रात्री चांगली झोप घेण्यात भारतीय अव्वल- आंतरराष्ट्रीय सर्व्हे

दक्षिण कोरियामध्ये निद्रानाशने त्रस्त झालेले लोक सर्वाधिक आहेत. यानंतर दुसऱ्या स्थानावर येतो तो म्हणजे जपान.

News18 Lokmat | Updated On: Aug 21, 2019 01:23 PM IST

रात्री चांगली झोप घेण्यात भारतीय अव्वल- आंतरराष्ट्रीय सर्व्हे

जगभरातील 62 टक्के वृद्धांच्या मते, त्यांना रात्रीची हवी तशी झोप लागत नसल्याचं मान्य केलं. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे त्यांचा दिवसही फारसा उत्साही जात नाही. यातही दक्षिण कोरियामध्ये निद्रानाशने त्रस्त झालेले लोक सर्वाधिक आहेत. यानंतर दुसऱ्या स्थानावर येतो तो म्हणजे जपान. आंतरराष्ट्रीय सर्व्हेनुसार, रात्रीची चांगली झोप घेण्यात भारतीय सर्वात पुढे आहेत. यानंतर सौदी अरबचा नंबर येतो तर तिसऱ्या स्थानावर रात्री चांगली झोप घेण्यात चीनचा नंबर येतो. फिलिप्सकडून हा सर्व्हे ग्लोबल मार्केट रिसर्च फर्म केजेटी ग्रुपने 12 देशांमधील 18 वर्षांहून जास्त वयाच्या सुमारे 11 हजार 6 लोकांवर केला.

या सर्व्हेत जगातील वृद्ध रात्री जवळपास 6.8 तास झोपतात. तर सुट्टीच्या दिवसांमध्ये ते 7.8 तास झोपतात.  या सर्व्हेत हेही स्पष्ट करण्यात आलंय की दररोजची आठ तासांची झोप पूर्ण करण्यासाठी 10 पैकी सहा (जवळपास 63 टक्के) वयस्कर वीकेण्डला जास्त झोप घेणं पसंत करतात. मात्र 26 टक्के लोकांनी त्यांना नेहमी रात्री चांगली झोप लागते असं स्पष्ट केलं आहे. तर 31 टक्के लोकांनी सांगितलं की त्यांच्या झोप घेण्याच्या सवयीमध्ये कोणतेही बदल झाले नसल्याचं म्हटलं.

फिलिप्स ग्लोबल स्लीप सर्व्हे 2019 च्या रिपोर्टनुसार, कॅनडाचे 63 टक्के आणि सिंगापुरचे 61 टक्के लोकांमध्ये निद्रानाशची समस्या सर्वात जास्त आहे.

प्रेमात सीरियस नसतात या राशीची लोकं, जोडीदाराची करू शकतात सहज फसवणूक

रुबाब म्हणून नव्हे तर पान खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी 10 फायदे!

Loading...

फक्त 3 ते 4 हजारांमध्ये फिरू शकता या जागा

VIDEO : उदनराजे आणि सुनील तटकरे पक्ष सोडण्याची चर्चा, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2019 01:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...