अंडं जास्त वेळ उकडलं तर ठरू शकतं घातक; अंड्याबद्दलची 7 तथ्य जी तुम्हाला माहिती नसतील

रोज एक अंडं खावं, असं हेल्थ कॉन्शस लोकांना नेहमी सांगितलं जातं. प्रोटीन्सनी परिपूर्ण असलेलं अंडं पौष्टिक खरं, पण त्याबद्दल या 7 गोष्टी माहीत आहेत का?

News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2019 09:31 PM IST

अंडं जास्त वेळ उकडलं तर ठरू शकतं घातक; अंड्याबद्दलची 7 तथ्य जी तुम्हाला माहिती नसतील

अंडं रोज खावं असं सांगतात कारण तो एक महत्त्वाचा प्रोटीन सोर्स आहे आणि तरी इतर मांसाहारी पदार्थांपेक्षा अंडं पचायला हलकं आहे.

अंड्याच्या पांढऱ्या भागात 12 टक्के प्रोटीन असतं तर पिवळ्या बलकात 16 टक्के प्रोटीन असतं.

अंड्याच्या पिवळ्या बलकात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ते प्रमाणात खावं, असं म्हणतात. पांढऱ्या भागात फॅट्स कमी असतात.

अंड्याच्या कवचावरून ते किती ताजं आहे किंवा शिळं याचा अंदाज काही जण लावतात. पण अंड्याच्या दर्जाचा कवचाशी काही संबंध नाही. वयाने मोठ्या कोंबडीची अंडी पातळ कवचाची असतात, तर लहान कोंबडी असेल तर कवच जाड असतं. याचा पोषण मूल्यांशी काही संबंध नसतो.

अंडं जास्त वेळ उकडलं तर घातक ठरू शकतं. हार्ड बॉइल्ड एग म्हणजे घट्ट उकडलेलं अंडं खायची भारतीयांची सवय असते. पण जास्त उकडलेल्या अंड्यात प्रथिनांची रासायनिक अभिक्रिया होऊन आयन सल्फाईड निर्माण व्हायची शक्यता असते.

Loading...

जास्त उकडलेल्या अंड्याचा बलक हिरवा- निळा दिसतो, याचं कारण त्यातल्या लोहाची रासायनिक अभिक्रिया झालेली असते.

जास्त उकडलेलं अंडं खाऊ नये, कारण अंड्यातल्या हायड्रोजन सल्फाईडचं आयर्न सल्फाईड होतं. अंड्याचा बलक जितका जास्त हिरवा-निळा दिसेल तितकी अभिक्रिया जास्त झाली असं समजावं. असं अंडं खावं की नाही याबद्दल तज्ज्ञांत एकमत नसलं, तरी विषाची परीक्षा कशाला घ्यायची? मध्यम आचेवर गरजेपुरतंच अंडं उकडून खाणं शहाणपणाचं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2019 09:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...