प्रेग्नन्सीत उपवास करावा की नाही? वाचा तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे

प्रेग्नन्सीत उपवास करावा की नाही? वाचा तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे

प्रेग्नन्सीत (pregnancy) योग्य आहार घेणं आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं, त्यामुळे उपवासाचा (fasting) परिणाम दोघांच्याही आरोग्यावर होतो.

  • Last Updated: Sep 23, 2020 02:14 PM IST
  • Share this:

बरेच लोक नियमितपणे उपवास (fasting) करतात. यामागे धार्मिक भावना जोडलेल्या असतात. मात्र उपवास केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. myupchar.com च्या डॉ.मेधवी अग्रवाल म्हणतात की, उपवासामुळे शरीरातील अशुद्धता दूर होते. शरीराची पचनप्रणाली देखील सुधारते. हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. पण जेव्हा आपण गर्भवती महिलांबाबत विचार करता त्यांनी उपवास करणं योग्य आहे की नाही, असा प्रश्न पडतो. गर्भधारणेदरम्यान उपवास करण्याबद्दल बरंच संशोधन केलं गेलं आहे, मात्र तज्ज्ञ अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत.

myupchar.com चे डॉ विशाल मकवाना यांनी सांगितलं, गरोदरपणात उपवास करणं हे गरोदरपणावर आणि प्रत्येक महिलेवर अवलंबून आहे. जर गरोदरपणात काही समस्या उद्भवत नसेल आणि त्या महिलेचं आरोग्य चांगलं असेल तर उपवासाने हानी होणार नाही, उलट त्यामुळे ऊर्जा मिळेल.

उपवासाचे काय दुष्परिणाम होऊ शकतात?

गर्भधारणेच्या तिसऱ्या महिन्यात उपवास करणं सुरक्षित समजलं जातं. पण तिसऱ्या महिन्यात बाळाला अनेक आवश्यक खनिजं आणि जीवनसत्त्वं आवश्यक असतात, म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

हे वाचा - 90% महिलांनी आपली किडनी देऊन वाचवला पतीचा जीव; पत्नीसाठी सरसावले फक्त 10% पुरुष

दुसरीकडे उन्हाळ्यातील उपवास डिहायड्रेशनला कारणीभूत ठरू शकतो. ज्यामुळे थकवा, अपचन आणि चक्कर या समस्या उद्भवू शकतात. मधुमेह असलेल्या महिलांसाठी उपवास योग्य नाही.

त्यातही ज्या महिलांनी रमजान किंवा नवरात्रीचे उपवास करण्याचा विचार केला आहे, त्यांनी अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. कारण ते जास्त दिवसांसाठी असतात.

उपवास करताना काय काळजी घ्याल?

डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर तुम्ही जर उपवास करणार असाल तर काही गोष्टींची काळजी घ्या. सर्वप्रथम केवळ तेच उपवास करा ज्यात फळे, रस किंवा दूध इत्यादी घेण्याची परवानगी आहे आणि त्याचं नियमित सेवन करा.

चहा आणि कॉफीचे सेवन करू नका ज्यामुळे वारंवार लघवी होऊ शकते आणि डिहाइड्रेशन होऊ शकतं.

भरपूर पाणी आणि ताज्या फळांचा रस प्या. उपवास सुरू करण्यापूर्वी थोडं जड अन्न खा. ज्यामुळे ते हळूहळू पचेल आणि बऱ्याच काळासाठी ऊर्जा मिळेल.

तसंच यावेळी आपली औषधं घेणं थांबवू नका.

हे वाचा - तुमची मुलंही बोलताना अडखळतात का? घरच्या घरी करा असा उपचार

कोणत्याही परिस्थितीत निर्जल व्रत करू नका. उपवासादरम्यान दोन ते तीन वेळा दूध प्या, जे शरीरातील कॅल्शियमची आवश्यकता पूर्ण करेल. थकवा येईल असं कोणतंही काम करू नका आणि लांब अंतर देखील चालू नका.

रमजानसाठी पौष्टिक इफ्तार म्हणजे संध्याकाळचे जेवण भरपूर कर्बोदकं, खनिजं आणि प्रथिनंयुक्त असावा. अशाप्रकारे सेहर म्हणजे सूर्य उगवण्याआधी आवश्यक पोषक द्रव्ये शरीरास मिळतील.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - गर्भधारणा

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: September 23, 2020, 2:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading