लाइफस्टाइल

  • associate partner

...जेव्हा IPL खेळाडूंना 'मासिक पाळी'च्या प्रश्नांचा करावा लागतो सामना

...जेव्हा IPL खेळाडूंना 'मासिक पाळी'च्या प्रश्नांचा करावा लागतो सामना

मासिक पाळीवर बोलू काही म्हणत क्रिकेटर्सनी महत्त्वाच्या अशा मुद्द्याला हात घालत त्यावर चर्चा केली आहे.

  • Share this:

मुंबई, 02 नोव्हेंबर : क्रिकेटर्स म्हटलं की सामान्यपणे क्रिकेटचीच चर्चा मात्र आता हेच क्रिकेटर मासिक पाळीबाबतही (menstrual period) बोलू लागले आहेत.  भारतात आणि जगभरातील विविध समाजात मासिक पाळीसंदर्भात उघडपणं बोललं जात नाही. त्याच मासिक पाळीबाबत आयपीएलमधील (ipl) राजस्थान रॉयल्सच्या (rajasthan rojyals) टिममधील खेळाडूंनी चर्चा केली आहे.

मासिक पाळीच्या जनजागृतीसाठी राजस्थान रॉयल्सने निने इंडिया (Niine India) या कंपनीसोबत करार आहे. या कंपनीमार्फत खेळाडूंसोबत विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खेळाडूंसाठी महिलांच्या मासिक पाळीसंबंधित प्रश्नांच्या रॅपिड फायर क्विझचं आयोजन करण्यात आलं होतं.

राजस्थान रॉयल्सच्या क्रिकेटर्सना मासिक पाळीसंदर्भात वैयक्तिक अनुभव विचारण्यात आला. शिवाय त्यांना विचारलेल्या सर्व प्रश्नांची त्यांनी प्रामाणिकपणे उत्तरं दिली.  राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रॉबिन उथप्पा याने रॅपिड फायर क्वीझचं संचालन केलं होतं. राजस्थानचा डेव्हिड मिलर, जोस बटलर आणि राहुल तेवतिया यांनी या विषयावर आपली मतं व्यक्त केली आणि विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली.

या क्वीझमध्ये रॉबिन उथप्पाने PMS म्हणजे काय त्याचा फुलफॉर्म विचारला. पण मिलरला premenstrual syndrome हे उत्तर देता आलं नाही. त्यानंतर त्याने मासिक पाळीविषयी तुला सर्वांत पहिल्यांदा काय सांगण्यात आलं आणि त्यावेळी तू किती वर्षांचा होतास असा प्रश्न विचारला. तसंच मासिक पाळी का येते आणि या मासिक पाळीसंदर्भात तू ऐकलेली सर्वांत विचित्र गोष्ट कोणती आहे, असेदेखील प्रश्न त्याला या क्वीजमध्ये विचारण्यात आले.

हे वाचा - IPL 2020: पती खेळाडू व पत्नी शिक्षिका! दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजाची Love Story

अनेकदा निषिद्ध समजल्या जाणाऱ्या मासिक पाळीविषयीच्या चर्चेचा हा व्हिडीओ राजस्थान रॉयल्सने आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर अपलोड केला आहे. चला मासिक पाळी या विषयावर चर्चा करू, असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ अपलोड केला आहे.

राजस्थान रॉयल्सने या आयपीएल स्पर्धेत Niine India बरोबर करार केला आहे. या कंपनीशी करार करणारी आयपीएलमधील राजस्थान ही पहिलीच टीम आहे. याचा मुख्य उद्देश या संघाने केलेल्या प्रत्येक धावामागे 9 मुलींना सॅनिटरी पॅड देणं.

हे वाचा - बेन स्टोक्सनं सांगितला त्याचा आवडता हिंदी शब्द अन् चाहत्यांना आली विराटची आठवण

दरम्यान काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर राजस्थानचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. या सामन्यात राजस्थानच्या संघाने सुरुवातीलाच आपल्या 5 विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे या सामन्यात कमबॅक करणं त्यांना शक्य झालं नाही.

Published by: Priya Lad
First published: November 2, 2020, 11:23 PM IST

ताज्या बातम्या