शेतकरी आंदोलनामुळे इंडिगो कर्मचाऱ्यांची धांदल; 45 सेकंदाचा हा VIRAL VIDEO पाहा
Farmer Protest : इंडिगो एअरलाइन्सच्या (Indigo Airlines) कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी कॅब शेतकरी आंदोलनामुळे त्यांच्या पर्यंत पोहचू शकली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना चक्क पायी दिंडी (By walking) काढावी लागली आहे.
चंदीगड, 10 डिसेंबर: कृषी कायदे रद्द केल्याशिवाय मागं हटणार नाही, असा पवित्रा घेतलेल्या शेतकऱ्यांची आंदोलनं देशभरात जागोजागी सुरू आहेत. शेतकऱ्यांनी अनेक रस्ते आणि टोलनाक्यांवर ठिय्या मांडला आहे. याचा परिणाम केवळ रस्ते वाहतुकीरच झाला नसून विमानसेवेवरही झाल्याचं दिसत आहे. कारण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये इंडिगो एअरलाइन्सचे काही वैमानिक आणि कर्मचारी चक्क शेतातून पायी चालताना दिसत आहे.
शेतकरी आंदोलनामुळे जागोजागी रस्ते ठप्प करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवासी वाहनांची वाहतूकही बंद पडली आहे. याचा फटका इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनाही बसला आहे. त्यांना घेऊन जाणारी कॅब शेतकरी आंदोलनामुळे त्यांच्या पर्यंत येऊ शकली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना चक्क पायी दिंडी काढावी लागली आहे. या व्हिडीओत हे कर्मचारी आपल्या बॅगा आणि इतर सामान घेऊन पायी चालताना दिसत आहेत. यामध्ये काही महिला कर्मचारी देखील आहेत. त्यांना चंदीगड विमातळावर पोहचायचे होते, मात्र शेतकरी आंदोलनामुळे त्यांची पुरतीच धांदल उडाली आहे.
45 सेंकदाचा हा व्हिडिओ समाजमाध्यमांत धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत अनेकांना हा व्हिडिओ रिट्वीट केला आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता इंडिगोचे कर्मचारी पायी चालण्याचा आंनद घेताना दिसत आहेत. त्यामुळे एकंदरीत शेतकरी आंदोलनामुळे त्यांच त्यांना त्रास झाला असला तरी रोज आकाशात भरारी घेणारे हे कर्मचारी आनंदाने पायी चालत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या मोठं मोठ्या बॅगांचाही त्यांना विसर पडला आहे.