International Yoga Day: ब्रेस्ट कॅन्सरसाठी जाणून घ्या योगाचे फायदे

International Yoga Day: ब्रेस्ट कॅन्सरसाठी जाणून घ्या योगाचे फायदे

international yoga day अनियमीत मासिक पाळी, पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव होणं, ब्लड क्लॉटिंग म्हणजे रक्ताच्या गुठळ्या होणे, पोटदुखी आणि शरीरात उर्जेची कमी अशा अनेक समस्यांना महिलांना सामोरं जावं लागतं.

  • Share this:

International Yoga Day: जगभरात 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. जगभरात योग दिवस साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे.२०१५ पासून दरवर्षी २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. पंतप्रधानांनी 27 सप्टेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत आपल्या भाषणावेळी योग दिवसाचा प्रस्ताव सादर केला होता. यानंतर हा प्रस्ताव मान्य होऊन २०१५ पासून योग दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होऊ लागला. योग हा शरीरासाठी जेवढा फायदेशीर आहे तेवढाच किंबहूना त्याहून जास्त फायदेशीर मानसिक पातळीवर आहे.

हेही वाचा- International Yoga Day योग करून या 5 अभिनेत्री ठेवतात स्वतःला फिट आणि सेक्सी

रक्तदाब, ह्रदयरोग, फुफ्फुसाचे आजार तसेच आरोग्याशी निगडीत इतर अनेक समस्यांवर योगअभ्यास प्रभावी ठरतं.  महिलांकरीता योग अतिशय फायदेशीर आहे. विशेषत: स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर), हार्मोनमधील असमतोल अशा समस्यांवर योग गुणकारी आहे. आज आम्ही तुम्हाला योगसाधनेचे स्तनाच्या कर्करोगासाठी होणाऱ्या फायद्यांबद्दल सांगणार आहोत. महिलांमध्ये होणाऱ्या हार्मोन असमतोलतेमुळे अनियमीत मासिक पाळी, पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव होणं, ब्लड क्लॉटिंग म्हणजे रक्ताच्या गुठळ्या होणे, पोटदुखी आणि शरीरात उर्जेची कमी अशा समस्या उद्भवतात. नियमित योग केल्यास या समस्यांपासून मुक्ती मिळेल.

हेही वाचा- स्वामी विवेकानंदानीही मानलं योगसाधनेचं महत्त्व, तुम्हीही जाणून घ्या याचे फायदे

बदलत्या जीवनपद्धतीमुळे अनेकांना लठ्ठपणाच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी योग नक्कीच फायदेशीर आहे. रोज योग साधना केल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते, स्नायू मजबूत होतात आणि दिवसभर शरीरात ऊर्जा कायम राहते. कोणत्याही प्रकारचे डाएट न करता फक्त नियमीत योग साधना केल्याने तुम्ही वजन कमी करु शकता.

रोजच्या जीवनातील ताणतणाव कमी करण्यासाठीही योग मदत करतो. एन्झायटी अॅण्ड स्ट्रेस असोसिएशन ऑफ अमेरिकामध्ये करण्यात आलेल्या संशोधनात सांगण्यात आले आहे की, योग केल्याने मेंदूत सकारात्मक विचार येण्यास सुरुवात होते. यामुळे मनःशांती मिळते आणि माणूस तणाव मुक्त आयुष्य जगू लागतो. श्वासासंबंधीत रोगांवरही योग प्रभावशाली आहे. नियमित योग साधना केल्याने स्तनाच्या कर्करोगावर फायदा होतो असे 2009 मध्ये झालेल्या एका अभ्यासात समोर आले आहे.

हेही वाचा- चाणक्य निती: यश येईल तुमच्या मागे, पण सावधान रहा या गोष्टींपासून...

VIDEO : सेटवर घुसून कलाकारांना रॉडने मारहाण, माही गिलला दुखापत

First published: June 20, 2019, 5:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading