Home /News /lifestyle /

Instagram वरील फोटोमुळे अडकला विमा, पण कोर्टाने मिळवून दिले 17 कोटी रुपये!

Instagram वरील फोटोमुळे अडकला विमा, पण कोर्टाने मिळवून दिले 17 कोटी रुपये!

विमा कंपनीने नताशाच्या इन्स्टाग्राम पोस्ट्सचा (Instagram Posts) वापर करून तिला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला.

विमा कंपनीने नताशाच्या इन्स्टाग्राम पोस्ट्सचा (Instagram Posts) वापर करून तिला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला.

विमा कंपनीने नताशाच्या इन्स्टाग्राम पोस्ट्सचा (Instagram Posts) वापर करून तिला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला.

    मुंबई, 27 जानेवारी : भविष्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण विमा (Insurance) काढतो; पण काही वेळा त्यात अशी काही कलमं (Clause) असतात की, ज्यामुळे आपले हक्काचे पैसे मिळवण्याकरिता आपल्याला न्यायालयात (Court) धाव घ्यावी लागते. एका ब्रिटिश महिलेच्या बाबतीत असंच काहीसं घडलं. विम्याच्या दाव्याचे पैसे न देता या महिलेवर इन्शुरन्स कंपनीने विचित्र आरोप केले; मात्र न्यायालयाने विमा कंपनीचे सर्व दावे फेटाळून लावले आणि या महिलेला 17 कोटी रुपयांची नुकसानभरपाई (Compensation) देण्याचे आदेश दिले. 34 वर्षांची नताशा पामर (Natasha Palmer) मीडिया एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत होती. मद्यधुंद अवस्थेत असलेला ड्रायव्हर चालवत असलेल्या दुसऱ्या एका कारने 2014 साली तिच्या कारला धडक दिली. या अपघातामुळे नताशाच्या प्रकृतीवर वाईट परिणाम झाला. तिला सामान्य जीवन जगणंही मुश्किल झालं. हे प्रकरण साधं असलं तरी नताशाचा हा दावा विमा कंपनीने (Insurance Company) स्वीकारला नाही आणि तिला 17 कोटी रुपये देण्यास नकार दिला. इन्स्टाग्रामवरचे फोटोज पाहिल्यानंतर कंपनीनं केला दावा 'मिरर'च्या वृत्तानुसार, विमा कंपनीने नताशाच्या इन्स्टाग्राम पोस्ट्सचा (Instagram Posts) वापर करून तिला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला. तसंच तिची दुखापत, वेदना गांभीर्यानं घेतल्या नाहीत. विमा कंपनीनं नताशाच्या अॅक्टिव्हिटी जाणून घेण्यासाठी तिची सोशल मीडिया अकाउंट्स (Social Media Account) ट्रॅक केली आणि तिचे फोटो, व्हिडिओज न्यायालयात सादर केले. तिला अपघातामुळे शारीरिक नुकसान झालं होतं, तर ती ग्लॅमरस जीवनाचा आनंद कसा घेऊ शकते, असा प्रश्न कंपनीनं उपस्थित केला. विमा कंपनीनं न्यायालयात शेकडो फोटो आणि व्हिडिओ सादर करून, नताशा खोटं बोलत असल्याचा आरोप केला. महिलेला नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश नताशाने लंडनच्या न्यायालयात मद्यधुंद ड्रायव्हरविरोधात खटला दाखल करताना सांगितलं की, 'या अपघातामुळे माझ्या मानसिक अवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. माझ्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला असून, मी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. माझ्यात दृष्टीदोष निर्माण झाला असून, चक्करदेखील येते.' या वेळी नताशाने न्यायालयात वैद्यकीय कागदपत्रं पुरावे म्हणून सादर केले. त्यानंतर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देऊन विमा कंपनीचे सर्व दावे फेटाळून लावले आणि नताशाला 17 कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. 'सोशल मीडियावरच्या ग्लॅमरस फोटोजवरून तिला मानसिक समस्या नव्हती, हे सिद्ध होत नाही,' असं न्यायालयानं नमूद केलं. या घटनेनंतर नताशाला ना कुठे नोकरी मिळाली आणि ना ती सामान्य जीवन जगू शकली. त्यामुळेच ही नुकसानभरपाई तिला मिळाल्यामुळे तिला दिलासा मिळाला आहे.
    First published:

    Tags: Insurance

    पुढील बातम्या