मुंबई, 08 मार्च : अनेक फिनॅन्शियल प्राॅडक्टस् महिलांना समोर ठेवून तयार केले जातात. ICICI Bank नं अॅडव्हान्स ओरा सेव्हिंग अकाऊंट खास महिलांसाठी बनवलंय. हे सेव्हिंग अकाऊंट नोकरी करणाऱ्या महिलांसाठी आहे. याची खासीयत म्हणजे यात फ्री इन्शोरन्स, कॅशबॅक, डिस्काऊंट आणि कुठल्याही ATMमधून फ्री अनलिमिटेड ट्रान्झॅक्शनची सोय आहे. जाणून घेऊया या अकाऊंटबद्दल.
यात तुम्ही 5 प्रकारची अकाऊंट्स उघडू शकता. यात रेग्युलर, सिल्वर, गोल्ड, मॅग्नम आणि टाइटेनियम खाती आहेत. या प्रत्येक खात्याची वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत.
महिलांना मिळणार कॅन्सर प्रोटेक्शन
या सेव्हिंग अकऊंटद्वारे महिलांना कॅन्सर प्रोटेक्शन प्लान मिळू शकतो. शिवाय महिलांनी डेबिट कार्ड वापरलं तर त्यांना दर महिन्याला 750 रुपये कॅशबॅक मिळू शकतात. लाॅकरच्या सुविधेवर 50 टक्के सूट मिळणार.
अनलिमिटेड ट्रान्झॅक्शनची सुविधा
या खात्यात मिळणाऱ्या डेबिट कार्डातून महिला अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन करू शकतात. म्हणजे एका महिन्यात तुम्ही कितीही पैसे काढा त्याला काही चार्ज लागणार नाही. हे कार्ड नोकरी करणाऱ्या महिलांशिवाय व्यावसायिक महिलांनाही मिळू शकतं. महिला कुठलंही कर्ज घेऊ शकतात. याशिवाय खातेधारक महिलांना 40 लाख रुपयांचा अपघात विमा मिळू शकतो. तसंच 10 लाख रुपये वैयक्तिक अपघात विमाही मिळणार.
या अकाऊंटचे फायदे
या खात्याचं डेबिट कार्ड तुम्ही कुठल्याही बँकेच्या ATMमध्ये वापरू शकता. त्याला वेगळा दर पडणार नाही. याशिवाय टॅक्समध्येही डिस्काऊंट मिळेल. ट्रेडिंग अकाऊंटच्या जाॅइनिंग फीमधूनही सूट मिळणार.
या सर्व सुविधा खास स्त्रियांसाठी आहेत. ICICI बँकेनं मोठं पाऊल उचललंय.