या आहेत भारतातल्या सर्वात लांब पल्ल्याच्या ट्रेन, एका सफरीत करू शकता भारत भ्रमंती

भारताची संस्कृती आणि सभ्यता ही वेगवेगळी आहे. दर काही मैलांनी संस्कृती आणि चालीरिती बदलतात. त्यातही भारतीय संस्कृती जवळून पाहायची असेल तर रेल्वेमधून प्रवास करा.

News18 Lokmat | Updated On: Sep 20, 2019 04:01 PM IST

या आहेत भारतातल्या सर्वात लांब पल्ल्याच्या ट्रेन, एका सफरीत करू शकता भारत भ्रमंती

भारताची संस्कृती आणि सभ्यता ही वेगवेगळी आहे. दर काही मैलांनी संस्कृती आणि चालीरिती बदलतात. त्यातही भारतीय संस्कृती जवळून पाहायची असेल तर रेल्वेमधून प्रवास करा. ट्रेनमधून प्रवास करताना दिसणारी शेती, मैदान आणि डोंगर मनमोहून टाकतात. पण तुम्हाला हे माहीत आहे का काही अशा ट्रेन आहेत ज्या संपूर्ण भारतातून प्रवास करून जातात. तुम्हाला फिरण्याची आवड असेल तर या ट्रेनमधून एकदा नक्की प्रवास करा.

विवेक एक्सप्रेस- ही भारतातील सर्वात लांब पल्ल्याची ट्रेन आहे. कन्याकुमारी, तमिळनाडूवरून डिब्रूगढ, आसामपर्यंत जाते. ही ट्रेन 4 हजार 273 किमी चालते आणि 85 तासात आपला प्रवास पूर्ण करते. या ट्रेनच्या प्रवासा दरम्यान तुम्हाला पश्चिम बंगालपासून केरळपर्यंतचं निसर्ग सौंदर्य पाहाल.

हिमसागर एक्सप्रेस- ही भारतातली सर्वात लांब पल्ल्याची दुसरी ट्रेन आहे. ही ट्रेन 3 हजार 714 किमी चालते. उत्तरेतील जम्मूपासून दक्षिणेतील कन्याकुमारीपर्यंत ही ट्रेन नऊ राज्यांमधून जात  आपला प्रवास निश्चित करते. या ट्रेनमध्ये बसून तुम्ही या नऊ राज्यांचं सौंदर्य पाहू शकता.

नवयुग एक्सप्रेस- आठवड्याला एक दिवस धावणारी ही ट्रेन जम्मूतवीपासून मँगलोरपर्यंत जाते. ही देशातील तिसऱ्या नंबरची सर्वात लांब पल्ल्याची ट्रेन आहे. ही ट्रेन 12 राज्यांमधून जाते. या ट्रेनमधून तुम्ही जवळपास अर्ध्या भारताचा प्रवास करू शकता.

गुवाहाटी एक्सप्रेस- ही भारतातली लांब पल्ल्याची चौथ्या नंबरची ट्रेन आहे. ही ट्रेन यशवंतपुर, बँगलोरपासून सुरू होऊन डिब्रूगढ, आसामपर्यंत जाते. आठवड्याला एकदा धावणारी ही ट्रेन तीन दिवसांचा प्रवास करते.

Loading...

घसा सतत दुखतो का? एकदा हे घरगुती उपाय करून पाहा

...म्हणून मच्छर तुम्हाला चावतात, जाणून घ्या त्या मागचं कारण

या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर केस गळती कधीच थांबणार नाही!

या दोन चुकांमुळे तुम्ही कधीही होणार नाही जाड, पहिली चूक तर गंभीर

SPECIAL REPORT: ..तरीही मीच जिंकणार! पंकजा मुंडेंचं राष्ट्रवादी काँग्रेसला थेट आव्हान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 04:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...