मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

विमानातून पडला iphone… मोडला नाही, तुटला नाही; उलट 2000 फूट उंचावरचा फ्री फॉल VIDEO झाला रेकॉर्ड

विमानातून पडला iphone… मोडला नाही, तुटला नाही; उलट 2000 फूट उंचावरचा फ्री फॉल VIDEO झाला रेकॉर्ड

2 हजार फुटांवरून कोसळून देखील फोनला काहीही झालं नाही. उलट फोन सुरू असताना हातातून पडला. त्यामुळे ते पडतानाचं सगळं रेकॉर्डिंग फोनमध्ये कैद झालं आहे.

2 हजार फुटांवरून कोसळून देखील फोनला काहीही झालं नाही. उलट फोन सुरू असताना हातातून पडला. त्यामुळे ते पडतानाचं सगळं रेकॉर्डिंग फोनमध्ये कैद झालं आहे.

2 हजार फुटांवरून कोसळून देखील फोनला काहीही झालं नाही. उलट फोन सुरू असताना हातातून पडला. त्यामुळे ते पडतानाचं सगळं रेकॉर्डिंग फोनमध्ये कैद झालं आहे.

ब्राझिलिया, 24 जानेवारी : कधी चुकून मोबाईल हातातून खाली पडला तरीदेखील आपल्या हृदयाचा ठोका चुकतो. जाणूनबुजून तर मोबाईल खाली टाकणे सोडाच. हा विचार देखील कधी कुणाच्या मनात येणार नाही. परंतु विमानातून मोबाईल खाली पडण्याची तुम्ही कधी कल्पना केली आहे का? परंतु ब्राझीलमधील एका डॉक्युमेंट्री फिल्मेकरच्या बाबतीत ही घटना घडली असून त्याचा आयफोन 6s (iphone6s) विमानातून थेट खाली पडला. महत्त्वाचं म्हणजे 2 हजार फुटांवरून खाली कोसळून देखील त्याच्या फोनला काहीही झाले नाही. त्याचबारोबर तो काम करत असताना त्याच्या फोनचा कॅमेरा सुरु होता. तो देखील बंद पडला नाही. या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण त्याच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाले असून याच्या व्हिडीओ देखील तयार झाला आहे. या व्हिडिओमध्ये केवळ अंधुक दिसत असून हा व्हिडीओ पूर्णपणे ब्लर चित्रित झाला आहे. या डॉक्युमेंट्री फिल्ममेकरचे नाव अर्नेस्टो गॅलिओट्टो असून त्याच्या सोबत ही घटना घडली आहे. ब्राझीलमधील G1 या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. याविषयी सविस्तर मिळालेली माहिती अशी की, गॅलिओट्टो हा एका प्रोजेक्ट्साठी विमानातून प्रवास करताना विमानाच्या खिडकीजवळ बसून फोटो काढत होता. ब्राझीलमधील रिओ डी जेनेरोमधील (rio de janeiro) एका बीचवरुन तो प्रवास करत होता. यावेळी वाऱ्याच्या मोठा झोत आला असता त्याचा आयफोन खाली पडला. इतक्या उंचीवरून फोन पडल्याने तो व्यवस्थित असेल की नाही याचा सर्वांना प्रश्न पडला होता. परंतु Find My app या अपमुळे तो फोन सापडला. तेथील एका समुद्रकिनारी तो मोबाईल आढळून आला. इतक्या उंचावरून पडून देखील मोबाईल सुस्थितीत होता. G1 या वृत्तसंस्थेबरोबर याविषयी बोलताना त्याने मला हा मोबाईल मिळेल याचा विश्वास होता असे म्हटले. जर मोबाईल पाण्यात पडला नाही तर नक्कीच मिळणार असा मला विश्वास होता. त्याचबरोबर फोनसोबत माझ्या खूप भावना जोडल्या गेल्या असल्याचे देखील त्याने सांगितले. 2 हजार फूट उंचावरून पडून देखील हा फोन सुरक्षित असल्याचे विश्वास बसत नसल्याचे देखील त्याने म्हटले. दरम्यान, इतक्या उंचावरून पडून देखील या फोनला काहीही झाले नसून केवळ थोडे स्क्रॅचेस पडले आहेत. या फोनला केवळ एक सिलिकॉन कव्हर आणि स्क्रीनगार्ड होते. यावर या अपघाताची खूण आढळून येत आहे. यापूर्वी देखील अशाच प्रकारची घटना घडली असून आईसलँडमधील एका फोटोग्राफरचा आयफोन 6s देखील अशाच पद्धतीने विमानातून खाली पडला होता. त्यानंतर 13 महिन्यांनी त्याला फोन पुन्हा सापडला होता.
First published:

Tags: Iphone, Social media, Viral

पुढील बातम्या