Home /News /lifestyle /

ICE CREAM जंक फूड आहे का? काय होतात त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम

ICE CREAM जंक फूड आहे का? काय होतात त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम

आईस्क्रिममध्ये (ICE CREAM) असणाऱ्या कॅलरीज, साखर, फॅट यामुळे शरीराला नुकसानदेखील पोहोचू शकतं.

    मुंबई, 10 सप्टेंबर : आईस्क्रीम न आवडणारी व्यक्ती जगात कुठेही नसेल. जगातील सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक आईस्क्रीम. सर्वच व्यक्ती मोठ्या आवडीने आईस्क्रीम खातात. लहानांपासून ते अगदी वयोवृद्ध व्यक्तींनादेखील आईस्क्रीम आवडते. थंड आणि विविध प्रकारच्या आईस्क्रीम आपण कोणत्याही ऋतूमध्ये खाऊ शकतो. काहीजणांचा हा खूप मोठा वीक पॉईंट देखील असतो. मात्र आईस्क्रीम चवीला जितकी चांगली असते तितकीच ती जास्त आणि अति प्रमाणात खाल्ली तर तिचे आपल्या शरीरावर प्रतिकूल परिणाम देखील होतात. आईस्क्रीममध्ये असणाऱ्या कॅलरीज, साखर, फॅट यामुळे शरीराला नुकसानदेखील पोहोचू शकतं. हे सर्व पदार्थ फास्टफूड आणि जंकफूडमध्ये मोडले जातात. त्यामुळे आईस्क्रिमचं अतिसेवन मानवी शरीराला घातक आहे. जंकफूड हे अतिप्रमाणात खाल्लं तर शरीराला चांगलं नसतं. त्यामध्ये असणारे विविध घटक तुमच्या शरीराला तात्पुरती ऊर्जा देतात मात्र त्याचं सेवन अतिप्रमाणात झाल्यास त्याचा तुम्हाला त्रास देखील होऊ शकतो होऊ शकतो. 1) भरपूर प्रमाणात साखर पदार्थांमध्ये असणारी सामग्री त्या पदार्थाला चव देत असते. त्यामुळे त्या पदार्थामध्ये कोणते घटक वापरण्यात आले आहेत त्यावर पदार्थाची पौष्टिकता अवलंबून असते. आईस्क्रीममध्ये मोठ्या प्रमाणात साखरेचा वापर केला जातो. साखर ही मानवी शरीरासाठी चांगली नाही. त्यामुळे तुम्ही किती आईस्क्रीम खाता यावर तुमच्या शरीरातील साखरेचं प्रमाण अवलंबून आहे. आईस्क्रीमचं योग्य प्रमाणात सेवन केल्यासच तुमची साखरेची पातळी योग्य राखण्यास तुम्हाला मदत होईल. 2) कॅलरीज अति प्रमाणात साखरेचं सेवन केल्यास तुम्हाला लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार तसंच लिव्हरसंबंधी आजार मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. आईस्क्रीममध्ये भरपूर साखर आणि फॅट असल्याने त्यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात की नाही हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात साखर असल्याने तुमच्या शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा निर्माण करण्यास आईस्क्रीम अपयशी ठरते. त्याचबरोबर ऊर्जेसाठी आवश्यक असणाऱ्या कॅलरीजदेखील कमी प्रमाणात असतात. 3) कृत्रिम घटक आईस्क्रीम तयार करताना कंपन्या नैसर्गिक घटक वापरण्याऐवजी कृत्रिम घटक वापरण्याला प्राधान्य देतात. त्याचबरोबर यामध्ये नैसर्गिक फळांचा रस किंवा गर न वापरता कंपन्या कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले फ्लेवर्स वापरतात. यामुळे तुमच्या शरीरावर याचा विपरित परिणाम होतो. हे वाचा - जमिनीवर पाठ टेकून झोपण्याचे 8 फायदे अन्न आणि औषध प्रशासनाने यापैकी काही कृत्रिम पदार्थांवर बंदी घातली आहे. यामध्ये असणाऱ्या घातक पदार्थांमुळे तुम्हाला भयंकर विकार देखील जडू शकतात. कॅन्सरसारखा भयंकर आजार देखील तुम्हाला यामुळे होऊ शकतो. 4)अस्वच्छ पदार्थ अनेकदा आईस्क्रीम बनवताना बर्फामध्ये कृत्रिम रंग वापरले जातात. यामधील अनेक रंग हे मान्यता असलेले असतात मात्र तरीदेखील त्यामध्ये असलेल्या घातक आणि अस्वच्छ पदार्थांमुळे मानवी शरीराला नुकसान होऊ शकतं. आईस्क्रीममध्ये असणारा Guar gum हा पदार्थ देखील मुलांच्या शरीरावर परिणाम करू शकतो. तसंच आईस्क्रीममध्ये वापरला जाणारा कॅरेजन हा पदार्थ देखील आतड्यासंबंधी आजारांसाठी कारणीभूत ठरू शकतो, असं संशोधनामधून समोर आलं आहे. त्यामुळे आईस्क्रीमची अति प्रमाणात सेवन करताना सावधानता बाळगायला हवी. 5) आहारी न जाणं आईस्क्रीम हा पदार्थ सगळ्यांनाच आवडतो. त्यामुळे अनेकदा याचे सेवन करताना व्यक्तीचा आपल्या मनावर ताबा राहत नाही. मात्र आपल्या शरीराकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. मात्र थंड आणि गोठवलेले पदार्थ अति प्रमाणात खाणं आपल्या शरीरासाठी चांगलं नाही. हे वाचा - सुशांत प्रकरणात Marijuana चा उल्लेख; काय आहे हा ड्रग आणि काय होतात त्याचे परिणाम आईस्क्रीम खाण्यासारख्या आनंद दुसरा कशातच नाही. मात्र यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही पदार्थाचं अतिसेवन हि गोष्ट वाईटच आहे. कोणत्याही गोष्टीला दुसरा पर्याय देखील असतो. त्यामुळे घरी बनवलेल्या वस्तू देखील उत्तम असतात. त्यामुळे यापुढे आईस्क्रीम खरेदी करताना आणि तिचे अति प्रमाणात सेवन करताना त्यावरील आरोग्य सूचनांचे वाचन करायला विसरू नका.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle

    पुढील बातम्या