गोव्यात ख्रिसमस साजरा करायचाय? 600 रुपयांत असा फिरता येईल संपूर्ण गोवा

थंडीच्या काळात आणि ख्रिसमसच्या सणामध्ये गोव्याला जाणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. स्वस्थ दरात गोवा फिरण्याची संधी IRCTC देत आहे.

  • Share this:

इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरीझम कॉर्पोरेशन लिमिटेडने फक्त 600 रुपयात संपूर्ण गोवा फिरण्याची संधी दिली आहे. या पॅकेजमध्ये तुम्ही दोन बाजू फिरू शकता. उत्तर गोवा, दक्षिण गोवा असे दोन बाजू फिरू शकणार आहात. IRCTC ने दिलेलं हे पॅकेज एक दिवसाचं आहे. 'HOP ON HOP OFF GOA BY BUS' असं या पॅकेजचं नाव आहे. या पॅकेजचा बुकिंग तुम्ही IRCTC च्या वेबसाईडवर करू शकता.

या पॅकजमध्ये तुम्ही बसच्या साहाय्याने एका दिवसात गोव्याचा सुंदर नजारा पाहू शकता. एका व्यक्तीसाठी 400 रुपयात उत्तर गोव्याचं पॅकेज उपलब्ध आहे. तर दुसरीकडे दक्षिण गोव्याचं पॅकेजचंही 400 रुपये आहेत. पण या पॅकेजमध्ये 600 रुपयात दोन्ही बाजू फिरायला मिळणार आहे.

उत्तर गोव्याच्या पॅकेजमध्ये साऊथ सेंट्रल गोवा, डोना पाऊल, गोवा सायन्स म्युझिअम, मिरमार बीच, काला अॅकॅदमी, भगवान महावीर गार्डन, पंजिम मार्केट, कॅसिनो पॉईंट, रिव्ह बोट क्रूझ आणि जुन्या गोव्यातील कॅथेड्रल, सेंट कॅथेड्रल चॅपल, एएसआय म्युझिअम आणि सेंट अगस्टीन या ठिकाणांचा समावेश आहे.

दक्षिण गोव्याच्या पॅकेजमध्ये अगौडा फोर्ट, सिन्कवॅरीअम किल्ला, कंडोलिम बीच, अॅन्थोनी चॅपल, सेंट एलेक्स चर्च, कलंगुट बीच, बागा बीच, अंजुना बीच, चपोरा फोर्ट आणि वॅगॅटर बीच या ठिकाणांची सफर तुम्ही करू शकता. तुम्ही जर सॅलानी पॅकेज घेतलं तर यासर्व ठिकाणांच्या व्यतिरिक्त माल डे गोवा आणि सॅलिगॉन चर्चसुद्धा फिरू शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2018 06:54 AM IST

ताज्या बातम्या