मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /इस्लाममध्ये चुलत भावंडाशी लग्न वैध; मात्र सख्खी भावंडं आणि 'या' पाच नात्यांत विवाह करणं हा गुन्हा

इस्लाममध्ये चुलत भावंडाशी लग्न वैध; मात्र सख्खी भावंडं आणि 'या' पाच नात्यांत विवाह करणं हा गुन्हा

इस्लाम धर्मात चुलत भाऊ-बहिणीच्या विवाहाची परंपरा आहे. जगातल्या जवळपास सर्व देशांत त्याची अनुमती आहे. या धर्मात चुलत भावंडांशी विवाह केलेल्यांची संख्या मोठी आहे.

इस्लाम धर्मात चुलत भाऊ-बहिणीच्या विवाहाची परंपरा आहे. जगातल्या जवळपास सर्व देशांत त्याची अनुमती आहे. या धर्मात चुलत भावंडांशी विवाह केलेल्यांची संख्या मोठी आहे.

इस्लाम धर्मात चुलत भाऊ-बहिणीच्या विवाहाची परंपरा आहे. जगातल्या जवळपास सर्व देशांत त्याची अनुमती आहे. या धर्मात चुलत भावंडांशी विवाह केलेल्यांची संख्या मोठी आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 30 जानेवारी:  इस्लामला तत्कालीन वैज्ञानिक धर्म मानलं जातं. स्थापनेपासूनच त्या धर्मात अशा अनेक गोष्टींची चर्चा केली गेली, की ज्या गोष्टींचा समाजाने नंतर स्वीकार केला. त्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे महिलांना वडिलोपार्जित संपत्तीत अधिकार. शरिया कायद्यात महिलांना वडिलोपार्जित संपत्तीत अधिकाराची तरतूद आहे. अर्थात काळ बदलत गेला, त्यानुसार या धर्मातल्याही अनेक उणिवा जाणवत गेल्या. ट्रिपल तलाकसारखे या धर्मातले अनेक नियम काळानुरूप वैध वाटत नाहीत; मात्र या बातमीचा तो विषय नाही. इस्लाम धर्मात विवाहाचे काय नियम आहेत, याबद्दल इथे चर्चा करू या. इस्लाम धर्मात चुलत भाऊ-बहिणीच्या विवाहाची परंपरा आहे. जगातल्या जवळपास सर्व देशांत त्याची अनुमती आहे. या धर्मात चुलत भावंडांशी विवाह केलेल्यांची संख्या मोठी आहे. एका अहवालाच्या माहितीनुसार, अरब देशांमधल्या विवाहित जोडप्यांपैकी 45 टक्के जोडपी अशी आहेत, की ज्यांचा विवाह आपली चुलत बहीण किंवा भावाशी झाला आहे. भारतातही इस्लाम धर्मीयांमध्ये अशी लाखो जोडपी सापडतील.

  पाकिस्तान आणि अन्य मुस्लिम देशांसह मध्य पूर्वेतल्या देशांमध्ये कुटुंबातल्या व्यक्तीशी विवाहाला प्राधान्य दिलं जातं. ती एक प्रकारची परंपरा आहे. त्याबद्दल जगात खूप चर्चाही होते. त्याच्यामागचं एक लॉजिक असं आहे, की मध्य पूर्वेतल्या देशांमध्ये राजेशाही व्यवस्था खूप प्रभावी होती. तो प्रभाव कायम राखण्यासाठी कुटुंबातच लग्न करण्याला महत्त्व दिलं जातं. कुराण या इस्लामच्या पवित्र ग्रंथातही चुलत बहिणीशी विवाहाला परवानगी देण्यात आली आहे.

  हेही वाचा - Non Veg in Temples: या मंदिरांमध्ये मटन-मच्छी सगळं चालतं! प्रसाद म्हणून वाटतात या गोष्टी

  असं असलं तरी, सख्ख्या बहिणीशी विवाह करण्यास मात्र इस्लाममध्ये सक्त मनाई आहे. जगातल्या जवळपास सर्वच धर्मांमध्ये अशीच व्यवस्था आहे. सख्ख्या भावा-बहिणीचा एकमेकांशी विवाह होणं हे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नसल्याचं आधुनिक युगानेही सांगितलं आहे. आपली समाजव्यवस्थाही याला परवानगी देत नाही.

  सख्ख्या भावंडांच्या विवाहाबद्दल Researchgate.net या वेबसाइटवर खूप चर्चा झाली आहे. कोरियातल्या क्यूंगपूक नॅशनल युनिव्हर्सिटीतल्या एका स्कॉलरने याचं उत्तर दिलं आहे. जवळच्या नात्यातल्या व्यक्तींशी विवाह केल्यास जन्माला येणारं मूल जन्मापासूनच एखाद्या भयानक समस्येने ग्रस्त असू शकतात. ही मुलं संपूर्ण जीवनात अपंग असू शकतात. कारण एकाच आई-वडिलांच्या पोटी जन्मलेल्या मुलांच्या जीन्समध्ये बराच सारखेपणा असतो. प्रत्येक माणसात काही जीन्स चांगली असतात, तर काही वाईट. त्यामुळे एकाच आई-वडिलांच्या मुलांनी एकमेकांशी विवाह केला, तर त्यांच्या मुलांमध्ये अशा दोन्ही प्रकारची जीन्स दुप्पट होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे त्या मुलांमध्ये काही असामान्य गोष्टी दिसू शकतात.

  इस्लाम ऑनलाइन डॉट नेट या वेबसाइटवर इस्लामिक सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिका या संस्थेचे अध्यक्ष डॉ. मुजामिल एच. सिद्दिकी यांनी एक लेख लिहिला आहे. 'इस्लामिक व्ह्यू ऑन मॅरिइंग कझिन्स' असं त्यांच्या लेखाचं शीर्षक आहे. त्यात त्यांनी 'सुरत ए नीसा'चा हवाला देऊन असं सांगितलं आहे, की चुलत बहिणीशी विवाह वैध आहे. त्यांनी त्यामागे काही कारणंही दिली आहेत. त्यांनी असं लिहिलं आहे, की चुलत बहिणीशी विवाह केवळ इस्लामच नव्हे, तर इतरही अनेक धर्मांत आहे; मात्र इस्लाममध्ये सख्ख्या बहिणीसह आणखी काही नाती अशी आहेत, की ज्यांच्याशी विवाह करण्यास सक्त मनाई आहे. डॉ. सिद्दिकी यांनी लिहिलं आहे, की 'सख्खी बहीण आणि आणखी पाच अशी नाती आहेत, की ज्यामध्ये विवाह करणं हा गुन्हा आहे. कोणीही मुलगा त्याच्या वडिलांच्या बहिणीशी म्हणजे आत्याशी लग्न करू शकत नाही. कोणीही मुलगा त्याच्या आईच्या बहिणीशी म्हणजे मावशीशी लग्न करू शकत नाही. तसंच, कोणाही मुलाने आपल्या भावाची मुलगी म्हणजे पुतणी आणि बहिणीची मुलगी म्हणजे भाची यांच्याशी विवाह करू नये. तसंच, आपलं पालनपोषण करणाऱ्या दाईशी कोणाही मुलाने विवाह करू नये.'

  First published:

  Tags: Marriage