100 दिवस झोप घेण्यासाठी कंपनी देते 1 लाख रुपये, इथं करा अर्ज

100 दिवस  झोप घेण्यासाठी कंपनी देते 1 लाख रुपये, इथं करा अर्ज

झोप घेण्याची नोकरी करताना तुम्हाला सध्याची नोकरी सोडावी लागणार नाही आणि घरातून बाहेरही जावं लागणार नाही.

  • Share this:

बेंगळुरू, 29 नोव्हेंबर : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने अतंराळ अभ्यासांतर्गत दोन महिने झोपण्यासाठी तब्बल 14 लाख रुपये देते. आता भारतातही याला सुरुवात होणार आहे. कर्नाटकातील बेंगळुरुत एक ऑनलाइन फर्म वेकफिटने 100 दिवसांसाठी दररोज 9 तास झोपणाऱ्याला एक लाख रुपयांची ऑफर दिली आहे. ऑनलाइन स्लीप सोल्यूशन फर्मने या प्रोग्रॅमला वेकफिट स्लीप इंटर्नशिप असं नाव दिलं आहे. या ठिकाणी सिलेक्ट करण्यात आलेल्यांना 100 दिवसांसाठी रात्री 9 तास झोपावर लागेल.

निवड करण्यात आलेल्यांना कंपनीने दिलेल्या गादीवर झोपावं लागेल. तसेच ते स्लीप ट्रॅकर आणि तज्ज्ञांच्या समुपदेशन सत्रातही भाग घ्यावा लागेल. जे लोक या इंटर्नशिप प्रोग्रॅममध्ये निवडले जातील त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून दाखवावं लागेल की त्यांना किती चांगली झोप लागते. कंपनीकडून स्लीप ट्रॅकरचा वापर करण्यात येणार आहे. गादीवर झोपायला जाण्यापूर्वी आणि झोपून उठल्यानंतरचा पॅटर्न रेकॉर्ड केला जाईल. जिंकणाऱ्याला हा स्लीप ट्रॅकर भेट देण्यात आला होता.

कंपनीचे सह संस्थापक चैतन्या रामलिंगगौडा यांनी सांगितलं की, स्लीप सोल्यूशन कंपनी म्हणून आमचा एक प्रयत्न आहे की लोकांना झोपण्यासाठी आम्ही प्रेरणा देऊ. एकीकडे धावपळीच्या युगात आपण जगत आहे आणि कमी झोपेचा आरोग्यावर परिणाम होत आहे. यामुले आपले जीवनमानही खालावत चालले आहे.

आम्ही अशा लोकांना भरती करणार आहे जे लोक झोपेला प्राधान्य देऊन जास्त काळ झोपतील. ही इंटर्नशिप करण्यासाठी तुम्हाला तुमची नोकरी सोडावी लागणार नाही आणि घरातून बाहेरही जावं लागणार नाही. या इंटर्नशिपसाठी कंपनीच्या https://www.wakefit.co/sleepintern/ या वेबसाइटवर जाऊन अप्लाय करता येईल.

First published: November 29, 2019, 2:25 PM IST
Tags: health

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading