Home /News /lifestyle /

रात्री झोपण्यापूर्वी व्यायाम करणं योग्य की अयोग्य; शरीरावर काय होतो परिणाम?

रात्री झोपण्यापूर्वी व्यायाम करणं योग्य की अयोग्य; शरीरावर काय होतो परिणाम?

अनेकांना सकाळी व्यायाम (excercise) करणं शक्य होत नाही.

    मुंबई, 05 जून : अनेकांच्या दिवसाची सुरुवात व्यायामाने (excercise) होते, तर काही जणांना दिवसा व्यायाम करणं शक्य होत नाही. सामान्यपणे अनेक जण सकाळीच व्यायाम करतात. सकाळी व्यायाम केल्याने खूप फायदे होतात. मात्र सकाळी व्यायामाला वेळ मिळाला नाही तर रात्री झोपण्यापूर्वी व्यायाम (excercise before bed) करू शकतो का? झोपण्यापूर्वी व्यायाम केल्याने फायदे होतात का? असे प्रश्न आपल्याला पडतात. तज्ज्ञांच्या मते, ज्याप्रमाणे सकाळी व्यायाम करण्याचे बरेच फायदे आहेत तसेच रात्रीही व्यायाम करण्याचे फायदे आहेत. विशेषत: झोपेसंबंधी समस्या असल्यास रात्री व्यायाम करणं चांगलं आहे. माय उपचारवर डॉ. नबी वाली यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्हाला निद्रानाश किंवा इतर स्लीप डिसॉर्डर असेल तर रात्री झोपण्यापूर्वी व्यायाम करण फायद्याचं आहे, यामुळे तुम्हाला चांगली झोप लागते. रात्री झोपण्यापूर्वी व्यायाम करण्याचे फायदे काय आहेत? मसल रिकव्हरी रात्री व्यायाम करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या शरीरातील मसल रिकव्हरी लवकर होते. म्हणजे व्यायामुळे स्नायूंवर ताण येतो. या स्नायूंना आराम मिळतो. सकाळी व्यायाम केल्यानंतर दिवसभर जर आपण व्यस्त असू तर शरीराला पुरेसा आराम मिळत नाही, शरीर थकतं. हे वाचा - कोरोना लॉकडाऊनमुळे झालं ब्रेकअप; पुन्हा पॅचअप करायचंय? मग तुमच्यासाठी टीप्स ताण कमी होतो दिवसभर काम केल्याने मेंदूवरील ताण वाढतो, स्ट्रेस वाढतो. व्यायाम हा स्ट्रेस कमी करण्याचा उत्तम असा मार्ग आहे. शारीरिक कार्यांमुळे मेंदूतील अशा हार्मोन्सच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळतं ज्यामुळे ताण कमी होतं. झोपेची गुणवत्ता सुधारते व्यायामामुळे झोपेवर परिणाम होतं, असं सांगितलं जातं. मात्र तसं नाही. एक्सरसाइजनंतर चांगली आणि गाढ झोप लागते. एका अभ्यासानुसार झोपण्याच्या किमान एक तास आधी व्यायाम केल्याने चांगली झोप लागते.  स्ट्रेसमुळे निद्रानाशाची समस्या उद्भवते आणि व्यायामामुळे स्ट्रेस कमी होतो परिणामी निद्रानाशाची समस्याही कमी होते. हे वाचा - कोरोना लॉकडाऊनमध्ये वाया गेली दारू; आता वाचवणार लोकांचा जीव
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Workout

    पुढील बातम्या