Home /News /lifestyle /

डॉक्टरची भन्नाट करामत: इंजेक्शन देऊनही चिमुरडा खुदूखुदू हसला, पाहा VIDEO

डॉक्टरची भन्नाट करामत: इंजेक्शन देऊनही चिमुरडा खुदूखुदू हसला, पाहा VIDEO

इंजेक्शन देताना लहान मुलंच काय पण मोठी माणसंही घाबरतात. पण या डॉक्टरने अशी काही करामत केली की, सई टोचूनसुद्धा चिमुरडा हसत होता. असा डॉक्टर तुमच्या लहानपणी होता का?

    मुंबई, 05 डिसेंबर: लहान मुलं खूपच गोड असतात. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू नेहमी टिकून रहावं यासाठी त्यांचे आईवडील आणि सगळे कुटुंबीय फारच फारच मेहनत घेतात. पण लहान मुलांना डॉक्टरकडे नेण्याची वेळ आली आणि त्यातून त्यांना इंजेक्शन टोचायचं असेल तर सगळंच कठीण होऊन बसतं. एकदा डॉक्टरने इंजेक्शन दिलं की, ही मुलं मोठ्यानं भोकाड पसरतात. पण एक डॉक्टर असाही आहे जो इंजेक्शन देऊन सुद्धा मुलांना हसवत राहतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा डॉक्टरांकडे इंजेक्शन घेण्यासाठी आलेला असतो. त्याच्या वडिलांनी त्याला घट्ट धरलेलं आहे. डॉक्टर त्याला इंजेक्शन देण्याआधी खूप हसवतात. त्याचे लाड करतात. डॉक्टरांच्या करामती पाहून मुलगा हसायला लागतो आणि मुलगा हसत असतानाच डॉक्टर त्याला इंजेक्शनची सुई टोचतो. मुलगा हसण्यामध्ये एवढा गुंग झालेला असतो की, त्याला समजतही नाही नक्की आपल्याला काय केलं. तो डॉक्टरांकडे निरखून पाहात राहतो. हा व्हिडीओ बघून आपल्याही चेहऱ्यावर हसू फुलतं, आणि त्या डॉक्टरांचं कौतुक वाटतं. हा व्हिडीओ Biutengbieden या ट्वीटर यूझरने शेअर केला आहे. या व्हिडीओला एका दिवसात 36 लाखांपेक्षा पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. तर 2300 जणांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. या व्हिडीओला 200 पेक्षा जास्त कॉमेंट्स आल्या आहेत. या व्हिडीओमध्ये तो डॉक्टर मुलाला इंजेक्शन देताना एक गाणंही म्हणताना दिसत आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Small baby, Viral video.

    पुढील बातम्या