फी नाही गुरुदक्षिणा म्हणून घेतलं जातं श्रीफळ; नारळ देऊन विद्यार्थ्यांना मिळतं शिक्षण

फी नाही गुरुदक्षिणा म्हणून घेतलं जातं श्रीफळ; नारळ देऊन विद्यार्थ्यांना मिळतं शिक्षण

धार्मिक आणि पारंपारिक कार्यक्रमात नारळाचा (coconut) वापर तुम्ही पाहिला आहे. पण नारळ देऊन शिक्षण मिळतं असं कधीच ऐकलं नसावं.

  • Share this:

जकार्ता, 05 नोव्हेंबर :  नारळ (coconut) ज्याला श्रीफळही म्हटलं जातं. प्रत्येक महत्त्वाच्या कार्यात याचा वापर होतो. नारळानं सुवासिनीची ओटी भरली जाते. धार्मिक कार्यक्रमात देवासमोर नारळ ठेवला जातो आणि  कुणाचा सन्मान करतानाही त्याच्या हातात नारळ देतात. पण नारळ देऊन शिक्षण मिळतं असं कधी ऐकलं आहे का?

इंडोनेशियाच्या बालीमधील एक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी फी नाही तर नारळ द्यावा लागतो. कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांना फीऐवजी नारळ जमा करण्यास सांगितलं आहे. यासाठी कॉलेज प्रशासनाने मेल विद्यार्थ्यांना पाठवले आहेत.

कोरोनामुळे इथल्या नागरिकांची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक झाली असून विद्यार्थ्यांना त्यांची फी देखील भरण्यास अडचण येत आहे. सुरुवातीला या कॉलेजनं हफ्त्यांमध्ये फी घेण्याची व्यवस्था सुरू केली होती. मात्र तरी अनेकांना फी भरण्यात अडचण येत होती.  इंडोनेशियामध्ये नारळाचं मोठया प्रमाणात उत्पादन होतं.  त्यामुळे फीच्या बदल्यात नारळ देण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.

हे वाचा - एक सकारात्मक संशोधन; ज्वालामुखी उद्रेकाचा आधीच अंदाज देणार हा विशेष ड्रोन, वाचा

या जमा झालेल्या नारळांपासून कॉलेज तेल तयार करणार आहे. कॉलेजमधील कर्मचारी वयन पसेक यांनी बालीतील स्थानिक माध्यम पुष्पा न्यूजला माहिती दिली, या नारळांचा वापर शुद्ध खोबरेल तेल तयार करण्यासाठी केला जाणार आहे.

स्थानिक वृत्तपत्र बाली सनच्या वृत्तानुसार, केवळ नारळच नाही तर इतर देखील नैसर्गिक वस्तूंचा स्वीकार केला जात आहे. मोरिंगा आणि हर्बल साबण तयार करण्यासाठी वापरली जाणाऱ्या झाडांची पानंदेखील स्वीकारली जात आहेत. यामध्ये विद्यार्थी त्यांनी बनवलेल्या वस्तूंची विक्रीदेखील करू शकतात. त्यामुळे त्यांना व्यवसाय कसा करायचा हेदेखील समजण्यास मदत होईल.

हे वाचा - No Shave November फॉलो करत आहात?या सेलिब्रिटींच्या दाढीची स्टाइल आहे ट्रेंडमध्ये

इंडोनेशियात नारळ देऊन शिक्षण देण्याच्या या पद्धतीमुळे जुनी बार्टर सिस्टम परत आली आहे. बार्टर सिस्टम म्हणजेच वस्तू विनिमय प्रणाली. हा देवाणघेवाणीचा प्रकार आहे. जगभरात मुद्रा म्हणजे चलनी नाणी किंवा नोटांचा शोध लागण्याआधी या पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असे. आजदेखील जगभरातील विविध ठिकाणी या पद्धतींचा अवलंब केला जातो. यामध्ये सेवेच्या मोबदल्यात वस्तूची देवाणघेवाण केली जाते. म्हणजे एखाद्या लोहारानं शेतकऱ्याला शेतासाठी नांगर तयार करून दिला तर शेतकरी त्या बदल्यात त्याला धान्याची पोती द्यायचा. हा व्यवहार जगभर चालायचा.

Published by: Priya Lad
First published: November 5, 2020, 11:27 PM IST

ताज्या बातम्या