Home /News /lifestyle /

अखंड पानांचा की पावडरचा? जाणून घ्या कोणत्या प्रकारचा चहा असतो सर्वात चांगला

अखंड पानांचा की पावडरचा? जाणून घ्या कोणत्या प्रकारचा चहा असतो सर्वात चांगला

चहा पटकन तयार करायचा असल्यास डस्ट चहा चांगला आहे; जर तुम्हाला सर्व आरोग्याचे फायदे हवे असतील तर संपूर्ण पानांचा चहा उत्तम आहे, असे तज्ञ म्हणतात

    मुंबई, 21 मे : आपल्या देशामध्ये चहा (Tea) हे सर्वांत लोकप्रिय पेय (Popular Drink) आहे. देशाच्या बहुतेक भागांमध्ये नियमितपणे चहा प्यायला जातो. काही लोक तर इतके चहाप्रेमी (Tea Lovers) आहेत की दिवसातून कितीतरी वेळा आणि केव्हाही ते चहा पिऊ शकतात. तसं तर जगाच्या कानाकोपऱ्यात चहाचा प्रसार झालेला आहे. मात्र, भारताची गोष्ट काही निराळीच आहे. भारतीयांसाठी चहा हे फक्त पेय नाही तर एक ‘इमोशन’ आहे. चहासोबत कितीतरी लोकांच्या खास आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. चहाचा एक लहानसा कप कित्येकांच्या लव्ह स्टोरीचा, मित्रांच्या गप्पांच्या मैफिलीचा साक्षीदार ठरला आहे. अगदी लग्नासाठी मुलगी बघायला आल्यानंतरही तिला चहा करता येतो का?, हा प्रश्न आवर्जून विचारला जातो. एकूणच काय तर चहा हे पेय देशातील पाकसंस्कृतीचा (Culinary Culture) एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या चहाचे विविध प्रकार असतात याची तुम्हाला कल्पना आहे का? डस्ट टी (Dust Tea) आणि होल लीफ टी (Whole Leaf Tea) यातील फरक तुम्हाला माहिती आहे का? इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. चहाचं महत्त्व आणि लोकप्रियता साजरी करण्यासाठी दरवर्षी 21 मे रोजी इंटरनॅशनल टी डे (International Tea Day) साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकारानं हा दिवस साजरा केला जातो. यानुसार, आज भारतामध्येही टी डे साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर द टी हेवनच्या (The Tea Heaven) संस्थापक हर्षदा बन्सल (Harshada Bansal) यांनी चहाच्या दोन प्रकारांची माहिती दिली आहे. हर्षदा यांनी दिलेल्या माहितीनुसार, लूज लिव्ह्ज (Loose Leaves) आणि टी बॅग्ज (Tea Bags) अशा दोन प्रकारांमध्ये चहा मिळतो. बहुतेक लोक पारंपरिक पानांच्या चहाला (Traditional Leaf-infused Tea) पसंती देतात. तर, काही लोक टी बॅग्ज वापरतात. कारण त्यासाठी कमी मेहनत घ्यावी लागते. आपल्याला पाहिजे तसा चहा कसा बनवायचा याबद्दल प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो'. पानांचा चहा (Whole Leaf Tea) 'होल लीफ टी' हा चहा खराब न झालेल्या अखंड पानांपासून (Undamaged Leaves) तयार केला जातो. या प्रकारच्या चहाची चव (flavour) आणि क्वालिटी जास्त चांगली असते. या उलट टी बॅग्ज या बारीक पावडर आणि फॅनिंगपासून तयार केल्या जातात. बॅग्जमधील चहा अतिशय लहान आकाराच्या पानांपासून तयार केला जातो. जेणेकरून तो लवकर तयार होतो. तुम्ही चहाचे शौकीन असाल तर 'या' गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात! 'सामान्यपणे चहा पावडरचा केलेला चहा आणि चहाच्या पानांपासून केलेला चहा यामध्ये पानांचा चहा अधिक चवदार लागतो. सुट्ट्या पानांच्या चहापेक्षा पानांचा एकत्रित केलेला चहा ब्रेकफास्टवेळी घेतल्या जाणाऱ्या चहासारखा स्ट्राँग असतो. त्यामुळे त्यात चहाचा अधिक कडक स्वाद पिणाऱ्याला मिळतो. या तुलनेत टी बॅग्जमधील चहा कंटाळवाणा आणि एकाच चवीचा (One-note) वाटू शकतो. टी बॅग्जचा वापर करण्यास काहीही हरकत नाही. पण, जर तुम्हाला मनापासून चहा आवडत असेल तर लूज लीफ टी अधिक चांगला पर्याय आहे, असं हर्षदा म्हणाल्या. डस्ट टी (Dust tea) हा सर्वात कमी प्रत असलेला चहा असतो. म्हणजेच तुटलेली पानं गोळा करून ती कुस्करली जातात आणि त्यापासून डस्ट टी तयार होतो. यामध्ये चहाचे फक्त लहान कण असतात. टी बॅग्जमध्ये या प्रकारचा चहा भरला जातो. त्याची चव जास्त काळ आपल्या जिभेवर रेंगाळत नाही. कुठल्याप्रकारच्या चहाचा वापर करायचा हे आपल्या गरजेवर अवलंबून असल्याचं हर्षदा म्हणाल्या. पुढे त्या असंही म्हणाल्या की, 'तुम्हाला कमी वेळात चहा किंवा टी लाटे (Tea latte) तयार करायचा असल्यास डस्ट टी हा चांगला पर्याय आहे. पण, कमी चहा पावडरमध्ये दूध आणि साखर मिसळून तुम्हाला सर्व आरोग्यदायी फायदे, चव आणि गुणवत्ता हवी असल्यास संपूर्ण पानांचा चहा हा सर्वांत चांगला पर्याय ठरेल. अशा चहातून आनंद तर मिळेलच शिवाय पैसे वसूल (Value for Money) झाल्याचंही समाधान मिळेल.’ आंतरराष्ट्रीय चहा दिनी कोणता चहा प्यायचा हा निर्णय तुमचा, पण चहा प्या नक्की.
    First published:

    Tags: Health, Tea

    पुढील बातम्या