मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

चुकीच्या पद्धतीनं अंघोळ केल्यानं हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका? जाणून घ्या सर्व माहिती

चुकीच्या पद्धतीनं अंघोळ केल्यानं हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका? जाणून घ्या सर्व माहिती

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

अंघोळ करताना अशा काही घटना घडल्याची बरीच प्रकरणं तुमच्या पाहण्यात असतील.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 09 डिसेंबर : अंघोळ (Bathing) करण्याची पद्धत योग्य किंवा अयोग्य असते का? अयोग्य पद्धतीनं अंघोळ केल्यामुळं मेंदूचा झटका (brain stroke), हृदयविकाराचा झटका (Heart attack) किंवा अर्धांगवायू/लकवा यासारख्या गंभीर परिस्थिती उद्भवू शकतात का? शॉवरचं पाणी थेट डोक्यावर पडून कुणाचा जीव जाऊ शकतो का? असे प्रश्न अनेकांना पडत असतात. काही वेळेस आजूबाजूला तशा घटना घडल्यास लोक घाबरूनही जातात. यानंतर अशा बाबींवर अनेकदा चर्चा होत राहिल्यानं या खऱ्या असाव्यात की काय अशी शंकाही वाटू शकते. अशा परिस्थितीत हे प्रश्न कितपत वाजवी आहेत हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरतं. आंघोळीच्या पद्धतीबद्दलचे हे सर्व प्रश्न आम्ही दिल्लीचे ज्येष्ठ चेतासंस्था आणि मेंदूविकार तज्ज्ञांकडून (Neurologist) जाणून घेतले.

इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे वरिष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत सुरी यांच्या मते, आंघोळ करताना ब्रेन स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची अनेक प्रकरणं समोर येतात, हे खरं आहे. पण, चुकीच्या पद्धतीमुळे आंघोळ केल्यानं ब्रेन स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका यांसारखी गंभीर स्थिती उद्भवू शकते, असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. आतापर्यंत असा कोणताही सिद्धांत वैद्यकीय शास्त्रात समोर आलेला नाही. आंघोळ करताना किंवा बाथरूममध्ये असे गंभीर झटके येण्याचे कारण म्हणजे अयोग्य पद्धतीनं आंघोळ हे नसून थंडीच्या अचानक संपर्कात आल्यानं येणारा कोल्ड स्ट्रोक (Cold Stroke) हे आहे.

डॉ. विनीत सुरी यांनी सांगितले की, आपल्या शरीरात थर्मोरेग्युलेशन सिस्टम (Thermoregulation system) असते, जी शरीराच्या अंतर्गत तापमानाला संतुलित ठेवण्याचं काम करते. हिवाळ्यात थंडीमुळं शरीरात काही बदल होतात. त्यामुळं थर्मोरेग्युलेशन सिस्टीम कमकुवत होते. कमकुवत थर्मोरेग्युलेशनमुळे, शरीराला व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शनच्या (Vasoconstriction) स्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्वचेतील रक्तवाहिन्या आकुंचन पावू लागतात. थर्मोरेग्युलेशन आणि व्हॅसोकॉन्स्ट्रक्शनमुळे रक्तदाब (blood pressure) वाढतो आणि कधीकधी स्ट्रोकसारख्या गंभीर परिस्थिती उद्भवतात.

अंघोळ करताना आधी पाणी डोक्यावर घालायचे की पायावर?

डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयातील न्यूरोसर्जरी विभागाचे प्राध्यापक डॉ. अजय चौधरी यांच्या मते, आंघोळ करण्याच्या योग्य किंवा चुकीच्या पद्धतीवर आतापर्यंत वैद्यकीय शास्त्रात चर्चा झालेली नाही. डोक्यावर पाणी पडल्यानं ब्रेन स्ट्रोक किंवा ब्रेन हॅमरेज (Brain hemorrhage - मेंदूतील रक्तस्राव) झाला असेल, अशी कोणतीही केस किंवा केस स्टडी आतापर्यंत आढळून आलेली नाही. त्यांनी सांगितले की, थंडीत शरीराचं थर्मोरेग्युलेशन आणि रक्तवाहिन्यासंबंधी आकुंचन झाल्यामुळं रक्तदाब वाढतो आणि हा रक्तदाब कधीकधी ब्रेन हॅमरेजचे कारण बनतो. या ब्रेन हॅमरेजचा तुम्ही आंघोळ करण्याच्या पद्धतीशी काहीही संबंध नाही.

त्यांनी सांगितले की, हिवाळ्यात लोक अंथरूणातून उठून थेट बाथरूममध्ये जातात आणि कोल्ड स्ट्रोकमुळं (Cold stroke in winter) तिथेच पडतात. वास्तविक, थर्मोरेग्युलेशन आणि व्हॅसोकॉन्स्ट्रक्शनमुळे रक्तदाब सकाळी सर्वात वेगानं वाढतो. बरेच लोक त्यांच्या रक्तदाबाबाबत निष्काळजी असतात आणि औषधाचा डोस वेळेवर घेत नाहीत, ज्यामुळं ब्रेन स्ट्रोक किंवा ब्रेन हॅमरेज होते. रक्तदाब आणि मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांनी हिवाळ्यात खूप सावध राहावे.

हे वाचा - Health Tips : या वेळात स्प्राउट्स खाणे त्रासदायक ठरू शकते, जाणून घ्या योग्य पद्धत

कोणत्या लोकांना ब्रेन स्ट्रोकचा धोका जास्त असतो

इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे वरिष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत सुरी यांच्या मते, कोल्ड स्ट्रोकमुळे ब्रेन हॅमरेजचा सर्वाधिक धोका रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांसोबत वृद्धांमध्ये असतो. त्यांनी सांगितलं की, तरुणांची थर्मोरेग्युलेशन यंत्रणा चांगली असते. ही यंत्रणा शरीरातील तापमान बाहेरील तापमानानुसार अतिशय वेगाने समायोजित करते. त्याच वेळी, कमकुवत थर्मोरेग्युलेशनमुळे, वृद्धांना कोल्ड स्ट्रोकचा धोका जास्त असतो, ज्यामुळे मेंदूत रक्तस्त्राव होऊ शकतो.

हे वाचा - Heart attack or Heartburn : हृदयविकाराचा झटका आणि छातीत होणारी जळजळ यात काय फरक असतो? अशी ओळखा लक्षणे

डॉ.राम मनोहर लोहिया रुग्णालयातील न्यूरोसर्जरी विभागाचे प्राध्यापक डॉ.अजय चौधरी यांच्या मते, वृद्ध तसेच रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनी थंडीत विशेष काळजी घ्यावी. त्यांनी नियमितपणे बीपी आणि साखर तपासली पाहिजे. अनेकवेळा असं घडतं की बीपी आणि शुगरचे रुग्ण जुन्या डोसनुसार औषधे घेत राहतात आणि अचानक एक दिवस रक्तदाब वाढतो आणि ब्रेन हॅमरेज होतं. त्यामुळे बीपी आणि शुगरच्या रुग्णांनी विशेषत: सकाळी सकाळी रक्तदाब आणि साखर तपासावी.

First published:

Tags: Health, Health Tips, Tips for heart attack