Home /News /lifestyle /

संशोधकांनी तयार केला Squidbot, समुद्राचं अंतरंग उलगडून दाखवणार ‘हा’ रोबो

संशोधकांनी तयार केला Squidbot, समुद्राचं अंतरंग उलगडून दाखवणार ‘हा’ रोबो

या स्क्वीड्ची रचना पाहून संशोधकांनी एक वेगळी शक्कल लढवून त्याच्यासारखा रोबो तयार केला आहे. जो पाण्याखाली काम करेल.

    न्यूयॉर्क, 09 ऑक्टोबर : अथांग समुद्राच्या आत एक वेगळंच जीवन असतं, अनेक घडामोडी छोटे-मोठे जीव या खाली आहेत. अनेकांचा आपल्याला परिचय असतो, अनेकांचा नसतो, असे काहीसे अत्यंत नाजूक व संवेदनशील जीव त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी संशोधकांनी एका रोबोची निर्मिती केली आहे. त्याचे नाव आहे स्क्वीडबो (Squidbot). स्क्वीड् हा पाण्याखाली राहणारा एक जीव असून त्याची रचना वेगळी आहे. मोठे डोळे, आठ हात, अशी त्याची संरचना असते आणि तो संभाव्य धोका ओळखून ते टाळण्यात सक्षम असतो. या स्क्वीड्ची रचना पाहून संशोधकांनी एक वेगळी शक्कल लढवून त्याच्यासारखा रोबो तयार केला आहे. जो पाण्याखाली काम करेल. हा रोबो जलद हालचालींसाठी पाण्याचे बुडबुडे बाहेर काढून पुढे जाण्यास सक्षम असेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जलदगतीने काही हालचाली टिपता येणार आहेत. वाचा-GOOD NEWS: iPhone घ्यायचाय? थोडं थांबा, Amazon वर मिळू शकतं जबरदस्त डील स्क्वीडसारखा असल्यामुळे या रोबोचं नाव स्क्वीडबो ठेवलं आहे. हा रोबो स्वत:हून पाण्यात पुढे पुढे जाऊ शकतो. दिवाळीच्या आकाशकंदिलासारख्या दिसणाऱ्या या रोबोमध्येएक स्ट्रेन कक्ष आहे. पाण्यात गेल्यानंतर या स्ट्रेन कक्षात पाणी भरलं जातं. ते पाणी बाहेर काढून टाकत तो रोबो पुढे जातो म्हणजे पोहतो. हा रोबो पाण्याखाली कुठेही जाऊ शकेल अशी त्याची रचना आहे. त्यामुळे संवेदनशील व नाजूक घडामोडींचे फोटो व व्हिडीओ तयार करणं सोपं होणार आहे. वाचा-अरे बापरे! दोन दशकांपूर्वी पृथ्वीवरील सर्व माणसं होती एकत्र; काय आहे हा प्रकार? कॉलेज ऑफ कॅलिफोर्निया सॅन डिएगोमधील प्राध्यापक मायकेल टॉली यांच्या म्हणण्यानुसार हा रोबोट स्क्वीडसारखाच आपला आकार बदलू शकतो, त्याच्याप्रमाणे वेगवान आहे. त्यामुळे पाण्याखालील त्याचा वावर अधिक सोपा होतो. एखाद्या प्राण्यापासून प्रेरणा घेऊन रोबोची निर्मिती करण्याची ही पहिली वेळ नाही. पक्षी, कीटक अशा विविध घटकांपासून प्रेरित होऊन शास्रज्ञांनी अनेक रोबोंची निर्मिती केली आहे. मात्र, पाण्यातील हालचालींसाठी पाण्यातील जीवांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवणे महत्त्वाचे होते. त्यामुळे स्क्वीड या प्राण्याची प्रेरणा घेऊन संशोधकांनी हा रोबो तयार केला. जेव्हा हा रोबो पोहत नाही तेव्हा तो अगदी कागदाच्या कंदीलासारखा दिसतो. वाचा-जगभरात Corona चं संकट असताना चिनी नागरिक लुटत आहेत सुट्ट्यांचा आनंद, पाहा PHOTO आपल्या पहिल्या प्रयोगशाळेतील प्रयोगादरम्यान, हा रोबो स्वत:हून दिशा बदलू शकतो व एका बाजूने गेल्यावर दुसऱ्या बाजूने तो बाहेर येतो, हे समोर आले आहे. वापरात असलेल्या कुठल्याही रोबोपेक्षा याची गती ही अधिक आहे. तो साधारण 18 ते 32 सेंटिमीटर प्रतिसेकंदापर्यंत पोहू शकतो. खोल समुद्रातील जीवसृष्टीच्या अभ्यासासाठी हा रोबो मदत करेल.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या