मूळ सेमी न्यूड फोटो सोडून विडंबनात्मक पोस्ट केली सेन्सॉर; Instagram वर होतेय टीका

मूळ सेमी न्यूड फोटो सोडून विडंबनात्मक पोस्ट केली सेन्सॉर; Instagram वर होतेय टीका

ऑस्ट्रेलियातल्या विनोदी कलाकार महिलेने Victoria's Secret या अंतर्वस्त्रांच्या जाहिरातीतल्या मॉडेलची नक्कल म्हणून एक पोस्ट केली. ती सेमी न्यूड म्हणून Instagram ने आक्षेपार्ह ठरवली, पण मूळ मॉडेलल्या अर्धनग्नतेवर मात्र आक्षेप घेतला नाही.

  • Share this:

मेलबर्न, 22 ऑक्टोबर : प्रसिद्ध अंतर्वस्त्रांचा जागतिक ब्रँड असणारा Victoria's Secret च्या मॉडेलची विडंबनात्मक नक्कल करणाऱ्या विनोदी कलाकाराची पोस्ट Instagram ने काढून टाकली. त्याबद्दल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चहू बाजूने टीका होत आहे. ऑस्ट्रेलियन विनोदी कलाकार सेलेस्टे बार्बरने व्हिक्टोरिया सिक्रेटने केलेल्या जाहिरातीचीच कॉपी करत सेमी न्यूड फोटो काढला आणि त्यावर वेगळ्याच ओळी लिहून पोस्ट केला. पण लैंगिकतेला उत्तेजना देणारी पोस्ट केली म्हणून सेलेस्टेचा फोटो सेन्सॉर करण्यात आला. पण व्हिक्टोरिया सिक्रेटची मॉडेल कँडिस स्वानिपोएलचा मूळ फोटोवर मात्र इन्स्टाग्रामने आक्षेप घेतला नाही.

बार्बरच्या पोस्टला सेन्सर केल्याबद्दल इन्स्टाग्राम जणू निंदा आणि टीका यांच्या आगीत सापडलं आहे. शुक्रवारी शेअर केलेल्या पोस्टमध्ये, बार्बरने व्हिक्टोरियाच्या सीक्रेट मॉडेल कँडिस स्वानिपोएलच्या पोर्ट्रेटच्या पोझची नक्कल करत स्वतःचा एक फोटो पोस्ट केला होता.

बार्बरने तिच्या #CelesteChallengeAccepted  सिरीजमध्ये विडंबनात्मक अनेक फोटो आपल्या 73 लाख प्रेक्षकांसाठी पोस्ट केले आहेत, असं गार्डियनने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. व्हिक्टोरिया सिक्रेटच्या पोर्ट्रेटमध्ये स्वानिपेल तिचे स्तन हातात धरून बसलेली आहे आणि एका बाजूने तिचे स्तन दिसत आहेत. हुबेहुब त्या बोझमधला फोटो बार्बरने पोस्ट केला आहे. पण आपल्या चेहऱ्यावरील भाव काहीसे बदलले आहेत. भयंकर दमल्याचे भाव चेहऱ्यावर आणले आहेत. "जेव्हा तुम्ही थकून भागून जरा बसता आणि तुमचं मूल प्यायला मागतं.."  या फोटो ओळीमधून अर्थातच बार्बरचा विडंबनाचा प्रयत्न स्पष्ट दिसतो.

दोन्ही फोटो दिसायला एकसारखे असूनही भाव आणि अर्थ मात्र वेगवेगळा आहे. इन्स्टाग्रामने मूळ लैंगिक आकर्षणाचा भाग वाटणारी पोस्ट आक्षेपार्ह न ठरवता बार्बराची पोस्ट आक्षेपार्ह ठरवल्याने नेटिझन्स चिडले. ही पोस्ट शेअर करणं इन्स्टाग्रामच्या धोरणांचं उल्लंघन करणारं असल्याचं स्पष्टीकरण इन्स्टाग्रामने दिलं आहे. स्वानिपोएलच्या पोस्टला अशा कोणत्याही कारवाईचा सामना करावा लागला नाही.

View this post on Instagram

When you finally sit down and your kid asks for a drink. #celestechallengeaccepted #celestebarber #funny

A post shared by Celeste Barber (@celestebarber) on

या कारवाईनंतर बार्बर हिने इंस्टाग्रामवर 'बॉडी शेमिंग' चे आरोप करत एक पोस्ट टाकली. यातून इन्स्टाग्राम  'शिडशिडीत देहयष्टीच्या गोऱ्या आणि धूर्त लोकांची बाजू घेत असल्याचा' आरोप तिने केला आहे.

इन्स्टाग्रामचे अल्गोरिदम हे AI तंत्रज्ञान तसंच मॅन्युअल रिपोर्टिंगच्या साहाय्याने पोस्टवर लक्ष ठेवतात आणि कुठल्या पोस्ट सामाजिक नियमांचा भंग करणारं आहे हे त्यातून ठरतं. जगभरात 15000 हून जास्त कर्मचारी हे या पोस्टचा रिव्ह्यू करतात आणि ते मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने आहेत की नाहीत हे पाहतात. पण मग एकसारख्याच दिसणाऱ्या दोन पोस्टमधील एकाच पोस्टवर कारवाई का केली गेली? यावरून इन्स्टाग्रामवर टीका होत आहे.

लैंगिकता आणि नग्नतेच्या नावाखाली कलाकाराच्या सच्चा कण्टेण्टवर  आक्षेप घेतल्याबद्दल आधी सुद्धा इन्स्टाग्रामवर अनेकदा टीका केली गेली आहे. इंस्टाग्रामने #gay, #lesbian, #bi अशा हॅशटॅगवर बंदी घातली होती. तेव्हाही ते अडचणीत आले होते.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: October 22, 2020, 10:54 PM IST
Tags:

ताज्या बातम्या