Home /News /lifestyle /

International Tea Day: चहाप्रेमींचा दिवस! या अमृततुल्य पेयामुळे मेंदूत नेमकं काय घडतं?

International Tea Day: चहाप्रेमींचा दिवस! या अमृततुल्य पेयामुळे मेंदूत नेमकं काय घडतं?

चहा आणि कॉफीमुळे पोटी समस्या उद्भवू शकते त्यामुळे जास्त प्रमाणात त्याचं सेवन करू नये.

चहा आणि कॉफीमुळे पोटी समस्या उद्भवू शकते त्यामुळे जास्त प्रमाणात त्याचं सेवन करू नये.

संयुक्त राष्ट्रसंघातर्फे आंतरराष्ट्रीय चहा दिवस (International Tea Day) 21 मे ला साजरा केला जातो. चहा हे ऊर्जा देणारं पेय समजलं जातं, पण चहा प्यायल्यावर मेंदूत नेमकं घडतं काय?

    मुंबई, 21 मे : संयुक्त राष्ट्रसंघातर्फे आंतरराष्ट्रीय चहा दिवस (International Tea Day) 21 मे ला साजरा केला जातो. चहा हे ऊर्जा देणारं पेय समजलं जातं, पण आपल्या देशात तर चहाला अमृततुल्य दर्जा आहे. चहा प्यायल्यावर मेंदूत नेमकं काय होतं? चहामधून तुम्हाला साखर आणि दूध दोन्ही शरीरात गेल्यामुळे मेंदूला तरतरी येते. काहींना तर चहा घेतल्याशिवाय काम करण्याची तरतरी येत नाही. अगदी छोट्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत चहा हे प्रत्येक घरातलं आणि लोकांच्या मनातलं लोकप्रिय पेय आहे. चहात असलेल्या टॅनिनमुळे मेंदुतल्या पेशींना तरतरी येते. त्या कार्यमग्न होतात. त्यामुळे उत्साह वाढल्यासारखा वाढतो. म्हणजेच तरतरी येते. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असं सांगण्यात आले आहे की, चहामध्ये तणाव दूर करण्याचे घटक असतात. संशोधनातून समोर आलेल्या अहवालानुसार याचा परिणाम शरीरावर चांगला येतो. थकवा आला असेल, तुम्ही तणावात असाल, आळस आला की लोक चहा पितात. त्यामुळे थकवा, आळस दूर निघून जातो. दूधाच्या चहा इतकाच कोरा चहा, पुदीना, लेमन टी, आल्याचा चहा असे वेगवेगळ्या प्रकारचे चहा शरीरासाठी बदलत्या हवामानानुसार फायदेशीर असतात. चहामधील तुळस आणि आलं सर्दी खोकल्याच्या आजारापासून दूर ठेवते. तर चहाची पात ही विषाणूंसोबत लढण्याची क्षमता वाढते. चहातील वेलची श्वसनाचे आणि कफाच्या आजारांपासून तुम्हाला दूर ठेवते तर कोरा चहा प्यायल्यानं तुमच्या शरीरातील वजन कमी होतं. लॉकडाऊनच्या काळात मोबाइलमध्ये या अॅप्सचा सर्वाधिक वापर, पाहा टॉप 10 लिस्ट नॅशनल यूनिवर्सिटी ऑफ सिंगापुरमधील सहाय्यक प्राध्यापक फेंग ली म्हणाले की, 'आम्ही केलेल्या संशोधनाच्या निष्कर्षात तर हेच समोर आलं की, चहा पिण्याचा आपल्या मेंदूवर सकारात्मक परीणाम होतो. नियमितपणे चहा प्यायल्याने मेंदू अधिक ताजातवाना राहतो आणि सुरक्षात्मक कवच तयार होतं.' याआधीच्या संशोधकांनीही सांगितले की, चहा पिणं हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. याशिवाय व्यक्तिच्या मूडवरही याचा सकारात्मक परिणाम होतो. हृदय रोगाशी संबंधीत अनेक रोगांवर नियंत्रण राहतं. लसीशिवायच होणार Coronavirus चा नाश; WHO च्या माजी संचालकांचा दावा चहा पिणं जसं शरीरासाठी चांगलं आहे तसंच चहाचे इतर फायदेही आहेत. भाजल्यावर चहापावडर भिजवून फ्रीजमध्ये ठेवून त्याने शेक दिला जातो. त्याने लवकर फरक पडतो असं म्हणतात. मेहंदी भिजवण्यासाठी कोऱ्या चहाचा वापर करतात. त्यामुळे मेहंदीला रंग चांगला चढतो. त्यामुळे आरोग्यासाठी फादेशीर असणारा चहा अति नाही पण रोज घ्यायला काहीच हरकत नाही. (टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.) अन्य बातम्या Amphan महाचक्रीवादळाचा विध्वंस या फोटोंतून आला समोर; 72 जणांचे गेले बळी लॉकडाऊनमुळे हरवलेले पिता सापडले, 3 वर्षांपूर्वी पडले होते घराबाहेर तीन महिन्याच्या विमान उड्डाणांसाठी प्रवासभाडे निश्चित,जाणून घ्या काय असणार किंमत
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Tea

    पुढील बातम्या