मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /दररोज पुरेशी झोप न घेतल्यास होऊ शकतात `हे` गंभीर आजार; आयुष्य होईल 12 टक्क्यांनी कमी

दररोज पुरेशी झोप न घेतल्यास होऊ शकतात `हे` गंभीर आजार; आयुष्य होईल 12 टक्क्यांनी कमी

पुरेशी झोप न घेतल्यास शरीराच्या तीन प्रमुख अवयवांवर, तसंच शारीरिक यंत्रणेवर गंभीर परिणाम होऊ शकतात.

पुरेशी झोप न घेतल्यास शरीराच्या तीन प्रमुख अवयवांवर, तसंच शारीरिक यंत्रणेवर गंभीर परिणाम होऊ शकतात.

पुरेशी झोप न घेतल्यास शरीराच्या तीन प्रमुख अवयवांवर, तसंच शारीरिक यंत्रणेवर गंभीर परिणाम होऊ शकतात.

  नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर:  चांगल्या आरोग्यासाठी (Health hazards of insufficient sleep ) पोषक आहार, व्यायाम आदी गोष्टी जशा आवश्यक असतात, तशीच पुरेशा प्रमाणात झोपदेखील (Sleep). दररोज पुरेशी झोप घेणं हे प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचं असतं. परंतु, सध्याच्या काळात धावपळीच्या जीवनशैलीमुळे दैनंदिन झोपेचा कालावधी काहीसा विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतं. शांत झोप येत नाही, झोपेत मधेच जाग येते, लवकर झोप लागत नाही अशा अनेक समस्या अनेकांमध्ये पाहायला मिळतात. झोप न आल्याने किंवा झोपेचं गणित बिघडलं असल्यास अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. सर्वसामान्यपणे माणसाला सहा तास शांत झोप गरजेची असते. परंतु, रात्री लवकर झोप न येणं आणि सकाळी लवकर न उठल्यानंदेखील आरोग्यविषयक तक्रारी सुरू होतात. पुरेशी झोप न घेतल्यास शरीराच्या तीन प्रमुख अवयवांवर, तसंच शारीरिक यंत्रणेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. याबाबतच्या संशोधनाचं वृत्त `आज तक`ने दिलं आहे.

  अनेक जण कमी प्रमाणात का झोपतात, या विषयावर करण्यात आलेल्या अभ्यासाबद्दलचा एक लेख नुकताच सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. योग्य झोप न घेतल्यास त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. पुरेशी झोप न घेण्यामागे अनेक कारणं असू शकतात. यात ध्वनी, प्रकाश प्रदूषण, तणाव, चिंता, अपमान होणं, फसवणूक होणं, सामाजिक आणि आर्थिक स्थिती, कामाच्या वेळा आदी कारणांचा समावेश होतो, असं या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे.

  रात्रीच्या वेळी 6 तासांपेक्षा कमी वेळ झोप घेत असाल, तर तुमचं आयुर्मान (Life Span) 12 टक्क्यांनी कमी होतं. याचाच अर्थ तुम्हाला अपमृत्यूचा धोका असतो, असं एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे दररोज 6 ते 8 तास शांत झोप घेण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे.

  आवश्यकतेएवढी झोप न घेतल्यास शरीराची इम्युन सिस्टीम (Immune System) कमकुवत होऊ लागते. यामुळे सर्दी, खोकला होण्याची शक्यता वाढते. कोरोना काळात खोकला होणं ही धोक्याची घंटा असू शकते. तसंच इम्युन सिस्टीम लशी (Vaccine) आणि औषधांनुसार कार्य करू शकत नाही. त्यामुळे कोणताही आजार बरा होण्यास बराच वेळ लागतो.

  OMG! या अवलियानं जमवल्या 10 लाख सिगरेट; वाचा, फिटनेसची अनोखी कहाणी

  एखादी व्यक्ती शांत आणि पुरेशा झोपेचा आनंद घेऊ शकत नसेल, तर त्या व्यक्तीला उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शन (Hypertension) होण्याची शक्यता असते. काही काळ ही स्थिती कायम राहिल्यास अशा व्यक्तीला हार्ट अॅटॅक (Heart Attack) किंवा स्ट्रोक (Stroke) येण्याची शक्यता असते. त्यामुळे हृदयविकाराला दूर ठेवण्यासाठी डॉक्टर पुरेशी झोप घेण्याचा सल्ला देतात.

  कमी प्रमाणात झोप घेतल्यानं पचनशक्तीवर विपरीत परिणाम होतो. यामुळे शरीरातलं पित्ताशय आणि स्वादुपिंडाच्या (Pancreas) कार्यात अडथळा निर्माण होतो. परिणामी वजन वाढू लागतं. शरीर इन्शुलिनला (Insulin) प्रतिकार करू लागतं. असं होऊ लागलं तर टाइप-2 डायबेटीस होण्याची शक्यता वाढते. डायबेटीस (Diabetes) आणि उच्च रक्तदाब हे आजार एकाच वेळी झाले तर धोका अधिक वाढतो.

  भारतात या ठिकाणी गुरुत्वाकर्षणच नाही? बंद कारही चढते चढण

  योग्य झोप न मिळाल्यानं मेंदू सतर्क (Alertness) राहू शकत नाही. कमी झोपेमुळे मेंदूची सतर्कता हळूहळू कमी होऊ लागते. त्यामुळे दैनंदिन व्यवहारात चुका वाढू लागतात, अपघाताची शक्यता वाढते. कमी झोप घेतल्यामुळे निर्णयक्षमतेवरही परिणाम होतो. तणाव आणि अस्वस्थता वाढते. ही स्थिती गंभीर झाल्यास संबंधित व्यक्तीला डिमेन्शिया किंवा अल्झायमरसारखे विकार जडू शकतात. त्यामुळे दररोज पुरेशी आणि शांत झोप घेऊन आजारांना दूर ठेवणं हे श्रेयस्कर ठरू शकतं.

  First published:
  top videos

   Tags: Health, Sleep, Sleep benefits