहे.

    मैत्री समविचारी माणसांमध्ये होते. मैत्रीसाठी जाती-धर्म, रंग अशा भिंती आड येत नसल्या तरी मैत्रीसाठी किमान तुमचे विचार जुळणं आवश्यक असतं. अजूनही एक गोष्ट मैत्री होण्यासाठी आवश्यक असते, ती म्हणजे एकमेकांच्या शरीरातून येणारा गंध (Body Odor). एकमेकांच्या शरीरातून येणाऱ्या वासामुळे दोन व्यक्ती एकमेकांच्या मित्र बनू शकतात, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. इस्रायलच्या शास्त्रज्ञांनी मैत्रीबाबत काही अनोखे निष्कर्ष काढले आहेत. 'टीव्ही 9 हिंदी'ने त्याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. दोन व्यक्तींचं मन जुळलं, तर त्यांची मैत्री होऊ शकते, हे आपल्याला माहिती आहे; मात्र इस्रायलच्या शास्त्रज्ञांनी (Israel Scientist) केलेल्या शोधातून एक नवी बाब पुढे आली आहे. केवळ मन आणि विचार जुळून चालत नाही, तर एकमेकांच्या शरीरातून येणाऱ्या गंधावरही ते एकमेकांचे मित्र बनतील की नाही हे अवलंबून असतं. इस्रायलच्या विझमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या (Weizmann Institute Of Science) शास्त्रज्ञांनी त्याबाबत संशोधन केलं आहे. ज्या दोन व्यक्तींच्या शरीरातून येणारा गंध एकसारखा असतो(Friends With Similar Body Odors), त्यांच्यात मैत्री होण्याची दाट शक्यता असते, असा निष्कर्ष यातून काढण्यात आला आहे. (Sleeping pill पेक्षा कमी नाहीत हे पदार्थ; झोप लागत नसेल तर नक्की ट्राय करून पाहा) सायन्स अ‍ॅडव्हान्सेस जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, या संशोधनात माणसांच्या कपड्यांचा वास घेण्यासाठी ई-नोजचा वापर करण्यात आला. याच्या मदतीनं अनोळखी व्यक्तींच्या शरीराचा वास घेतला गेला व त्यांना प्रश्न विचारण्यात आले. तुम्ही कोणाशी बोलू इच्छिता व कोणाशी मैत्री करण्याची तुमची इच्छा आहे, असं त्यांना विचारण्यात आलं. या सगळ्या प्रक्रियेत त्यांना एकमेकांशी बोलण्यास मनाई होती. ते केवळ एकमेकांना काचेतून पाहू शकत होते. ई-नोज वापरून एकमेकांच्या शरीराचा वास घेतल्यावर त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं. यामध्ये ज्यांनी एकमेकांशी मैत्री करायला आवडेल असं सांगितलं, त्यांच्या शरीराचा गंध एकसारखा असल्याचं आढळलं. शरीराचा वास आणि मैत्री यांच्यात काय संबंध आहे, हे जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी काही मित्रांची निवड केली; मात्र ज्यांची मैत्री कमी कालावधीत झाली, अशांचीच निवड यासाठी करण्यात आली. हे सगळे मित्र स्त्री किंवा पुरुष असे एकाच प्रकारचे होते. त्यांच्या शरीराच्या गंधाचं सॅम्पल शास्त्रज्ञांनी घेतलं. त्यानंतर ते एकत्र करण्यात आलं. ज्या व्यक्तींच्या शरीरातून एकसारखा वास येत होता, त्यांची मैत्री होण्याची दाट शक्यता होती. दोन मित्रांच्या शरीरातून एकसारखा गंध का येतो, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचाही प्रयत्न संशोधकांनी केला. जे मित्र एकसारख्या प्रकारचं जेवतात किंवा ज्यांची जीवनशैली सारखी आहे, त्यांच्या शरीरातून एकसारखा गंध (People Having similar Lifestyle Have Similar body Odor) येतो, असं या संशोधनातून सिद्ध झालं.
    First published:

    Tags: Health, Lifestyle

    पुढील बातम्या