'चालण्यात'ही भारतीय आळशीच!

'चालण्यात'ही भारतीय आळशीच!

भारतातले लोक जगात सगळ्यात जास्त आळशी असून इतर देशांच्या तुलनेत ते दिवसभरात कमी चालतात असं या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलंय.

  • Share this:

14 जुलै : जगात भारतातील लोक दिवसभरात कमी चालतात असा एक रिपोर्ट समोर आलाय. भारतातले लोक जगात सगळ्यात जास्त आळशी असून इतर देशांच्या तुलनेत ते दिवसभरात कमी चालतात असं या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलंय.

46 देशांची पाहणी करून हा अहवाल तयार करण्यात आलाय. यात भारत 39 व्या क्रमांकावर आहे. भारतात साधरणतः एक मनुष्य दिवसाला 4297 पावलं चालतो. यात पुरुष 4606 तर महिला 3684 पावलं चालतात.

जगात सर्वात जास्त चालणाऱ्या लोकांचा देश हा हाँगकाँग असून हाँगकाँगमध्ये दिवसाला साधारणतः एक मनुष्य 6880 पावलं चालतो. जगातील इतर देशांतील व्यक्ती या दिवसाला सरासरी 4961 पावलं चालत असल्याचं अहवालातून उघड झालंय.

First published: July 14, 2017, 4:45 PM IST

ताज्या बातम्या