मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /लसूण कोरोनाच्या उपचारात प्रभावी आहे का? जाणून घ्या काय आहेत त्याचे फायदे

लसूण कोरोनाच्या उपचारात प्रभावी आहे का? जाणून घ्या काय आहेत त्याचे फायदे

Garlic Effective in Corona Treatment : लसूण तेलाची जैविक क्रिया आणि गुणात्मक रचना याबाबत विश्लेषण केले जात आहे. हा अभ्यास COVID-19 च्या उपचारात लसूण तेलाचे फायदे समोर आणण्यात मदत करू शकतो.

Garlic Effective in Corona Treatment : लसूण तेलाची जैविक क्रिया आणि गुणात्मक रचना याबाबत विश्लेषण केले जात आहे. हा अभ्यास COVID-19 च्या उपचारात लसूण तेलाचे फायदे समोर आणण्यात मदत करू शकतो.

Garlic Effective in Corona Treatment : लसूण तेलाची जैविक क्रिया आणि गुणात्मक रचना याबाबत विश्लेषण केले जात आहे. हा अभ्यास COVID-19 च्या उपचारात लसूण तेलाचे फायदे समोर आणण्यात मदत करू शकतो.

नवी दिल्ली, 15 डिसेंबर : जगभरातील शास्त्रज्ञ आपापल्या स्तरावर कोरोनावर उपचार करण्यात गुंतले आहेत. जगातील अनेक देशांमध्ये विविध नैसर्गिक घटकांद्वारे त्यावर उपचार करण्याचे मार्ग शोधले जात आहेत. हिंदुस्थान वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, भारतीय शास्त्रज्ञ कोरोनाच्या उपचारासाठी लसणाच्या अर्काचा अभ्यास करत आहेत. अहवालानुसार, मोहालीमधील सेंटर ऑफ इनोव्हेटिव्ह अँड अप्लाइड बायोप्रोसेसिंग (CAIB) आणि फरीदाबादमधील रीजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी (RCB) चे शास्त्रज्ञ ACE2 प्रोटीनचे संभाव्य अवरोधक म्हणून लसूण तेल वापरण्यासाठी (Garlic Effective in Corona Treatment) संशोधन करत आहेत.

बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “लसूण तेलाची जैविक क्रिया आणि गुणात्मक रचना याबाबत विश्लेषण केले जात आहे. हा अभ्यास COVID-19 च्या उपचारात लसूण तेलाचे फायदे समोर आणण्यात मदत करू शकतो. त्यांनी पुढे सांगितलं की, अनेक बाबींवर याचा अभ्यास करण्यात आला आहे.

वृत्तानुसार, मोहालीच्या सेंटर ऑफ इनोव्हेटिव्ह अँड अप्लाइड बायोप्रोसेसिंगच्या शास्त्रज्ञ सुचेता खुब्बर यांनी सांगितले की, लसणात असलेली ऑर्गनोसल्फर आणि फ्लेव्होनॉइड संयुगं रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. ते म्हणाले, दैनंदिन आहारात लसूण आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांचं सेवन केल्याने रोगावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मुख्य औषधांमुळे होणारे दुष्परिणाम आणि विषारीपणा कमी होऊ शकतो.

शास्त्रज्ञांनी सांगितल की, अभ्यासानुसार, लसूण तेल हा महत्त्वाचा नैसर्गिक अँटीव्हायरस स्त्रोत आहे, जो मानवी शरीरात कोरोना विषाणूचा हल्ला रोखण्यात योगदान देतो. यूके आणि चीनमध्येही असेच अभ्यास केले जात आहेत.

आयुर्वेद डॉक्टरांचा दावा

-लसूण हे विषाणू आणि बॅक्टेरियाविरूद्ध प्रभावी नैसर्गिक प्रतिजैविकांपैकी एक आहे, असा आयुर्वेदिक डॉक्टरांचा दावा आहे.

-उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त

-सामान्य सर्दी आणि इन्फ्लूएंझाविरूद्ध पारंपरिक औषधांपैकी लसूण एक महत्त्वाचं औषध आहे.

-लसूण तेलामध्ये ऑर्गनोसल्फर संयुगे असतात. ते मजबूत अँटिऑक्सिडेंट, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीफंगल, अँटीकॅन्सर आणि प्रतिजैविक गुणधर्म दर्शवतात.

-2006 च्या अभ्यासात असे आढळून आले की कच्चा लसूण रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास तसंच, एथेरोस्क्लेरोसिसचा धोका कमी करण्यास मदत करू शकतो.

हे वाचा - जास्त वेळ एकाच जागी बसल्यानं रक्तप्रवाहावर होतो हा भयंकर परिणाम; या आजारांचा वाढतो धोका

-लसणाचं नियमित सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.

-लसूण हे व्हिटॅमिन B6 आणि C चा देखील चांगला स्रोत आहे. कार्बोहायड्रेटच्या चयापचयामध्ये हे घटक महत्त्वाच्या भूमिकेत असतात. रक्तातील साखरेची पातळी राखण्यात व्हिटॅमिन 'सी'देखील भूमिका बजावू शकतं.

लसूण जास्त खाण्याचे अनेक तोटे

रक्तस्त्राव होण्याचा धोका

लसूण हे नैसर्गिक रक्त पातळ करणारे मानले जाते, त्यामुळे जर तुम्ही त्याचे जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर वॉरफेरिन, ऍस्पिरिन सारखी औषधे एकत्र घेऊ नका. कारण, यामुळं तुमचं रक्त पातळ होऊ शकतं आणि त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकतं.

हे वाचा - Year Ender 2021: यंदाच्या वर्षी कोरोनाच नाही तर ‘या’ विषाणूंनीही हाहाकार उडाला होता! पुन्हा येण्याची भिती कायम

उलट्या आणि मळमळ कारण

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ यूएसने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, रिकाम्या पोटी लसणाचे सेवन केल्याने अनेकांना मळमळ, उलट्या आणि छातीत जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. वास्तविक, लसणात काही संयुगे असतात, ज्यामुळे आम्लपित्त होऊ शकते.

यकृतासाठी धोकादायक

अनेक अभ्यासांनुसार, लसणामध्ये अॅलिसिन नावाचे एक संयुग असते, जे जास्त प्रमाणात सेवन केल्यास यकृताला विषबाधा होऊ शकते.

First published:

Tags: Coronavirus, Health Tips