Home /News /lifestyle /

Corona vaccine घरीदेखील तयार करता येऊ शकते का?

Corona vaccine घरीदेखील तयार करता येऊ शकते का?

कोरोना लसीकरण सुरू होताच लोकांनी घरीदेखील कोरोना लस (corona vaccine) तयार करता येऊ शकते हे सर्च करायला सुरुवात केली आहे.

मुंबई, 19 जानेवारी : जगातील सर्वात मोठी कोव्हिड 19 लसीकरण मोहीम (Largest Vaccination Drive) भारतात सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसात मंजूर करण्यात आलेल्या कोव्हिशिल्ड (Covishield) आणि कोवॅक्सिन (Covaxin) या दोन लशी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना दिल्या जात आहेत. 30 कोटी लोकांना टप्प्याटप्प्यानं ही लस देण्यात येणार आहे. कुठे, किती लस पुरवठा करण्यात आला, यासाठीची व्यवस्था, याचे काही दुष्परिणाम जाणवले का? अशा अनेक प्रश्नांबरोबर एक प्रश्न विचारला जात आहे तो म्हणजे ही लस घरी बनवता येते का? गुगल ट्रेंडच्या अहवालानुसार रविवार आणि सोमवार सकाळी भारतातील सर्वाधिक लोकांनी कोरोना लस घरी बनवता येते का? (Indians Search Homemade Vaccine) याचाच शोध घेतला असल्याचं स्पष्ट झालं आहे. पहिल्यांदाच हा शोध घेण्यात आलेला नाही, तर याआधी जुलै 2020 मध्ये असंच सर्च करण्यात आलं होतं. याचं उत्तर अर्थातच नाही, असं असलं तरी त्यामागील शास्त्रीय कारणं जाणून घेणंही महत्त्वाचं ठरेल. कोरोनावरील लशीबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. अशावेळी अशा गोष्टीचा शोध घेण्याचा काय कारण आहे? भारतीय लोकांमध्ये ही गोष्ट अचानक इतकी लोकप्रिय का झाली? याचा वेध घेताना असं लक्षात आलं आहे की, काही बातम्यांमुळे याला प्रोत्साहन मिळालं आहे. काही विशेष तज्ज्ञ ‘डू इट युवरसेल्फ’ (Do it Yourself -DIY ) लशीबाबत काम करत आहेत. हे वाचा - ...तर कोरोनाचं लसीकरण करून घेऊ नका! कंपनीने नागरिकांना केलं सूचित गेल्या वर्षी अमेरिकेतील 20 वैज्ञानिक त्यांनी बनवलेल्या डू इट युवरसेल्फ नझल लशीमुळे चर्चेत आले होते. त्यांनी स्वतःवर याची चाचणी ही घेतली होती. कोरोनाच्या विषाणूत आढळणारे प्रोटीन्स आणि शेलफिशमधील शुगर पार्टीकल्स वापरून ही लस तयार करण्यात आली होती. मात्र ही लस कोरोनावर प्रभावी ठरल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. एवढंच नव्हे तर नासाच्या माजी शास्त्रज्ञ जोसेया जेनर यांनीही घरीच डीएनए लस बनवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लाईव्ह स्ट्रीमिंग करून स्वतःच याबाबत माहिती दिली. स्वतःवर या लशीची चाचणी घेतल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र याबाबतही कोणताही ठोस पुरावा नसल्यानं पुढं काहीही झालं नाही. यानंतर डू इट युवरसेल्फ ‘डीआयवाय’ (DIY) अशी कोणतीही लस निर्माण करता येत नाही, कोणताही देश अशा प्रकारच्या प्रकल्पावर काम करत नसल्याचं स्पष्ट झालं. लस घरी बनवणं शक्य आहे का? याचं एकाच शब्दात उत्तर आहे ते म्हणजे नाही. तुम्ही जैवविज्ञान (Bio Tech) क्षेत्रातील तज्ज्ञ असलात तरी घरी लस बनवणं म्हणजे आकाशातील चंद्र, तारे तोडून आणण्यासारखं आहे. एक अतिशय गुणकारी, प्रभावी लस बनवण्यासाठी त्यातील तज्ज्ञता पाहिजेच. त्याशिवाय हजारो लोकांवर चाचण्या घेऊन, सरकारची मंजुरी घेणं अशी प्रदीर्घ प्रक्रिया लस निर्मितीत असते. एकट्या माणसाला हे अशक्य आहे. लस कशी बनते? लस बनवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. काही प्रचलित पद्धती अशा आहेत. 1) विषाणूला कमजोर करणं : या पद्धतीनं बनवण्यात आलेली लस दिली की, ती शरीरातील विषाणूला दीर्घकाळासाठी कमजोर करते. रुबेला, रोटाव्हायरस, ओरल पोलिओ लस अशा लशी याचप्रकारे बनवण्यात आल्या आहेत. 2) विषाणूला निष्क्रीय करणं : रसायनांच्या सहाय्यानं विषाणू नष्ट केला जातो किंवा त्याला पूर्णपणे निष्क्रिय केलं जातं. पोलिओ, हिपेटायटीस ए, एन्फ्ल्यूएन्झा आणि रेबीजवरील लशी या पद्धतीनं तयार करण्यात आल्या आहेत. हे वाचा - कोविड-19 लशीसंबधित सर्व माहिती खुली करावी; वैद्यकीय तज्ज्ञांनी केली मागणी 3) विषाणूच्या भागाचा वापर : विषाणूच्याच काही अंशाचा वापर करून लस बनवली जाते. हिपेटायटीस बी, सिंगलेस आणि एचपीव्ही अशा आजारांवरील लस अशा पद्धतीनं निर्माण करण्यात आली आहे. 4) जेनेटिक कोड तंत्रज्ञान : या पद्धतीत ज्या व्यक्तीला लस दिली जाते, त्यांच्या शरीरात विषाणूचा एक अंश औषध म्हणून काम करतो. कोव्हिड 19 वरील लस अशा पद्धतीनं बनवण्यात आली आहे. ही पद्धत डीएनए, एमआरएनए किंवा व्हेक्टर व्हायरस पद्धतीवर आधारित आहे. याशिवाय जीवाणूंच्या अंशाचा वापर करूनही लस बनवली जाते. अर्थात त्याचा उल्लेख इथं आवश्यक नाही. तज्ज्ञांच्या मते लस निर्मितीसाठी एक नियंत्रित प्रयोगशाळेसह विशिष्ट उपकरणं, तज्ज्ञ व्यक्ती यांची गरज असते. त्याशिवाय प्रशासकीय प्रक्रियांची पूर्तताही करावी लागते.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus

पुढील बातम्या