कोलकाता, 12 जून : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) रविवारी पानीहाटी येथील इस्कॉन मंदिरात (iskcon temple) दंड महोत्सवात (Dand Mahotsav) उष्मा आणि आर्द्रतेमुळे तीन भाविकांचा मृत्यू झाला. इस्कॉनचा दंड महोत्सव किंवा दही-चुडा उत्सवामुळे उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील पानीहाटी येथील घाटावर भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. कोरोना महामारीमुळे दोन वर्षांनंतर होणाऱ्या या महोत्सवात अडीच ते तीन लाख लोक पोहोचले होते. प्रचंड गर्दीमुळे उष्णता आणि आर्द्रता वाढली. उष्णतेमुळे झालेल्या गोंधळामुळे तिघांचा मृत्यू झाला, तर सुमारे पन्नास जण आजारी असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी गायक केके याचाही सफोकेशनमुळे (Suffocation) मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. काय आहे सफोकेशन? चला सविस्तर जाणून घेऊया.
काय घडली घटना?
बराकपूरचे पोलीस सहआयुक्त ध्रुबज्योती डे यांनी सांगितले की, पानीहाटी येथील हुगळी नदीच्या काठावरील मंदिरात गर्दीत उष्णतेमुळे लोक गंभीर आजारी पडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. दुसरीकडे, पानीहाटी नगरपालिकेचे अध्यक्ष मोलॉय रॉय यांनी दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाल्याचा दावा केला. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचे पथक सध्या हजर आहे. उत्सव संमाप्त करण्यात आला आहे.
उष्णता आणि आर्द्रतेमुळे केकेचा मृत्यू?
प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नाथ (KK) यांचे नुकताच पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे लाइव्ह शो दरम्यान निधन झाले. केके यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांना कोलकाता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये (सीएमआरआय) नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. केके 53 वर्षांचे होते. सभागृहात जास्त गर्दी झाल्यामुळे सफोकेशन झाले, त्यामुळे केके यांची प्रकृती खालावली, असे मानले जाते.
हॉलिवूड स्टार जस्टिन बीबरला झालेला आजार किती गंभीर? ही लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टर गाठा
गुदमरणे म्हणजे काय? What is Suffocation?
जेव्हा रुग्णाला श्वास घेता येत नाही किंवा श्वास घेण्यास त्रास होतो. अशा स्थितीला गुदमरणे किंवा सफोकेशन म्हणतात.
एखाद्या व्यक्तीला गुदमरण्याची समस्या कधी येते?
हवेतील ऑक्सिजनची कमतरता किंवा घशात काहीतरी अडकल्यामुळे गुदमरल्यासारखे होते. अशा स्थितीत त्या व्यक्तीचा मेंदू काम करत नाही.
गुदमरल्याने मृत्यू होऊ शकतो का?
होय, यामुळे मृत्यू होऊ शकतो. कधी कधी गुदमरल्यामुळं हृदयाचे ठोकेही कमी होतात. गुदमरल्यास मृत्यूचा धोका असतो. जेव्हा गुदमरल्याचा त्रास होतो तेव्हा व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागते. तो ऑक्सिजन योग्य प्रकारे घेऊ शकत नाही, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. परिणामी, मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. अनेक परिस्थितीत ते जीवघेणे ठरते.
कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी कसा असावा आहार?
अचानक गुदमरल्याचा त्रास झाल्यास काय करावे?
ज्याला गुदमरल्यासारखे त्रास होत आहे त्याच्या मागे उभे रहा.
आपल्या हातांनी त्याची कंबर धरा.
आता त्या व्यक्तीला समोरच्या दिशेने वाकवा.
एका हाताने मुठी बनवून नाभीच्या वर ठेवा.
दुसऱ्या हाताने मूठ पकडा आणि पोटावर थोडा दाब देऊन वर करण्याचा प्रयत्न करा.
टीप - असे चार ते पाच वेळा करा. जर प्रकरण गंभीर असेल तर त्वरित डॉक्टरकडे जा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: West bengal