मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

बाळाची उंची वाढेना म्हणून नंतर पश्चाताप कराल! गरोदरपणात होणारी ही चूक टाळा

बाळाची उंची वाढेना म्हणून नंतर पश्चाताप कराल! गरोदरपणात होणारी ही चूक टाळा

काही महिलांना गरोदरपणात कॉफी पिण्याची आवड असते. कॉफीमध्ये कॅफिन असते, जे न जन्मलेल्या मुलाची उंची कमी करू शकते. याबाबत नुकताच झालेला अभ्यास जाणून घ्या.

काही महिलांना गरोदरपणात कॉफी पिण्याची आवड असते. कॉफीमध्ये कॅफिन असते, जे न जन्मलेल्या मुलाची उंची कमी करू शकते. याबाबत नुकताच झालेला अभ्यास जाणून घ्या.

काही महिलांना गरोदरपणात कॉफी पिण्याची आवड असते. कॉफीमध्ये कॅफिन असते, जे न जन्मलेल्या मुलाची उंची कमी करू शकते. याबाबत नुकताच झालेला अभ्यास जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 25 जानेवारी : गरोदरपणात महिलांनी खाण्यापिण्याबाबत सर्वाधिक काळजी घेणे आवश्यक असते. या काळात आहाराचा त्यांच्या आरोग्यावरच परिणाम होत नाही, तर गर्भातील बाळाच्या विकासावरही परिणाम होतो. डॉक्टर गर्भधारणेदरम्यान निरोगी आहार घेण्याची शिफारस करतात. काही स्त्रिया कॉफी आणि चॉकलेटच्या शौकीन असतात आणि गर्भधारणेदरम्यानही ते खाणे सुरू ठेवतात.

मात्र गरोदरपणातही यांचे सेवन करणे आईच्या गर्भातील बाळासाठी हानिकारक ठरू शकते. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे. या अभ्यासात असे आढळूले आहे की, कॅफीनयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने गर्भवती महिलांच्या बाळाची उंची कमी होते.

गरोदरपणात उसाचा रस पिण्याचे फायदे आणि नुकसान, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

नवीन अभ्यासात धक्कादायक खुलासा

मेडिकल न्यूज टुडेच्या अहवालानुसार, एका नवीन अभ्यासातून असे समोर आले आहे की, गर्भधारणेदरम्यान कॅफीनचे सेवन केल्याने बाळाच्या विकासावर लक्षणीय परिणाम होतो आणि त्याची उंची सुमारे 1 इंच कमी होते. हा अभ्यास JAMA मध्ये प्रकाशित झाला आहे. या अभ्यासात समाविष्ट असलेल्या महिलांपैकी ज्या महिलांनाही गरोदरपणात कॅफिनचे सेवन केले होते. त्यांच्या मुलांची उंची इतर महिलांच्या मुलांच्या तुलनेत सुमारे 1 इंच कमी असल्याचे नोंदवले गेले. याशिवाय मुलांच्या विकासावरही त्याचा बराच परिणाम दिसून आला. गर्भवती महिलांना देखील कॅफिनमुळे सौम्य डोकेदुखी, मळमळ आणि झोपेचा त्रास जाणवला.

कॅफिनच्या वापराबाबत संशोधकांमध्ये मतभेद आहेत

गर्भधारणेदरम्यान कॅफिनयुक्त पेयांचे सेवन करावे की नाही याविषयी संशोधकांमध्ये मतभेद आहेत. काही संशोधनांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, गर्भधारणेदरम्यान कॅफीनचे सेवन करणे फायदेशीर आहे, तर काही संशोधनांमध्ये ते हानिकारक असल्याचे सांगण्यात आले आहे. अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्टच्या मते, गर्भधारणेदरम्यान दररोज 200 मिलीग्रामपेक्षा कमी कॉफी घेणे सुरक्षित मानले जाते. हे प्रत्येक स्त्रीच्या आरोग्याच्या स्थितीवर देखील अवलंबून असते. अशा परिस्थितीत कॅफिन घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कोणत्या गोष्टींमध्ये कॅफिन असते?

अनेकांना कोणत्या गोष्टींमध्ये कॅफिन असते हे देखील माहीत नसते आणि ते नकळत कॅफिनचे सेवन करतात. हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, कॉफीमध्ये भरपूर कॅफिन असते. एक कप कॉफीमध्ये सुमारे 100 मिलीग्राम कॅफिन असते. याशिवाय कोको बीन्स, चॉकलेट, कोला नट, ग्रीन टी आणि एनर्जी ड्रिंक्समध्ये भरपूर प्रमाणात कॅफिन असते. जर तुम्ही कॉफी पिण्याचे शौकीन असाल तर गरोदरपणात 2 वेळा पेक्षा जास्त कॉफी पिणे टाळा. कारण ते हानिकारक ठरू शकते.

Pregnancy Diet Chart : 1 ते 9 महिन्यापर्यंत असा असावा गर्भवती महिलांचा आहार, प्रसूतीनंतर खा हे पदार्थ

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Pregnancy