मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Intimate Hygiene : व्हजायनल हेल्थकडे दुर्लक्ष झाल्यास शरीर देते हे संकेत, वेळीच घ्या काळजी

Intimate Hygiene : व्हजायनल हेल्थकडे दुर्लक्ष झाल्यास शरीर देते हे संकेत, वेळीच घ्या काळजी

व्हजायनल हेल्थची काळजी घेणे खूप महत्वाचे असते. योनीमार्गाची स्वच्छता आपल्या शरीराच्या स्वच्छतेइतकीच महत्वाची असते. याकडे दुर्लक्ष झाल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

व्हजायनल हेल्थची काळजी घेणे खूप महत्वाचे असते. योनीमार्गाची स्वच्छता आपल्या शरीराच्या स्वच्छतेइतकीच महत्वाची असते. याकडे दुर्लक्ष झाल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

व्हजायनल हेल्थची काळजी घेणे खूप महत्वाचे असते. योनीमार्गाची स्वच्छता आपल्या शरीराच्या स्वच्छतेइतकीच महत्वाची असते. याकडे दुर्लक्ष झाल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

  मुंबई, 14 ऑगस्ट : आपल्याकडे अजूनही लैंगिक शिक्षण आणि लैंगिक स्वच्छतेबद्दल मोकळेपणाने बोललं जात नाही. यामुळे योनिमार्गाच्या स्वच्छतेबद्दल म्हणजेच व्हजायनल हेल्थबद्दल चुकीची माहिती आणि मिथकांमध्ये वाढ झाली आहे. मात्र व्हजायनल हेल्थची काळजी घेणे खूप महत्वाचे असते. योनीमार्गाची स्वच्छता आपल्या शरीराच्या स्वच्छतेइतकीच महत्वाची असते. याकडे दुर्लक्ष झाल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत, जी दिसल्यास तुम्ही समजून घ्यावे की, तुम्हाला व्हजायनल हेल्थची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. या लक्षणांद्वारे कळते तुम्हाला व्हजायनल हेल्थकडे लक्ष देण्याची गरज आहे खाज सुटणे हरजिंदगीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, स्वच्छता न बाळगल्यास योनीच्या बाह्य भागावर किंवा आतील भागात खाज सुटू शकते. जर खाज बाह्य असेल तर ते ऍलर्जीमुळे असू शकते आणि या प्रकरणात पुरळदेखील दिसू शकतात. ऍलर्जी नसल्यास व्हायरल किंवा बुरशीजन्य संसर्गामुळे खाज येऊ शकते. योनीच्या आत खाज सुटणे सहसा यीस्ट इन्फेक्शनमुळे होते.

  झपाट्याने वजन कमी झाल्यास दुर्लक्ष करू नका, डिप्रेशनसोबत कॅन्सरचाही वाढतो धोका

  लघवी करताना जळजळ होणे लघवी करताना जळजळ त्याठिकाणी जळजळ होणे हे लघवीच्या संसर्गामुळे असू शकते. संसर्ग शोधण्यासाठी तुमची लघवीची चाचणी घेणे महत्त्वाचे आहे. कोणताही संसर्ग नसताना, जळजळ होणे हे पोस्टमोनोपॉजल हार्मोन्सच्या नुकसानीमुळे असू शकते ज्यामुळे मूत्रमार्ग आकुंचन पावतो आणि स्त्रीला जळजळ झाल्याची भावना येते. योनीतून स्त्राव येणे ही योनीमार्गातील सर्वात सामान्य समस्यांपैकी एक आहे. मासिक पाळीच्या अगदी आधी स्पष्ट किंवा पांढरा स्त्राव होणे सामान्य आहे. पण जर तुमच्या योनीतून कलर डिस्चार्ज येत असेल तर तुम्ही सावध व्हायला हवे. अशा स्थितीत महिलेच्या योनीमार्गात खाज सुटते आणि त्यातून वास येतो. याशिवाय पिवळा, हिरवा, जाड पांढरा असा स्त्राव होत असेल तर डॉक्टरकडे निश्चित जावे. लाघवीवर नियंत्रण न राहणे काही स्त्रिया लघवीवर नियंत्रण ठेवू शकत नसल्याची तक्रारही करतात. हे सहसा मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे होते. पण जर महिलेला युरिन इन्फेक्शन होत नसेल तर ते लघवीच्या मार्गातील स्नायूंच्या कमकुवतपणामुळेही होऊ शकते. त्यामुळे महिलेला तिच्या लघवीवर नियंत्रण ठेवता येत नाही आणि ती अनपेक्षितपणे निघून जाते. फक्त फायदेच नाही तर जास्त पाणी पिण्याचे गंभीर तोटेही; शरीरावर होतात हे भयंकर परिणाम अचानक होणारा रक्तस्त्राव जर तुम्हाला तुमच्या मासिक पाळीव्यतिरिक्त अचानक रक्तस्त्राव होत असेल तर ते सामान्य नाही. सेक्सनंतर रक्ताचे डाग दिसू लागल्यास किंवा लघवीसोबत रक्तस्त्राव होत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अचानक योनीतून रक्तस्त्राव होण्याची अनेक कारणे असू शकतात. तुम्ही एकदा स्त्रीरोगतज्ञाला भेट देऊन तुमच्या सर्व आवश्यक चाचण्या करून घेणे योग्य राहील.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Lifestyle, Sexual health, Women

  पुढील बातम्या