रात्री उठून सारखं वॉशरूमला जाणं किती सामान्य आहे?

रात्री उठून सारखं वॉशरूमला जाणं किती सामान्य आहे?

दररोज मध्यरात्री अनेकदा मध्यरात्री वॉशरुमला जाणं सामान्य गोष्ट अजिबात नाही. गंभीर आजारांचं हे एक लक्षणही असू शकतं.

  • Share this:

तुम्हालाही झोपेतून उठून सतत वॉशरूमला जायची सवय आहे का? तुमचं उत्तर जर हो असेल तर आत्ताच सावध व्हा. कधी तरी उठून वॉशरूमला जाणं ही सामान्य गोष्ट आहे. दररोज तेही अनेकदा मध्यरात्री वॉशरुमला जाणं सामान्य गोष्ट अजिबात नाही. गंभीर आजारांचं हे एक लक्षणही असू शकतं. आज आम्ही तुम्हाला कोणत्या कारणांमुळे मध्यरात्री सारखं वॉशरूमला जावं लागतं ते सांगणार आहोत.

सर्वात पहिलं कारण म्हणजे, झोपण्यापूर्वी भरपूर पाणी पिण्याची सवय आहे.

तुम्ही उच्च रक्तदाबाच्या किंवा इतर आजारांच्या गोळ्या घेता.

तुम्ही मद्यपान किंवा कॅफिनचं सेवन केलंय.

तुमच्या जेवणात मिठाचं प्रमाण जास्त असू शकतं.

तुम्हाला झोप न येण्याचा त्रास असेल.

तुम्ही गरोदर असू शकता किंवा पायांना सूज आल्यामुळेही मध्यरात्री वॉशरुमला जाण्याचं प्रमाण वाढतं.

वाढत्या वयामुळेही मध्यरात्री वॉशरुमला जाण्याचं प्रमाण वाढतं.

याशिवाय तुम्हा एक वेगळी वैद्यकीय समस्याही असू शकते. त्यावर उपचार घेणं आवश्यक आहे.

सर्वसामान्यपणे या समस्येला नॉक्टुरिया असं म्हटलं जातं. 60 वर्षांहून अधिक वयातील लोकांना ही समस्या होते. या आजाराच्या पीडितांना रात्रीची झोप नीट मिळत नाहीच, शिवाय वयोमानाप्रमाणे हार्मोन्समध्येही बदल होतात. याचमुळे रात्री जास्त प्रमाणात वॉशरूमला जावं लागतं.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

अ‍ॅसिडिटीने आहात त्रस्त तर या योगासनांनी मिळेल हमखास आराम!

दारू- सिगरेटपासून तुम्ही मुलांना असं ठेवू शकता दूर

Ex ला सोशल मीडियावर स्टॉक करणं सामान्य गोष्ट आहे?

7 प्रकारचे KISS रिलेशनशिपला करतात मजबूत, प्रत्येकाची आहे वेगळी गोष्ट

SPECIAL REPORT: राणेंचा 'स्वाभिमान' भाजपात विलीन होणार?

Published by: Madhura Nerurkar
First published: August 25, 2019, 10:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading