मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /धक्कादायक! सोनं-हिरे नव्हे तर भारतीय प्रवाशाकडे सापडले तब्बल 3 हजार Viagra Pills

धक्कादायक! सोनं-हिरे नव्हे तर भारतीय प्रवाशाकडे सापडले तब्बल 3 हजार Viagra Pills

सेक्स पॉवर वाढवण्यासाठी घेतलं जाणार हे औषध डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केल्याशिवाय विकत घेता येत नाही. तसंच काही देशांमध्ये त्याच्या विक्रीवर निर्बंधही आहेत.

सेक्स पॉवर वाढवण्यासाठी घेतलं जाणार हे औषध डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केल्याशिवाय विकत घेता येत नाही. तसंच काही देशांमध्ये त्याच्या विक्रीवर निर्बंधही आहेत.

सेक्स पॉवर वाढवण्यासाठी घेतलं जाणार हे औषध डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केल्याशिवाय विकत घेता येत नाही. तसंच काही देशांमध्ये त्याच्या विक्रीवर निर्बंधही आहेत.

वॉशिंग्टन, 08 फेब्रुवारी : एका देशातून दुसऱ्या देशात काही ठराविक गोष्टी नेण्यास बंदी असते. तरीही लोक लपूनछपून अशा गोष्टी नेत असतात. विमानतळावर तपासणी करताना असे अनेक प्रवासी पकडले जातात आणि मग त्यांची रवानगी तुरुंगात होते. नाना तऱ्हेने लोक बंदी असलेल्या वस्तू चोरून नेण्याचा प्रयत्न करत असतात. काही वेळा अतिशय विचित्र गोष्टी प्रवासी चोरून नेताना सापडतात. नुकतंच एका भारतीयाला शिकागो (Chicago Airport) विमानतळावर एक भलतीच गोष्ट लपवून नेताना पकडण्यात आलं आहे.

ही व्यक्ती भारतातून (India) अमेरिकेला (USA) परतत होती. तिच्याकडे तब्बल 96 हजार डॉलर्स किमतीच्या 3200 व्हायग्रा पिल्सचा (Viagra Pills) साठा सापडला आहे. अमेरिकेबाहेर खरेदी करण्यात आलेले कोणतेही प्रिस्क्राईब्ड औषध अमेरिकेत नेता येत नाही. असं केल्यास तो कायदेशीर गुन्हा ठरतो, असं असतानाही या प्रवाशानं एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायग्रा पिल्स आणण्याचं धाडस का केलं? याचं गौडबंगाल उलगडलेलं नाही.

ट्रीब्यून इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, शिकागो विमानतळावर बॅगेज तपासणी दरम्यान, या प्रवाशाकडे या व्हायग्रा पिल्सचा साठा सापडला. त्यामुळे त्याला अमेरिकन कस्टम्स आणि बॉर्डर प्रोटेक्शन विभागानं ताब्यात घेतलं.

हे वाचा - पोटावर मेटल चिकटवण्यासाठी त्यानं चक्क खाल्ले Magnets; सर्जरीनंतर डॉक्टरही हादरले

सेक्स पॉवर वाढवण्यासाठी घेतलं जाणार हे औषध डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केल्याशिवाय विकत घेता येत नाही. तसंच काही देशांमध्ये त्याच्या विक्रीवर निर्बंधही आहेत. अमेरिकेत या गोळ्या बाहेरून नेण्यास परवानगी नाही. अमेरिकन कस्टम्स आणि बॉर्डर प्रोटेक्शन विभागानं (US Customs and Border Protection Department -CPB) भारतीय प्रवाशाला बेकायदेशीररित्या या गोळ्या आणताना पकडलं असल्याची माहिती या विभागानं एका निवेदनाद्वारे दिली आहे.

हे वाचा -  महिलेनं चक्क साडी नेसून केलं स्कीइंग, VIDEO VIRAL

आपल्या मित्रांसाठी आपण या पिल्स आणल्याचं या प्रवाशानं सांगितलं असलं तरी इतक्या प्रचंड किमतीची आणि इतक्या मोठ्या प्रमाणात या व्हायग्रा पिल्स आणण्यामागचे समाधानकारक स्पष्टीकरण मिळालेलं नाही. नऊ पाऊंड वजनाच्या या पिल्सची उत्पादक किरकोळ किंमतीनुसार त्याची किंमत तब्बल 96 हजार 608 डॉलर्स म्हणजे जवळपास 76 लाख रुपये आहे, असंही या विभागानं म्हटलं आहे. या प्रवाशाची ओळखही अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

First published:

Tags: India, USA