तांदळाच्या दाण्यांवर लिहिली संपूर्ण भगवद् गीता; देशातील पहिल्या मायक्रो-आर्टिस्टची जबरदस्त कमाल

तांदळाच्या दाण्यांवर लिहिली संपूर्ण भगवद् गीता; देशातील पहिल्या मायक्रो-आर्टिस्टची जबरदस्त कमाल

विद्यार्थीनीने एक मायक्रो-आर्ट प्रोजेक्ट तयार केला आहे, ज्यात तिने 4042 तांदळांच्या दाण्यांवर संपूर्ण भगवद् गीता लिहिली आहे. मायक्रो-आर्टिस्टने हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तिला एकूण 150 तास लागले असल्याचं सांगितलं.

  • Share this:

तेलंगाणा, 20 ऑक्टोबर : संपूर्ण मेहनतीने, जिद्दीने काहीही करायचं ठरवलं तर, जगातील कोणतीही गोष्ट ते करण्यापासून रोखू शकत नाही. अशीच कमाल हैदराबादच्या (Hyderabad) एका लॉ शिकणाऱ्या (Law Student) विद्यार्थीनीने केली आहे. तिने तब्बल 4042 तांदळाच्या दाण्यांवर संपूर्ण भगवद् गीता (Bhagavad Gita) लिहिली आहे.

ती देशातील पहिली महिला मायक्रो-आर्टिस्ट (Micro Artist) असल्याचं या विद्यार्थीनीने म्हटलं आहे. या विद्यार्थीनीने एक मायक्रो-आर्ट प्रोजेक्ट तयार केला आहे, ज्यात तिने 4042 तांदळांच्या दाण्यांवर संपूर्ण भगवद् गीता लिहिली आहे. मायक्रो-आर्टिस्ट रामागिरी स्वरिकाने (Ramagiri Swarika), हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तिला एकूण 150 तास लागले असल्याचं सांगितलं. आतापर्यंत तिने 2 हजारहून अधिक मायक्रो-आर्टवर्क तयार केले आहेत. रामागिरी स्वरिका मिल्क आर्ट, पेपर कार्विंग, तिळावरही ड्रॉइंग करते.

(वाचा - दिड वर्षीय चिमुकल्याच्या बुद्धीमत्तेची कमाल; वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद)

 यापूर्वी रामागिरी स्वरिकाने केसांवर संविधान प्रस्तावना लिहिली होती. यासाठी तिला तेलंगाणा राज्यपालांकडून सन्मानित करण्यात आलं होतं. राष्ट्रीय स्तरावर आपलं काम पोहचल्यानंतर आता, आपली कलाकृती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवण्यासाठी तयारी करत असल्याचं रामागिरी म्हणाली.

रामागिरीने याविषयी बोलताना सांगितलं की, तिला नेहमीच कला आणि संगीत विषयात आवड होती. तिला लहानपणी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. गेल्या चार वर्षांपासून तिने तांदळाच्या दाण्यावर गणपती बाप्पाच्या चित्रासह मायक्रो-आर्ट करण्यास सुरुवात केली. तिने केवळ एका तांदळाच्या दाण्यावर, इंग्रजी वर्णमालाही लिहिली होती.

2019 मध्ये रामागिरीला दिल्ली सांस्कृतिक अकॅडमीकडून (Delhi Cultural Academy) राष्ट्रीय पुरस्काराने (National Award) सन्मानित करण्यात आलं आणि तिला भारतातील पहिली मायक्रो-आर्टिस्ट (India's First Micro-Artist)म्हणून मान्यता देण्यात आली. 2017 मध्ये तिला आंतरराष्ट्रीय ऑर्डर बुक ऑफ रिकॉर्ड्सने (International Order Book of Records) सन्मानित करण्यात आलं होतं.

आतापर्यंत तिने 2000हून अधिक मायक्रो आर्ट्सवर काम केलं आहे. रामागिरी लॉची विद्यार्थी असून तिचा न्यायाधिश होण्याचा मानस आहे.

(वाचा - दुकानदार कॅरी बॅगचे जास्त पैसे घेतो? आता इथं करा तक्रार; होणार कारवाई)

Published by: Karishma Bhurke
First published: October 20, 2020, 5:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या