प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर जय शेट्टीचा या इंटरनेट स्टारने केली पोलखोल, इंटरनेटवरून Quotes चोरले

प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर जय शेट्टीचा या इंटरनेट स्टारने केली पोलखोल, इंटरनेटवरून Quotes चोरले

जय शेट्टी सर्वात पहिल्यांदा लोकांच्या नजरेत तेव्हा आला जेव्हा त्याचं नाव Forbes 30 Under 30 मध्ये आलं.

  • Share this:

पौंगडावस्थेत अमली पदार्थांच्या आहारी गेल्यानंतर अचानक भिक्षूकी म्हणून आयुष्य जगणारा आणि नंतर  मोटिव्हेशनल स्पीकर झालेला जय शेट्टीचं आयुष्य हे एखाद्या सिनेमापेक्षा कमी नसेल. जयच्या मते, तो वयाच्या 22 व्या वर्षी भिक्षूक झाला आणि गुहेत बसून त्याने ध्यान केले. शेट्टीने 2016 मध्ये फेसबुक चॅनल सुरू केले. आतापर्यंत या चॅनलला 25 दशलक्षहून जास्त फॉलोवर्स आहेत. याशिवाय HuffPost Live वरील त्याचा सर्वात प्रसिद्ध शो #FollowTheReader लाखो लोक पाहतात. यात अनेक सेलिब्रिटीही येत असतात.

जय शेट्टी सर्वात पहिल्यांदा लोकांच्या नजरेत तेव्हा आला जेव्हा त्याचं नाव Forbes 30 Under 30 मध्ये आलं. याशिवाय त्याच वर्षात त्याला अनेक पुरस्कारही मिळाले. पण आता जय शेट्टी जे कोट शेअर करतो ते इतर सेलिब्रिटींचे असतात असा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. इंटरनेट सेलिब्रिटी निकोल आर्बरने या सर्वाचा खुलासा केला आहे. तिने जय शेअर करत असलेले अनेक कोट हे इतर सेलिब्रिटींचे असल्याचं म्हणत तो खोटारडा असल्याचं सांगितलं.

नुकताच तिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला यात तिने स्पष्ट म्हटलं की, मला अशी लोकं आवडत नाहीत जे लोकांना फसवतात. तो मूर्ख आहे आणि त्याचं करिअर ज्या गोष्टींवर उभं राहिलं ते सर्व त्याने चोरलेलं आहे. आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी तिने शेट्टीचे व्हायरल झालेले कोट आणि मूळ कोट शेअर केले. उदाहरणार्थ शेट्टीने "a relationship without trust is a like a car without gas...you can stay in it all you want but it won't go anywhere." हा कोट शेअर केला होता. पण हा कोट मिशेल जे हर्बट यांचा आहे.

याशिवाय "Most people never start because they don't want to be seen starting from the bottom. don't be MOST PEOPLE. want to start with me?" हा कोट उद्योजक अ‍ॅनी एस्कालिसिसने फेसबुकवर शेअर केला होता. त्यानंतर काही दिवसांनी जय शेट्टीने हाच कोट त्याचा म्हणून शेअर केला.

अपघातामुळे निकोल आर्बर अनेक दिवस बेडला खिळून होती. या दरम्यान ती तिचा दिवसातील अनेक तास इंटरनेटवर मोटिव्हेशनल स्पीकर आणि आयुष्याला प्रेरणा देणाऱ्या गोष्टी वाचायची. या दरम्यान तिला शेट्टीचा चोरटेपणा लक्षात आला.  यानंतर तिने शेट्टीने किती लोकांचे कोट चोरले याची यादीच तयार केली. दरम्यान, सोशल मीडियावर अनेकांनी निकोल आर्बरनं जय शेट्टीचा खोटारडेपणा समोर आणल्याबद्दल कौतुक केलं.

डायबेटीजच्या रुग्णांना असतो कॅन्सरचा सर्वाधिक धोका

अशीही लव्हस्टोरी! एकाचवेळी केलं दोघींशी लग्न, कारण आहे Romantic

VIDEO: सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याची सर्वांत मोठी मोहीम मुंबईत सुरू होणार

Published by: Madhura Nerurkar
First published: August 27, 2019, 5:22 PM IST
Tags: lifestyle

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading