मुंबई, 20 जून- International Yoga Day: जगभरात 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. भारताचा हा अमुल्य ठेवा जगाने मान्य केला असून तेही भारताच्या पावलांवर पाऊल ठेवत योगसाधना करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः नियमीत योगसाधना करतात. निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी योग करणं किती महत्त्वपूर्ण आहे हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. नियमीत योगासनं केल्यामुळे व्यक्तीचा भौतिक, आध्यात्मिक आणि मानसिक विकास होतो. योग माणसाच्या जीवनासाठी अतिशय फायदेशीर आहे, असंं स्वतः स्वामी विवेकानंदांनीही सांगितले आहे. योगाने शरीर, मन आणि जीवनाचा उत्तम ताळमेळ साधता येतो. त्याचसोबत योग तुम्हाला फक्त बाहेरूनच नाही तर अंर्तमनाने सुंदर करतं. खऱ्या अर्थाने आनंदी राहणं काय असतं हे तुम्हा- आम्हाला योगसाधना करूनच कळू शकेल. ही एका दिवसात होणारी गोष्ट नाही. याला सातत्य लागतं.
हेही वाचा- चाणक्य निती: यश येईल तुमच्या मागे, पण सावधान रहा या गोष्टींपासून...
रोजच्या धकाधकीच्या जिवनात सततच्या तणावामुळे अनेकांचं कामात लक्ष लागत नाही. एवढंच नाही तर एकाग्रता कमी होते, शरीरातील पेशींमध्ये ताळमेळ राहत नाही. अशा एक ना अनेक समस्या उद्भवतात. नियमीत योग केल्यास शारीरिक समस्यांसोबतच मानसिक पातळीवरही माणूस जास्त संयमी राहायला लागतो. कामाचा तणाव आणि वैयक्तिक आयुष्यातील चढ- उतारामुळे अनेकांना डिप्रेशन किंवा एन्झायटीसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. अशामध्ये योग मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतं.
फक्त 4 पद्धतींनी ब्रेकअपनंतरही एक्स सोबत ठेवता येऊ शकते मैत्री!
आता जसं तूप खाल्लं की रूप येत नाही त्याचप्रमाणे योगाचे परिणाम लगेचच दिसून येत नाहीत. मात्र त्याचे फायदे दीर्घकाळासाठी दिसून येतात. नियमीत योग साधनेने सकारात्मक परिवर्तन पाहायला मिळते. योगामुळे रक्तदाब, ह्रदयरोग, फुफ्फुसाचे रोग, रक्ताच्या गुठळ्या, पोटाचे आजार आणि दमा अशा गंभीर आजारांवर मात करण्यासाठी योगाची मदत होते. एवढंच नाही तर सध्या HIV रुग्णांवर योगाचा फायदा कसा होईल यावर अभ्यासक काम करत आहेत. आतापर्यंत हाती आलेले परिणाम हे सकारात्मक असल्याचे समजते.
VIDEO : सेटवर घुसून कलाकारांना रॉडने मारहाण, माही गिलला दुखापत
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा