रात्री झोपण्यापूर्वी दुधातून नियमित घ्या औषधी वनस्पतीची पूड; वाढेल लैंगिक शक्ती

रात्री झोपण्यापूर्वी दुधातून नियमित घ्या औषधी वनस्पतीची पूड; वाढेल लैंगिक शक्ती

  • Last Updated: Oct 30, 2020 10:54 PM IST
  • Share this:

गोरखमुंडी (Gorakhmundi) ही एक सुवासिक औषधी वनस्पती आहे. सामान्यत: पावसाळ्याच्या शेवटी दिसू लागते आणि हिवाळ्यात याला पानं, फळं येऊ लागतात. उन्हाळ्यात हे धान्याच्या शेतातही आढळतं. गोरखमुंडीमध्ये औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे त्याचा उपयोग आयुर्वेद आणि युनानीमध्ये अनेक उपचार करण्यासाठी केला गेला आहे. याची मुळं, फुलं आणि पानं सर्व भाग बर्‍याच रोगांवर उपचार करण्यासाठी फायदेशीर आहे. दक्षिण भारतात ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

सामान्यपणे वजन कमी करण्यासाठी गोरखमुंडीचा वापर केला जातो. मात्र याशिवाय याचे बरेच फायदे आहेत. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, या वनस्पतीमध्ये मधुमेह, ताप, खोकल्यापासून पोटापर्यंतचे आजार, पोटातील जंत, अपचन, कावीळ इत्यादींवरील उपचार करणारे गुण आहेत.

डोळ्यांच्या दृष्टीसाठी

गोरखमुंडीचा वापर कान, नाक आणि घशातील विविध विकार आणि नेत्रगोलनासाठी केला जातो. काही काळ ते सेवन केल्यानं डोळ्यांची दृष्टीवाढू शकेल. गोरखमुंडीची ताजी फुलं घ्या आणि दोन चमचे तिळाच्या तेलात मिसळा. याचं नियमित सेवन केल्यानं दृष्टी सुधारण्यास मदत होईल. डोळ्यांचा लालसरपणा देखील नाहीसा होईल.

कुष्ठरोग दूर करतं

कुष्ठरोग असल्यास गोरखमुंडीची पूड, कडूनिंबाच्या सालाची पावडर घेऊन त्याचा काढा तयार करा. सकाळ-संध्याकाळ हा काढा प्यायल्याने कुष्ठरोग बरा होतो.

पुरळ किंवा खाजेपासून मुक्तता

गोरखमुंडी महिलंना योनीतील वेदना, खाज सुटणं किंवा शरीरातील गरमी दूर करण्यास मदत करतं. गोरखमुंडीच्या बिया आणि साखर समान प्रमाणात बारीक करून दिवसातून एकदा थंड पाण्याबरोबर घ्या.

लैंगिक शक्ती वाढवतं

रात्री गोरखमुंडीची पानं आणि त्याची मुळं गाईच्या दुधासह सेवन केल्यास लैंगिक शक्ती वाढू शकते. या पावडरचा नियमित वापर केल्यास लैंगिक शक्ती बळकट होऊ शकते.

मूळव्याधाच्या उपचारात उपयुक्त

गोरखमुंडीचं देठ आणि मूळ वाळवून पूड बनवा. दररोज एक चमचा ही पूड दह्यातून घेतल्यास मूळव्याध पूर्णपणे नष्ट होतो.

आतड्यांमधील किडे दूर करण्यासाठी

ही औषधी वनस्पती आतड्यांमधील कृमी काढून टाकण्यासाठी आणि नष्ट करण्यास खूप उपयुक्त ठरू शकतं. पोटातील अळी दूर करण्यात देखील मदत करतं. गोरखमुंडीच्या मुळाची भुकटी बनवा आणि दिवसातून एकदा अर्धा चमचा खा.

श्वासाच्या दुर्गंधीपासून मुक्तता

श्वासाची दुर्गंधी नष्ट होण्यासाठी गोरखमुंडीची पूड व्हिनेगरसोबत घ्या. यासाठी व्हिनेगरमध्ये सकाळी आणि संध्याकाळी चिमूटभर गोरखमुंडीची भुकटी घालून घ्या.

पित्ताशयातले खडे काढतं

गोरखमुंडी पित्ताशयातील खडे नष्ट करण्यासाठी फायदेशीर आहे. गर्भाशय योनीशी संबंधित इतर रोगांसाठीदेखील हे अत्यंत फायदेशीर औषध आहे.

गोनोरिया रोगात उपयुक्त

myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. अजय मोहन यांनी सांगितलं, लैंगिक संबंधांदरम्यान एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीला गोनोरियाचं संक्रमण हा एक सामान्य रोग आहे. हा एक संसर्ग आहे जो 'निसेरिया गोनोरिया' नावाचे जीवाणूंमुळे होतं. लैंगित संबंधांमुळे हा आजार पसरतो. मूत्रमार्ग, गुद्दाशय किंवा घशावर याचा परिणाम होतो. गोरखमुंडी गोनोरिया आणि धातुसंबंधी विकारांसाठी फायदेशीर आहे. गोरखमुंडीची भुकटी नियमित सेवन करावी.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख – लैंगिक शिक्षण आणि आरोग्य

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: October 30, 2020, 10:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading