मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /बाथरूम, वॉशरूम,रेस्ट रूम आणि टॉयलेट यामध्ये फरक काय?

बाथरूम, वॉशरूम,रेस्ट रूम आणि टॉयलेट यामध्ये फरक काय?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आपण या सगळ्याचा उच्चार एकाच गोष्टीसाठी करत असलो तरी देखील त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत. या सर्वांमध्ये कोणत्या सुविधा आहेत आणि ते बाकीच्यांपेक्षा वेगळे का आहे? आज याविषयी जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : जेव्हा आपण घरी किंवा ऑफिसमध्ये असतो तेव्हा ब्रेकच्या वेळी मी वॉशरुम किंवा टॉयलेटला चाललतो / चालली आहे, असं म्हणतो. कोणी याला वॉशरुम, कोणी रेस्टरुम तर कोणी बाथरुम असं म्हणतो. अनेकांसाठी या सगळ्या शब्दांचा एकच अर्थ आहे. पण तसं नाही. आपल्यापैकी अनेकांना वॉशरूम, बाथरूम किंवा टॉयलेट रूम यातील फरक माहित नाही. आपण या सगळ्याचा उच्चार एकाच गोष्टीसाठी करत असलो तरी देखील त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत. या सर्वांमध्ये कोणत्या सुविधा आहेत आणि ते बाकीच्यांपेक्षा वेगळे का आहे? आज याविषयी जाणून घेऊया.

बाथरुमचा अर्थ

जेथे आंघोळीची सोय असते, त्याला स्नानगृह किंवा बाथरुम म्हणतात. त्यात शॉवर, बादली आणि आंघोळीचे सर्व सामान असू शकतात. आंघोळीची सोय कुठे आहे हे त्याच्या नावावरून स्पष्ट होते. जरी त्यात टॉयलेट सीट असेल किंवा नसेल. बाथरूमचा टॉयलेट सीटशी काहीही संबंध नाही.

सकाळी दात न घासता पाणी पिणे योग्य की अयोग्य?

वॉशरूमचा अर्थ

वॉशरूम ही एक खोली असते ज्यामध्ये सिंक आणि टॉयलेट सीट दोन्ही असतील. इथे आरसा असेल किंवा नसेल. पण इथे ना अंघोळ करायला जागा आहे ना कपडे बदलायला. बहुतेक मॉल्स, सिनेमा हाऊस, ऑफिस इत्यादींमध्ये वॉशरूम आहेत.

रेस्ट रूम म्हणजे काय: काहीजण हलके होण्यासाठी हा शब्द वापरतात, तर याचा शब्दशाह अर्थ घेतला, तर विश्रांतीची खोली असा होतो. पण या खोलीचा विश्रांतीशी काहीही संबंध नाही. हा एक अमेरिकन इंग्रजी शब्द आहे आणि याचा अर्थ शौचालय असा होतो. अमेरिकेत वॉशरूमला रेस्ट रूम म्हणण्याचा ट्रेंड आहे. पण भारतात वापरत असलेल्या ब्रिटिश इंग्रजीनुसार वॉशरूम योग्य शब्द आहे. पण तुम्ही रेस्टरुम देखील म्हणू शकता.

लॅवेटरी

हा शब्द मुळात लॅटिन भाषेतून आला आहे. लॅटिनमध्ये लेव्हेटोरियम म्हणजे वॉश बेसिन किंवा वॉशरूम. ज्याला लॅवेटरी म्हणतात. पण याचा अर्थ हा सुद्धा एक वॉशरूम आहे.

टॉयलेट

टॉयलेट किंवा टॉयलेट रूम हा शब्द फक्त टॉयलेट सीट बसवलेल्या जागेसाठीच वापरला जात असल्याचा उल्लेख अनेक अहवालांमध्ये आढळतो. इथे आजूबाजूला दुसरे काहीही नसते.

First published:

Tags: Lifestyle, Social media, Top trending, Viral