Ex ला सोशल मीडियावर स्टॉक करणं सामान्य गोष्ट आहे?

Ex ला सोशल मीडियावर स्टॉक करणं सामान्य गोष्ट आहे?

वेगळं झाल्यानंतरही त्यांच्यात पूर्वीसारखी मैत्री टिकू शकते का... तसेच दुसऱ्या नात्यात गेल्यानंतर ते पहिल्या पार्टनरला विसरू शकतात का.. असे काही प्रश्न आहेत जे जवळपास सर्वांच्याच मनात येतात.

  • Share this:

संगनमताने वेगळं होणं खरंच शक्य आहे का.. वेगळं झाल्यानंतरही त्यांच्यात पूर्वीसारखी मैत्री टिकू शकते का... तसेच दुसऱ्या नात्यात गेल्यानंतर ते पहिल्या पार्टनरला विसरू शकतात का.. असे काही प्रश्न आहेत जे जवळपास सर्वांच्याच मनात येतात. अशा धाटणीच्या प्रश्नांची योग्य उत्तरं मिळाली तर समजून जा तुमचं अर्ध आयुष्य सुकर झालं. अनेकदा ब्रेकअप झाल्यानंतरही एकमेकांना स्टॉक केलं जातं. काही वेळाने स्टॉक करणंही कमी होतं पण तरीही अनेकजण आयुष्यभर एकमेकांना स्टॉक करतात.

एखाद्या एक्सने दुसऱ्याला ब्लॉक केलं असेल तर फेक अकाउंटवरूनही स्टॉक करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. पण या सगळ्याचा वर्तमानच्या जोडीदारांवर परिणाम होतो. अनेकांना या गोष्टी चुकीच्या आणि अयोग्य वाटतात. मात्र मानोसपचार तज्ज्ञांच्या मते, या सर्व गोष्टी अगदी सामान्य आहेत. त्यांच्यामते, स्टॉक न करण्याचा अनेकजण सल्ला देतात. पण तरीही लोक असं काही न ऐकता तेच करतात जे त्यांना करायचं आहे. पण मानोसोपचार तज्ज्ञ ब्रेकअपनंतर एकमेकांना सोशल मीडियावर स्टॉक करणं योग्य नसल्याचं सांगतात.

हफपोस्ट डॉट कॉमशी बोलताना मानोसोपचार तज्ज्ञ डॉ. ट्रेसी म्हणाले की, एक्सला सोशल मीडियावर स्टकॉ केल्यावर तुम्हाला आनंदी वाटतं की दुःख होतं.. यातून तुम्हाला काय मिळतं.. एक्सचे फेसबुक पोस्ट वाचून तुमचा दिवस आनंदी जातो की वाईट..

जेव्हा तुम्ही एखाद्याशी ब्रेकअप करता तेव्हा त्याच्या सोशल मीडिया अकाउंटशीही ब्रेकअप करणं गरजेचं आहे. नाही तर आयुष्यात तुम्ही कधीही पुढे जाऊ शकत नाही.

अनेकदा एक्सच्या एखाद्या पोस्टचा चुकीचा अर्थ काढला जातो आणि त्यामुळे कित्येक दिवस नैराश्यात जातात. स्वतःलाच त्रास करून घेतला जातो.

स्वतःची उर्जा अशा ठिकाणी वाया घालवू नका जिथून काहीही मिळणार नाही. कारण तुम्ही वेगळे झाला आहात आणि आता ते नातं काही केलं तरी परत मिळू शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही कोणापासून वेगळे झाला आहात तर सर्व गोष्टींपासून व्हा.

ब्रेकअपनंतर चांगले मित्र होऊन राहता येऊ शकतं का?

बहुतेकवेळा हे शक्य होत नाही. तुम्हाला मैत्री का ठेवायची आहे हा प्रश्न एकदा स्वतःला विचारा. तुम्हाला अजून त्या व्यक्तिची काळजी आहे, त्याची चिंता वाटते, त्यांच्यापासून वेगळे राह शकत नाही हे उत्तर असेल तर ब्रेकअप का केला हा प्रश्नही विचारा

जर ब्रेकअप झालं आहे आणि तुम्ही दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे तर मैत्री करण्याचा काय फायदा.

मैत्री टिकवणं हा एक चांगला पर्याय नक्कीच नाही. तुम्ही कोणत्या परिस्थितीत वेगळे झाले होता ते कारण एकदा आठवून पाहा.

यामुळे तुम्ही तुमचा वर्तमान काळ आणि भविष्य काळ वाया घालवत आहात हे नक्की.

एकटे राहणारे असतात इंटेलिजेंट! संशोधनात झालं सिद्ध

मान दुखीकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो गंभीर आजार

Research: पती सोबत असेल तर कमी होतं Labour Pain

SPECIAL REPORT: राणेंचा 'स्वाभिमान' भाजपात विलीन होणार?

Published by: Madhura Nerurkar
First published: August 25, 2019, 5:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading