मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /2 दशकांत नैसर्गिक संकटांचं प्रमाण झालं दुप्पट; UN ने इशारा देत जाहीर केली धक्कादायक आकडेवारी

2 दशकांत नैसर्गिक संकटांचं प्रमाण झालं दुप्पट; UN ने इशारा देत जाहीर केली धक्कादायक आकडेवारी

International Day for Disaster Risk Reduction निमित्त संयुक्त राष्ट्रांनी (UN) अतिवृष्टी, पूर, वादळं, दुष्काळ अशा जागतिक संकटांची आकडेवारी सादर केली. त्यातून हे भयानक वास्तव समोर आलं आहे.

International Day for Disaster Risk Reduction निमित्त संयुक्त राष्ट्रांनी (UN) अतिवृष्टी, पूर, वादळं, दुष्काळ अशा जागतिक संकटांची आकडेवारी सादर केली. त्यातून हे भयानक वास्तव समोर आलं आहे.

International Day for Disaster Risk Reduction निमित्त संयुक्त राष्ट्रांनी (UN) अतिवृष्टी, पूर, वादळं, दुष्काळ अशा जागतिक संकटांची आकडेवारी सादर केली. त्यातून हे भयानक वास्तव समोर आलं आहे.

वॉशिंग्टन, 13 ऑक्टोबर : हवामान बदलामुळे (climate change) नैसर्गिक आपत्तींचं (Natural Disaster) प्रमाण मागील दोन दशकांपेक्षा दुप्पट झालं असल्याचं सिद्ध झालं आहे. आपत्तींमध्ये होणारी वाढ त्याचसोबत जगभर पसरलेला कोरोना व्हायरस (Coronavirys )हा साथीचा आजार असे दाखवतो की माणूस जगाला या संकटातून वाचवण्यासाठी अपयशी ठरत आहे, असं संयुक्त राष्ट्रांनी (United nations) सोमवारी सांगितलं.‌

13 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय आपत्ती नियंत्रण दिन  (International Day for Disaster Risk Reduction)  असतो. त्यानिमित्त हा जागतिक डेटा सादर करण्यात आला. संयुक्त राष्ट्रांनी (UN) जागतिक स्तरावरील आपत्तींसंबंधी जाहीर केलेल्या अहवालानुसार 1980 ते 1999 पर्यंत गेल्या दोन दशकांत नैसर्गिक आपत्तींची संख्या 3,656 होती ती दुप्पट होऊन 2000 ते 2019 दरम्यान 6,681 झाली आहे.

2000 ते 2019 पर्यंत पूर आणि वादळांत एकूण पन्नास टक्के हिस्सा होता परंतु आता दुष्काळ, वणवे आणि उष्माघात ही संकटं वाढली आहेत.

आपत्ती जोखीम कक्षातील अमेरिकेचे सरचिटणीस ममी मिझटोरी म्हणाल्या  ‘ आपण स्वत: होऊन पायांवर धोंडा पाडून घेत आहोत. जागतिक तापमानवाढीचं संकट माहीत असूनही कोणताच देश हा ऱ्हास रोखण्याचा प्रयत्न करत नाही,’ ‌

कोविड-19 हा या बाबतीतला एक पुरावा आहे त्याबाबत राजकीय आणि व्यावसायिक नेत्यांना अपयश येत आहे.

मागील 20 वर्षात 7,350 भूकंप आणि त्सुनामी झाल्या ज्यात 1.2 दशलक्ष लोकांनी आपला जीव गमावला तर 4.2 अब्ज लोकांना याचा फटका बसला आहे.

त्यात 3 ट्रिलीयन डॉलर इतके जागतिक नुकसान झाले आहे.

बेल्जियमच्या सेंटर फॉर रिसर्च ऑन डिझास्टर्स ऑफ एपिडिमियोलॉजीच्या देवरती गुहा सपीर म्हणाल्या, ‘ जरी गेल्या दोन दशकांत मोठ्या आपत्तींचं प्रमाण वाढलं असलं तरीही विविध देशांतील सरकारांनी अशा आपत्तींत व्यवस्थापनाचं काम उत्तम केलं आहे आह त्यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचले. भारत आणि बांगलादेशाने पूर व्यवस्थापनात लोकांना सुरक्षित स्थळी हलवून खूप मोठं काम केलं आहे.’

परंतु ग्लोबल वॉर्मिगला (Global warming) 1.5 अंश सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवण्याच्या उद्दीष्टानुसार ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन कमी करण्यासाठी अनेक देश अपयशी ठरले आहेत असेही सांगितले.

तसेच जगभरात पसरलेल्या कोरोनाव्हायरसमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी सुद्धा कितीतरी देशांनी पुरेसे काम केले नाही. असं UN नी या अहवालात म्हटलं आहे.

गुहा सपीरने सांगितले की, येत्या 20 वर्षात हवामान होणारा बदल असाच राहिला तर मानव जातीचे भविष्य संकटात आहे. असे होऊ नये म्हणून जगाने हवामान बदलांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य तातडीने सुरू केले पाहिजे.

2015 मध्ये हवामान बदलांपासून बचाव करण्यासाठी पॅरिस करार आपत्ती जोखीम व्यवस्थापन यांनी  2030 विकासाचे उद्दिष्ट ठेऊन कामे पूर्ण करण्याचे आव्हान सरकारांना देण्यात आले.

2020 पर्यंत आपत्ती जोखीम कमी करण्याबाबत राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर काम करण्यास युएनच्या सदस्य देशांनी सहमती दिली होती. परंतु आतापर्यंत 90 हून अधिक देशआंनी कार्यवाहीच केलेली नाही.

First published:
top videos