मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कोरोना संपला का? राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या विधानानंतर WHO चा गंभीर इशारा

कोरोना संपला का? राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या विधानानंतर WHO चा गंभीर इशारा

कोरोना व्हायरस संपला आहे का? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन म्हणाले की, आता कोरोना संपला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर डब्लूएचओने इशारा दिला आहे.

कोरोना व्हायरस संपला आहे का? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन म्हणाले की, आता कोरोना संपला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर डब्लूएचओने इशारा दिला आहे.

कोरोना व्हायरस संपला आहे का? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन म्हणाले की, आता कोरोना संपला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर डब्लूएचओने इशारा दिला आहे.

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : जगभरातल्या अनेक देशांमधले लोक गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कोरोनामुळे त्रस्त आहेत. लॉकडाउनसारख्या कडक निर्बंधांमुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाला असला तरी कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. आता सर्वच गोष्टी हळूहळू सुरळीत होत असल्या तरी जागतिक आरोग्य संघटनेने लोकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी एका मुलाखतीत `आता कोरोनाचं संकट पूर्णतः दूर झाल्याचं दिसत आहे,` असं विधान केलं होतं. या विधानाचा संदर्भ घेत जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना अजूनही जागतिक आणीबाणी असल्याचं स्पष्ट केलं आहे. `इंडिया डॉट कॉम`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे. जगभरातील कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीचा विचार करता, सध्या जगात 618 दशलक्ष कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या विषाणूमुळे आत्तापर्यंत 65,35,808 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे 599 दशलक्ष रुग्ण या आजारातून पूर्ण बरे झाले आहेत, असं `वर्ल्डोमीटर`च्या आकडेवारीवरून दिसतं. भारत, फ्रान्स आणि ब्राझीलनंतर अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेला आहे, असं या आकडेवारीवरून दिसतं. मंगळवारच्या कोरोना अपडेटमध्ये जागतिक आरोग्य संघटना अर्थात `डब्ल्यूएचओ`नं सांगितलं की, जागतिक स्तरावर 12 ते 18 सप्टेंबर या आठवड्यात नवीन साप्ताहिक कोविड रूग्णांची संख्या मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिली. या कालावधीत 3.2 दशलक्षांहून जास्त नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत नव्या आठवड्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 17 टक्क्यांनी कमी झाली आहे. या कालावधीत 9800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, असं संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेनं म्हटलं आहे. दरम्यान, रविवारी प्रसारित झालेल्या एका मुलाखतीत अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी ``अमेरिकेत आता कोरोना महामारी संपली आहे, असं विधान केलं. पण दुसरीकडे पाहिलं तर अमेरिकेत कोरोनामुळे रोज शेकडो मृत्यू होत आहेत. `सीबीएस`ला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रपती बायडन म्हणाले, ``कोरोनाची समस्या आहे आणि अजूनही आम्ही त्यावर काम करत आहोत. पण ही महामारी (Pandemic) आता संपली आहे. तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला दिसेल की आता कोणीही मास्क वापरत नाही. प्रत्येकाची प्रकृती चांगली दिसत आहे. त्यामुळे मला वाटतं की आता हा आजार संपला आहे. त्यामुळे हे बदल दिसत आहेत.`` जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयसस यांनी गुरुवारी (22 सप्टेंबर) न्यूयॉर्क संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेप्रसंगी पत्रकारांशी बोलताना कोरोनाबाबतची एकूण स्थिती स्पष्ट केली. `एएफपी`नं दिलेल्या वृत्तानुसार, ते म्हणाले, ``कोरोना महामारी अजून संपुष्टात आलेली नाही. कोरोनाचा अंत दिसत असला तरी हा आजार संपला आहे किंवा संपुष्टात येत आहे, असा त्याचा अर्थ होत नाही.`` वाचा - गुडघेदुखीचा त्रास होईल कमी, आहारात या अँटी-इंफ्लेमेटरी पदार्थांचा करा समावेश जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2020 नंतर कोरोनामुळे मृत्युंची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. कोरोना अजूनही एक तीव्र जागतिक आणीबाणी आहे. 2022 मधील पहिल्या आठ महिन्यांत कोरोनामुळे 10 लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना अजून संपलेला नाही, असं घेब्रेयसस यांनी पुन्हा स्पष्ट केलं आहे. ``तीन चतुर्थांश आरोग्य कर्मचारी आणि वृद्धांसह जगातल्या दोन तृतीयांश लोकसंख्येचं कोविड लसीकरण झालेलं आहे. आपण एका गडद अंधार असलेल्या लांब अशा बोगद्यात अडीच वर्ष घालवली आहेत आणि त्या बोगद्याच्या शेवटी आपल्याला प्रकाशाची झलक दिसू लागली आहे. पण अजूनही आपण या अंधारातच चाचपडत आहोत. अजून आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे आणि बोगद्यात अजूनही अंधार आहे. जर आपण काळजी घेतली नाही तर समस्या वाढून आपल्याला त्रास होऊ शकतो कारण आपण अजूनही बोगद्यातच आहोत,`` असं घेब्रेयसस यांनी स्पष्ट केलं.
First published:

Tags: America, Corona

पुढील बातम्या