मुंबई, 25 जानेवारी : भारतात सध्या कोरोना लसीकरण (corona vaccination) सुरू झालं आहे. लशीचे दुष्परिणाम समोर आले आहेत पण लस (corona vaccine) घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी हे सांगितलं जात नाही आहे. सेक्स केल्याने कोरोना होतो की नाही या प्रश्नानंतर आता लस घेतल्यानंतर सेक्स (sex after corona vaccination) करताना काय काळजी घ्यायला हवी असा प्रश्न उपस्थित होतो आहेत. काही तज्ज्ञांच्या मते, लस घेतलेल्या व्यक्तींनी किमान एक वर्ष तरी सेक्स (sex) करताना गर्भनिरोधक वापरायला हवेत.
कोवॅक्सिन (covaxin) लशीला भारतात आपात्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. पण या लशीचं सध्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिक ट्रायल सुरू आहे. लशीच्या चाचणीत सहभागी असलेल्या व्यक्तींना सेक्स करताना किमान तीन महिने कंडोम वापरण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. कारण याचा भ्रूण किंवा प्रजनन क्षमतेवर दुष्परिणाम होऊ शकतो.
या चाचणीत सहभागी होण्यासाठी पुरुषांना जे निकष ठरवण्यात आले आहेत त्यामध्ये तीन महिने सेक्स करताना कंडोम वापरण्याचा आणि स्पर्म डोनेशन न करण्याचं नमूद करण्यात आलं आहे. पण क्लिनिकल ट्रायलमधील हा निकष लसीकरण मोहिमेत लागू नाही का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. प्रेग्नंट आणि ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या महिलांनी कोरोना लस घेऊ नये, असं सरकारनं सांगितलं आहे. पण लस घेतल्यानं सेक्स करणं सुरक्षित आहे की नाही याची माहिती दिलेली नाही. पण तरी लसीकरणानंतर 3-12 महिने थेट सेक्स टाळा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
हे वाचा - कोरोना लशीबाबत अफवा पसरवणाऱ्यांची आता खैर नाही; मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय
आऊटलूकच्या वृत्तानुसार सेक्सोलॉजिस्ट डॉ. प्रकाश कोठारी म्हणाले, लशीचा गर्भावर काय परिणाम होईल हे आपल्याला माहिती नाही. पण जर क्लिनिकल ट्रायलमध्ये लस घेतल्यानंतर सेक्स करताना कंडोम वापरण्याची अट असेल तर तसा परिणाम होण्याची शक्यता असू शकते. याआधी काही औषधांचे नवजात बालकांवर दुष्परिणाम झाल्याचे दिसून आले आहेत. त्यामुळे किमान एक वर्ष तरी सेक्स करताना गर्भनिरोधक वापरावेत असा सल्ला मी देतो.
स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. पुनीत बेदी म्हणाले, लसीकरण सुरू झालं असलं तरी कोरोना लस ट्रायलच्या टप्प्यात आहे. लस घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी याची माहिती क्वचितच दिली जात आहे. त्यामुळे कंडोम वापरण्याची अट लस घेणाऱ्यांनाही लागू असावी.
हे वाचा - मास्क वापरणं Must! कोरोनाच्या प्रसाराबाबतच्या अभ्यासातून समोर आलेलं कारण वाचा
तर अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक डॉ. मोहम्मद शेमिम म्हणाले, लशीचे दीर्घकालीन दुष्परिणाम आपल्याला माहिती नाहीत. त्यामुळे जे लोक लस घेणार आहेत त्यांनी सेक्स करताना काळजी घेणं उत्तम आहे.