International Tea Day: दिवस चहाप्रेमींचा, आरोग्यासाठी गुणकारी आहे चहा, जाणून घ्या फायदे

International Tea Day: दिवस चहाप्रेमींचा, आरोग्यासाठी गुणकारी आहे चहा, जाणून घ्या फायदे

International Tea Day चहा प्यायल्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते.

  • Share this:

मुंबई, 15 डिसेंबर: चहा हे ऊर्जा देणारं पेय समजलं जातं. चहामधून तुम्हाला साखर आणि दूध दोन्ही शरीरात गेल्यामुळे मेंदूला तरतरी येते. काहींना तर चहा घेतल्याशिवाय काम करण्याची तरतरी येत नाही. अगदी छोट्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत चहा हे प्रत्येक घरातलं आणि लोकांच्या मनातलं लोकप्रिय पेय आहे. शनिवारी आंतरराष्ट्रीय चहा दिन जगभरात साजरा करण्यात आला. यानिमित्तानं चहा आणि चहाचे फायदे काय आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनाक असं सांगण्यात आले आहे की, चहामध्ये तणाव दूर करण्याचे घटक असतात. संशोधनातून समोर आलेल्या अहवालानुसार याचा परिणाम शरीरावर चांगला येतो. थकवा आला असेल, तुम्ही तणावात असाल, आळस आला की लोक चहा पितात. त्यामुळे थकवा, आळस दूर निघून जातो.

दूधाच्या चहा इतकाच कोरा चहा, पुदीना, लेमन टी, आल्याचा चहा असे वेगवेगळ्या प्रकारचे चहा शरीरासाठी बदलत्या हवामानानुसार फायदेशीर असतात. चहामधील तुळस आणि आलं सर्दी खोकल्याच्या आजारापासून दूर ठेवते. तर चहाची पात ही विषाणूंसोबत लढण्याची क्षमता वाढते. चहातील वेलची श्वसनाचे आणि कफाच्या आजारांपासून तुम्हाला दूर ठेवते तर कोरा चहा प्यायल्यानं तुमच्या शरीरातील वजन कमी होतं.

नॅशनल यूनिवर्सिटी ऑफ सिंगापुरमधील सहाय्यक प्राध्यापक फेंग ली म्हणाले की, 'आम्ही केलेल्या संशोधनाच्या निष्कर्षात तर हेच समोर आलं की, चहा पिण्याचा आपल्या मेंदूवर सकारात्मक परीणाम होतो. नियमितपणे चहा प्यायल्याने मेंदू अधिक ताजातवाना राहतो आणि सुरक्षात्मक कवच तयार होतं.' याआधीच्या संशोधकांनीही सांगितले की, चहा पिणं हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. याशिवाय व्यक्तिच्या मूडवरही याचा सकारात्मक परिणाम होतो. हृदय रोगाशी संबंधीत अनेक रोगांवर नियंत्रण राहतं.

चहा पिणं जसं शरीरासाठी चांगलं आहे तसंच चहाचे इतर फायदेही आहेत. भाजल्यावर चहापावडर भिजवून फ्रीजमध्ये ठेवून त्याने शेक दिला जातो. त्याने लवकर फरक पडतो असं म्हणतात. मेहंदी भिजवण्यासाठी कोऱ्या चहाचा वापर करतात. त्यामुळे मेहंदीला रंग चांगला चढतो. त्यामुळे आरोग्यासाठी फादेशीर असणारा चहा अति नाही पण रोज घ्यायला काहीच हरकत नाही.

(टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.)

Published by: Kranti Kanetkar
First published: December 14, 2019, 2:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading