Home /News /lifestyle /

AC सोबत पंखा सुरू ठेवणं कितपत योग्य? या पद्धतीचा करा अवलंब, विजेचीही होईल बचत

AC सोबत पंखा सुरू ठेवणं कितपत योग्य? या पद्धतीचा करा अवलंब, विजेचीही होईल बचत

उकाड्यापासून वाचण्यासाठी एसी (AC) हाच सर्वात चांगला पर्याय आहे. पण सतत एसी सुरू ठेवल्यानं मोठ्या प्रमाणात वीजबिल (Electricity bill) येऊ शकतं. त्यामुळे जाणून घ्या एसीसोबत पंखा सुरू ठेवण्याची योग्य पद्धत...

    मुंबई, 11 जुलै: उकाड्यापासून वाचण्यासाठी एसी (AC) हाच सर्वात चांगला पर्याय आहे. पण सतत एसी सुरू ठेवल्यानं मोठ्या प्रमाणात वीजबिल (Electricity bill) येऊ शकतं. त्यामुळे मध्यमवर्गीय लोकांना 24 तास एसी सुरू ठेवणं शक्य नाही. अशात वीजबिल कमी करण्यासाठी लोकं विविध पद्धतींचा वापर करत असतात. एसी बंद केल्यानंतर घरातील फॅन (Fan) सुरू केल्यानं पुढील बराच काळ खोलीत सर्वत्र थंडावा निर्माण केला जाऊ शकतो, असं अनेक नागरिकांना वाटतं. यामुळे वीजबिलातही मोठी कपात होऊ शकते. यामुळे तुम्ही एसी बंद करुनही एसीच्या गारव्याचा आनंद लुटू शकता. एसीसोबत पंख्याचा वापर केल्यानं वीजबिलही कमी येऊ शकतं. त्यामुळे एसीसोबत पंखा कसा सुरू ठेवण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया... असं म्हटलं जात की, एसीसोबत पंखाही सुरू ठेवायला हवा. यामुळे तुम्ही एसीचं तापमान वाढवून देखील संपूर्ण खोलीत गारवा निर्माण करू शकता. पण अशा वेळी पंखा पूर्ण वेगात न चालवता, कमी वेगात चालवणं फायदेशीर आहे. त्यामुळे एसीचा थंडपणा संपूर्ण खोलीत पसरतो परिणामी खोलीत बसलेल्या सर्वांना गारव्याचा आनंद घेता येतो. हेही वाचा-गृहिणींना पावसाळ्यात बटाटे सडण्याची भीती? या पद्धतीने साठवण केल्यास No Tension अशाप्रकारे एकत्र एसी आणि फंखा चालवण्याचा मुख्य फायदा म्हणजे, खोली कितीही मोठी असली तरीही एसीचा गारवा सर्व कोपऱ्यापर्यंत पोहोचवता येऊ शकतो. अशा स्थितीत एसीचं तापमान कमी ठेवायला हवं, ज्यामुळे तुमच्या एसीच्या कंप्रेशरवरही ताण येत नाही. परिणामी वीज बचतही होते. अशा पद्धतीनं एसी आणि पंखा चालवल्यानं कमी विजेच्या बिलात अधिक गारव्याचा आनंद घेता येतो. याशिवाय थोड्यावेळानं एसी बंद करून संपूर्ण रात्रभर केवळ पंख्याच्या मदतीनं खोलीत गारवा टिकू शकतो. हेही वाचा-झोपेत पायदुखीच्या दुखण्यानं झालात हैराण?, या 5 घरगुती उपायांचा होईल फायदा कधी या पद्धतीचा अवलंब नाही करायचा? तुमची खोली जर आकारानं लहान असेल तर तुम्हाला या पद्धतीचा अवलंब करण्याची आवश्यकता नाही. या व्यतिरिक्त, तुमची खोली रस्त्याला चिटकून असेल आणि तिथे मोठ्या प्रमाणात धुळ उडत असेल तर अशा स्थितीत पंखा चालवू नये. असं केल्यानं एसीच्या फिल्टरवर धूळ जमा होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला सतत एसीचा फिल्टर बदलावा लागू शकतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle

    पुढील बातम्या